Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इंधन, खरे काय?

भ
भंकस बाबा
Tue, 09/03/2019 - 17:28
🗣 134 प्रतिसाद
1994 साल, वर्ल्ड धिस वीक म्हणून एक कार्यक्रम यायचा दूरदर्शनवर. जगातील घडामोडीवर एक चांगला माहितीपर कार्यक्रम होता हा . तर या कार्यक्रमामध्ये तेव्हा जपानने केलेल्या एका संशोधनावर बातमी आली होती. जपानने पाण्यावर चालणारी कार बनवली आहे, यात ईंधन म्हणून पाणी वापरले जाईल व प्रदूषण कमी होईल असे. आजतायगत या कारची वाट पहात आहे. सन 1986 मधे होंडा मोटरसाइकिलने 100 सीसीची एक मोटरसाइकिल भारतात दाखल केली. काही जनांस म्हणजे काही मोड़ेलनी 100 किमी प्रति लीटर माइलेज दिला होता , कंपनीचा दावा 80 किमीचा होता. होंडा कंपनीने या अशा माइलेज देण्यार्या गाड्या तपासणी करून परत घेतल्या होत्या , त्याबदल्यात त्या ग्राहकाना नवीन गाडी व भरलेले पैसे परत केले होते. त्यानंतर 100 किमीचा माइलेज देणारी गाडी मार्केटमधे बघितली नाही. 100 चा दावा बजाजची प्लाटिना करते , पण 70च्या आसपासच जाते. गाडीचा शोध लागून आज सव्वाशे वर्षे झाली. गाड्या आलीशान झाल्या पण कमी ईंधन पिणाऱ्या गाड्या तितकयाशा बनल्या नाहीत. मला म्हणायचे आहे की इंजिनमधे पाहिजे तेवढे संशोधन झाले नाही, पण गेल्या एकदोन वर्षात अचानक संशोधनाने जोर पकडला आणि नवनवीन शोध पुढे येऊ लागले आहेत. नेमका हा काळ असा आहे की अमेरिकेला खनिज तेलात तितक़ा रस राहिलेला नाही. जाणकार , अभ्यासू मिपाकर अजुन प्रकाश टाकतील काय?

प्रतिक्रिया द्या
75528 वाचन

💬 प्रतिसाद (134)
क
कंजूस Fri, 09/06/2019 - 17:35 नवीन
*कारची एचपी वाढवण्यासाठी टर्बो लावताना दाखवतात. मग हाच टर्बो कार बनवणारे अगोदरच का लावत नाहीत?*
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Fri, 09/06/2019 - 17:50 नवीन
लिपू आणि पिटबुलमधे मॉडिफाई करण्यात येणाऱ्या गाड्या जुन्या असतात. टर्बो इंजिन ही संकल्पना तशी नवीन आहे. या शोमधे गाड्या लुक व पॉवर ह्या संकल्पनेवर मॉडिफाई केल्या जातात. मी काही भाग बघितले आहेत या शोचे. कुठेही एनर्जी एफिशियन्ट गाडी बनवताना पाहिले नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
त
तमराज किल्विष Sat, 09/07/2019 - 02:04 नवीन
लिपु आणि पिटबूल न गाडी बनवल्यानंतर ती कितीही डबडा दिसत असली तरी गाडी मालक भारावून म्हणतात " व्वा, मला जशी हवी होती त्याहून भारी बनवली आहे."
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 09/07/2019 - 03:37 नवीन
मला हेच सांगायचं आहे. फक्त वरून रुपडं बदलत नाहीत तर प्रत्येक जचन्या गाडीत नवीन एंजिन किंवा टर्बो एडिशन करताना दाखवतात. खर्च बारा हजार डॉलर्सपर्यंत खरणारे गिऱ्हाईक. त्यांची कुवत इंधन खाणारी गाडी संभाळणारी आहे. इफिशंट एंजिनवाली गाडी हे त्यांचे ध्येय नाही. १) गाडीचं एंजिन कार्यक्षम करणे/ २) अधिक माइलेज देणे/ ३)वेगाने पळणारी गाडी हे सर्व एकाच गाडीत कसं शक्य आहे?
