पहाट द — दिनेश५७, Mon, 09/02/2019 - 11:56 सांज सकाळी निळ्या आभाळी कुठून येतो पंखांना आवेग... कृष्णसावळ्या चित्रकथेतून कसा विहरतो जडावलेला मेघ! लज्जाभरल्या गालावरती कशी उमटते गोड गुलाबी लाली... घरट्यामधल्या त्या पिल्लांना कोण सांगतो उठा, पहाट झाली! प्रतिक्रिया द्या 1000 वाचन 💬 प्रतिसाद