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 09/07/2019 - 14:34 नवीन
मला वाटत , शंभर टक्के इंधन जळतच नाही कुठल्याही गाडीत .. चला आपण असे मानूया कि १० मिली मागे फक्त ६ मिलीच वापरले जातेय . हाच विनियोग वाढवून कदाचित ९ मिली पर्यंत आला तर मायलेज नक्कीच चांगले असेल आणि प्रदूषणही कमी होईल .. सर्व माहित असते , चर्चाही घडतात पण जेव्हा कुणी संशोधन करत असेल तर त्याला वेडे ठरवले जाते .. रमण पिल्लईने थियरी चोरली असेल तरी ती थियरी खोटी नक्कीच नव्हती ..
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Sat, 09/07/2019 - 14:41 नवीन
ये सूट तुम्हे मुझसे हि खरीदाना पडेगा और इस सूट को चालना है तो युनिक पार्टीकल मुझसे हि खरीदने पडेंगे।
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 09/07/2019 - 14:45 नवीन
माफ करा, असेच्या असे इंग्लिशमधून पेस्टवतोय .. गरज आहे म्हणून अनुवाद करायला येळ लागला असता .. What happened to Ramar Pillai, the Tamil Nadu boy who in 1996 claimed to have discovered Herbal fuel? IIT and LMES(so called teaching real engineering) claimed that Ramar has used wax in that water to create this fuel…I was first angry about Ramar but after some analysis, i had a question, how come wax dissolve in water and create a fuel..wax is non-polar and water is polar..if Ramar was able to dissolve wax in water it is a great invention.which needs to be appreciated…. I have a small doubt, a person from 1996 is trying to bring the fuel to the people, I am not a scientist to check Ramar’s claim but i feel some truth is there behind him….if a person is making mistake, why will he do the same mistake again and again…..I remember Stanley Meyer, who claimed that he can use water to run vehicle’s, he introduced the term “fuel cells”, The people who supported him after some misunderstandings called him fraud, he was said to be killed after that, Now we hear the news that water powered cars are going to be released..same things must not happen again to Ramar..people don’t believe blindly at the same time don’t underestimate….centuries back Galileo… years back Stanley..In Future no Idea who is going to be ignored and made false for there efforts
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 09/07/2019 - 14:50 नवीन
इंधनाच्या पूर्ण क्षमतेने वापर न करण्या मागे गाड्या उत्पादित करणाऱ्या कंपन्या नक्की नसणार ते कशाला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतील . मग दुसरा अर्थ तेल कंपन्या ह्यांचे टक्के वारीवर संगनमत किंवा दुसरे कारण सरकारी दबाव . सरकारी दबाव ह्या साठी की तेलाचे खूप मोठे अर्थकारण आहे गाड्या निर्मिती chya उत्पादन पेक्षा खूप मोठे . 100%, इंधन क्षमता वापरणे शक्य नाही अशक्य आहे ती गोष्ट
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 09/07/2019 - 14:55 नवीन
अहो त्या रामन पिल्लेचा डेमो टिवीवर पाहिला आहे. लोक फक्त हसले आणि चालू पडले. --- आपल्या विषयाकडे वळुया. दहा एमेल पैकी सहा किंवा नऊ एमेल इंधन यांत्रिक शक्तीमध्ये बदलतं हे कुठं वाचलत?
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 09/09/2019 - 13:34 नवीन
पण हे सर्व त्याला दुनियेसमोर करून काय फायदा मिळणार होता ? मुळात कुणी असे करेलच का ? जर समजा मला काही गोष्ट सिद्ध करायची असेल तर मी ती स्वतः आधी नीट पुन्हा पुन्हा तपासून घेईन , तिथले जे वरिष्ठ आहेत त्यांची परवानगी घेईन आणि मगच सामोरे जाईन .. मला आठवतंय त्याच्या सिनियर्सनी हा सर्व मोठा डाव असल्याचं त्याकाळी सांगितलं होतं पण त्या गोष्टी आत सध्या मला कुठे मिळत नाही आहेत .. माझी स्मरणशक्ती अजून तरी शाबूत आहे आणि मी ते सर्व त्याकाळी पेपरमध्ये सतत वाचत होतो .. अर्थात त्याच्या विरुद्धच बातम्या जास्त येत होत्या पण काही जण जे त्याला नीट ओळखत होते ते मात्र त्याच्या वर विश्वास ठेवून होते .. असो .. मूळ विषय भलतीकडेच चालला आहे म्हणून मी या रामर पिल्लईच्या चर्चेला इथेच पूर्णविराम देतो आहे .. मूळ धागा , इंधन म्हणजे काय आहे ? हा आहे आणि त्यावरच चर्चा झडावी असे मला वाटते.. मी अजूनही या मतावर ठाम आहे कि पेट्रोल कंपन्या आणि गाडी उत्पादक कंपन्या या सर्वांची मिलीभगत आहे .. तसे नाही तर मग का अजून आपल्या देशात , विजेवर चालणार्या गाड्या सर्रास दिसत नाहीत .. खरंच जर हे सर्व थांबावं असं वाटत असेल तर त्यादृष्टीकोनातून प्रयत्न होताना दिसले पाहिजेत .. दुर्दैवाने तेच तर होत नाही आहेत ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
त
तमराज किल्विष Mon, 09/09/2019 - 16:40 नवीन
https://youtu.be/ivs3p5t6MKU
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
ख
खिलजि Mon, 09/09/2019 - 17:08 नवीन
भाषाच समजली नाही ,,डोक्यावरून गेलं .. माझ्यामते तो वॅक्स वापरतोय असं दाखवलं गेलंय .. बरोबर ना ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष
त
तमराज किल्विष Mon, 09/09/2019 - 19:04 नवीन
तूम पिल्ले के अंधे भगत क्यू बने हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
ख
खिलजि Sat, 09/07/2019 - 15:11 नवीन
मी आधी वर प्रतिसाद दिला आहे .. एका व्यक्तीने एक मशीन आणलं होत विकायला , तो वाचा हि नम्र विनंती ..
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 09/07/2019 - 15:16 नवीन
तो डेमो कश्यावरुन खरा होता .. रामर पिल्लेने जे धाडस दाखवलं त्याला सलाम .. संपूर्ण देशासमोर किंबहुना जगासमोर तो असा वेडेपणा कश्याला करून घेईल .. बरं ते जाऊ देत , त्याला वेडे का ठरवलं गेलं ? तो तसाही हुशार होता .. त्याला मोकळं ठेवायचं होतं ना ? इस्पितळात भरती करण्याचं काय प्रयोजन ? तिथे नक्की काय झालं असेल ते देव जाणे .. अहो देशाच्या राष्ट्रपतींवर जर प्राणघातक हल्ला होऊ शकतो तर रामर पिल्ले हा अंतर सामान्य माणूस .. त्याला प्रयोग करण्याआधीच काहीतरी काळेबेरे झाले असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही ..
  • Log in or register to post comments
त
तमराज किल्विष Sat, 09/07/2019 - 15:51 नवीन
रमर पिल्लेला प्रयोग करताना प्रत्येक वस्तूचे वजन करून दिले होते. तयार प्रॉडक्ट चे वजन जास्त भरत होतं म्हणून त्याच्या प्रत्येक वस्तूचे बारिक निरिक्षण केल्यावर जी रवी होती ती पोकळ असून त्यात त्यानं ज्वलनशील पदार्थ भरून आणलेला होता. त्याचं छिद्र गरम पाण्यात उघडलं आणि तो पदार्थ पाण्यात मिसळला. चोरी पकडली व नाचक्की झाली असेल तेव्हा तो अज्ञातवासात गेला असेल.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 09/07/2019 - 16:22 नवीन
परत एकदा सांगतो, रामन पिल्लई जी थियरी वापरत होता म्हणजे वनस्पतिजन्य पदार्थापासुन ज्वलनशील रसायन मिळवणे, ती सत्य होती. प्रयोगामधे त्याने चालबाजी केली असेल. जैट्रोफापासून ईंधन ही त्याच्या थियरिची पुढची पायरी आहे. उसाच्या चिपाडापासून वा त्याच्या पातेर्यापासून कोळसा बनवण्याची विधी तुनळीवर उपलब्ध आहे, पण जो प्रकार मी बघितला तो अगदीच मागास आहे. जऱ हेच व्यवस्थित शास्रीयरित्या केले तर प्रचंड ईंधन बचत होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष
क
कंजूस Sat, 09/07/2019 - 17:27 नवीन
परत एकदा सांगतो, रामन पिल्लई जी थियरी वापरत होता म्हणजे वनस्पतिजन्य पदार्थापासुन ज्वलनशील रसायन मिळवणे,
हो बाबा हो. पटलय. यात पिल्लेने कोणता शोध लावला? किती आणि कोणत्या वनस्पतीजन्य भागातून किती आणि कोणत्या दर्जाचे इंधन मिळू शकते यात काही गोपनीय नाही. फक्त आर्थिक गणित जमवायचे आहे. प्रत्येक प्रकारच्या इंधनात खोट आहेच. कालानुरुप ती खोट क्षम्य किंवा कमी त्रासदायक/नुकसाकारक ठरते.
नेमका हा काळ असा आहे की अमेरिकेला खनिज तेलात तितक़ा रस राहिलेला नाही. जाणकार ,
यामध्ये अभ्यास वगैरे काही नाही, अमेरिकेकडे खनिज तेल आहे पण तेल उत्पादक सर्व देश चाल खेळतात. आपल्या देशातले भूमीतले तेल कधी व किती काढून बाजारात आणायचे याबद्दल.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 09/07/2019 - 17:55 नवीन
गाडी 1 ltr इंधना मध्ये किती किलो मीटर जाईल हे अनेक घटकांवर अवलंबून असते .. पाहिले ते इंधन शुद्ध असायला हवे पेट्रोल आणि डिझेल चे जे रासायनिक सूत्र आहे त्याच प्रमाणात सर्व घटक त्या मध्ये असतात का ? तर ह्या प्रश्नच उत्तर निगेटिव्ह आहे त्या मध्ये भेसळ असते . पाणी हायड्रोजन चे २, अनु आणि ऑक्सिजन चा एक आणि हे पाण्याचे सूत्र आहे पण असे पण असे पाणी पृथ्वी तलावावर अस्तित्वात आहे का ? पेट्रोल आणि डिझेल हे जीवाश्म इंधन आहे दबावाखाली ह्यांचा स्फोट होतो आणि हेच सूत्र वापरून इंजिन तयार केलेलं असते . पाहिले तर ते शुद्ध नाही . इंजिन नी निर्माण केलेली ऊर्जा आणि प्रतक्षात चाकाला मिळालेली ऊर्जा ह्या मध्ये फरक असतो . फरक हवेचा विरोध ,गाडीचा आकार,रस्त्याचा प्रकार ,गाडीवर असलेलं वजन किती तरी प्रकार गाडी १ ltr इंधनावर किती अंतर कापेल हे अवलंबून असते . ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होताना ऊर्जेचा रहास होतो हे सर्वसामान्य नियम आहे . मग इंधनाचा पूर्ण वापर होत नाही त्याचा पूर्ण वापर झाला तर गाडी जास्त average देईल ह्या मताचा पाया काय आहे हे समजलं नाही . दुसरे स्वस्त इंधन शोधणे हा पर्याय योग्य आहे पण इंधनाचा पूर्ण वापर इंजिन मध्ये केला जात नाही ह्याला कोणता आधार आहेत
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 09/07/2019 - 18:37 नवीन
सायलेंसर मधून बाहेर पडणारा धुर म्हणजेच ईंधन पूर्ण जळत नाही आहे याच दयौतक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
र
राजेंद्र मेहेंदळे Sat, 09/07/2019 - 19:26 नवीन
ईंधन दरवेळी नवीन आणुन खर्च खरेच कमी होतो का? म्हणजे पेट्रोल पेक्षा डिझेल स्वस्त पण गाडी एक दोन लाखाने महाग. सी.एन.जी त्याहुन स्वस्त पण ईन्शुरन्स आणि ईंजिन महाग. आता ईलेक्ट्रिक गाड्या येणार पण त्यांच्या बॅटरी एफिशियन्सी, बॅटरी गेल्यानंतरचा कचरा (जशी ई-वेस्ट) या सगळ्याचे काय? दुरच्या प्रवासात सर्वत्र चार्जिंग मिळणार का? ईथेनॉलवरच्या गाड्या कधी येणार? ईथेनॉल पुरेसे तयार होणार का आणि कोण तयार करणार? वितरणाची व्यवस्था काय? त्याऐवजी ईंधन कोणतेही असो , शक्य असेल तेव्हा कार पुलिंग करणे, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था वापरणे, जवळच्या कामासाठी पायी चालत जाणे हे सोपे उपाय वाटत नाहित का?
  • Log in or register to post comments
प
पिंगू Tue, 09/10/2019 - 21:35 नवीन
इंधन दरवेळी नविन आणल्याने खर्चात कुठेही बचत होत नाही. इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये बॅटरीचा कचरा रिसायकल करण्याची योग्य सोय असेल अशी अपेक्षा करता येईल. पण त्याची शाश्वती नाही. इथेनॉलवर चालणार्‍या नविन गाड्या आणण्यापेक्षा आहेत त्या गाड्यांमध्ये काही बदल करुन इथेनॉल / बायोफ्युएल वापरता येईल का याची चाचपणी करता येऊ शकेल. चांगली सार्वजनिक वाहतुक व्यवस्था फक्त शहरांपुरतीच मर्यादित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
भ
भंकस बाबा Wed, 09/11/2019 - 19:39 नवीन
हल्लीच एक बातमी वाचली होती कि टीवीएस मोटर्सने फक्त इथेनॉलवर चालणारी दुचाकी बाजारात उतरवली आहे. आता इथे गरज क़ाय आहे? तर इथेनॉलवर चालणारी रिक्शा जऱ या कंपन्यानी उतरवली तर पेट्रोल , डिझेलपेक्षा भरपूर स्वस्त असलेले इथेनॉल रिक्शाचालकाची नफ्याची पातळी उंचावेल. तुलनेने कमी प्रदूषण होत असल्यामुळे पर्यावरण पूरक असेल. पण असा प्रयत्न होताना दिसत नाही. या रिक्शा जर इथेनॉल उत्पादन करणाऱ्या कारखान्याना सब्सिडी बेसिसवर पुरवल्यास यांच्या वापराला चालना मिळेल. ज्या स्क्रैप पॉलिसिचा बोलबाला सरकार करत आहे ती जुन्या रिक्शाच्या बदल्यात नवीन इथेनॉलवर चालणारी रिक्शा असे समीकरण आणल्यास पुढे भविष्यात खनिज तेलावरिल अवलंबित्व कमी होईल
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 09/12/2019 - 06:14 नवीन
खूप मोठी भांडवली गुंतवणूक पेट्रोल आणि cng मध्ये झालेली आहे . रिलायन्स सारखे उद्योग समूह त्यात सहभागी आहे . आणि सरकारनी नी त्यांना नफ्याची हमी दिली असणार . त्या मुळे इथिनोल वर गाडी चालणे स्वस्त आणि सहज शक्य झाले तरी पेट्रोल आणि cng हद्ध पार होणार नाही नजीकच्या काळात . नंतर होवू शकते
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 09/12/2019 - 07:15 नवीन
एकदा एक विडिओ डॉक्यु दाखवलेली टिवी चानेलवर - कोणत्यातरी गावाचे धरणामुळे पुनर्वसन करून घरं बांधून दिलेली. संडासाच्या सेप्टीक ट्यान्कास ग्यासप्लान्ट लावलेला. मिथेन तयार होतो तो टाकीत साठवून सर्वांना किचनमध्ये दिलेला. पण पुढे काही अशाप्रकारे कुठे बांधलेलं दिसलं नाही. हा मिथेन जळल्यावर एक अणू कार्बन, चार अणू हाईड्रोजनचे जळून कार्बनडाईआक्साईड आणि वाफ तयार होते. याच मिथेनवर एंजिन चालवायला हवे. लोकसंख्या वाढलीच आहे, मिथेनही भरपूर मिळेल ना?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 09/12/2019 - 13:45 नवीन
कंकाका, त्याला पू बसेस म्हणतात. ब्रिस्टाॅलला अशी बस २०१५ पासून चालू आहे. डिझेलपेक्षा ३०% कमी कर्बवायू तयार होतो. https://carbiketech.com/oh-sht-pee-poo-bus-karo ही गार्डिअनची बातमी https://www.theguardian.com/uk-news/2015/mar/15/uk-first-poo-bio-bus-bristol-regular-service ही बातमी मी त्यावेळेसच वाचली होती. ३२००० घरांतून त्यासाठी गॅस गोळा करण्याची व्यवस्था उभारण्यात आली होती. घरटी कमी माणसे व दोन घरांतील अंतर लक्षात घेता (भारताशी तुलना करता) ही वस्ती फारच विरळ म्हणली पाहिजे असे नमूद करून, भारतासारख्या दाट लोकवस्तीतून हे प्लॅंट उभारणे आणखी सोपे व कमी खर्चिक असेल असेही त्यात म्हटले होते. विशेषत: झोपटपट्टीत असे प्लॅंट बसवणे हे अनेक दृष्टिने फायदेशीर व स्वच्छतेच्या दृष्टिने अत्युतम ठरेल व ही सर्व व्यवस्था पैसेही मिळवून देईल. त्यामुळे याकडे धंदा म्हणूनही पाहता येऊन ही व्यवस्था कार्यक्षम राहू शकेल. मिथेन गॅसवर टाटा कंपनीने बस तयार केली आहे व अनेक संशोधने केलेली आहेत. https://www.tatamotors.com/press/tata-motors-develops-countrys-first-bio-methane-bus/ ही आणखी एक बातमी. पण या कंपनीबाबत उलट सुलट बातम्यापण आल्या होत्या. https://www.hindustantimes.com/kolkata/at-re-1-for-17km-cheapest-bus-in-india-fuelled-by-cow-dung-biogas-launches-in-kolkata/story-LLSrp0Wwo3h9kBQ4OFsqgO.html प्लॅस्टिकपासून परत तेल बनवण्याचे संशोधनही असेच होते. कचरा गोळा करणाऱ्या लाखो लोकांना काम मिळाले असते. ती सर्व माणसे दारिद्र्यरेषेवर कायमची आली असती. उद्योगांना फर्नेस आॅईल व शुध्द कोक मिळाले असते. मुख्य म्हणजे भारतातले यच्चयावत प्लॅस्टिक लोकांनी गोळा केले असते कारण यांत भंगार प्लॅस्टिकचा परताव खूप होता. सर्वात महत्वाचे म्हणजे भंगार प्लॅस्टिकची वर्गवारी करणे किंवा ते स्वच्छ करणे याची आवश्यकता नसल्याने या गरीब लोकांच्या आरोग्याला धोका नव्हता. जिवाङूंपासून ही प्रक्रिया होत असल्याने अत्यंत सुरक्षीत व कोणत्याही प्रकारची जाळपोळ न करता हे सर्व होणार होते. भारतात अनोखी कामे करणारी खूप आहेत. फक्त त्यांना काम करू दिले पाहिजे. असो. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
सुबोध खरे गुरुवार, 09/12/2019 - 07:49 नवीन
येथे चर्चा करणाऱ्या बहुसंख्य लोकांची पार्श्वभूमी "शास्त्र" नसावी असे वाटते. कारण बहुसंख्य लोकांनी आपली मते अर्धवट ज्ञानातून व्यक्त केली आहेत. कोणालाही दूषणे न देता काही गोष्टी मी स्पष्ट करू इच्छितो १) जास्तीत जास्त ८५ % इथेनॉल इंजिन मध्ये वापरता येईल कारण १००% इथेनॉल वर इंजिन "चालू" होणार नाही. परंतु भारताची सद्य स्थिती अशी आहे कि भारताकडे पेट्रोल मध्ये १० % मिश्रण करण्याएवढेही इथेनॉल उपलब्ध नाही.त्या शिवाय तेवढे इथेनॉल उपलब्ध करण्यासाठी ऊसाचे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणावर वाढवणे आवश्यक आहे यासाठी प्रचंड प्रमाणावर पाण्याची नासाडी होईल. हे आपल्या देशाला परवडणारे नाही. शिवाय जत्रौफा मधून बायोडिझेल निर्मिती हा व्यवहार आतबट्ट्याचा आहे असे सिद्ध झालेले आहे. जिज्ञासूंनी खालील दुवा पहावा https://www.livemint.com/Industry/RfNU5ZFXDRTrfUkl9lNMaL/Why-ethanol-blending-in-petrol-might-not-work-for-India.html २) इथेनॉल ची ऊर्जा पेट्रोलच्या पेक्षा ३०% ने कमी आहे. इथेनॉल आणि शुद्ध पेट्रोल याने होणारे प्रदूषण तेवढेच असते. पेट्रोलच्या इंजिनातून येणार धूर हा एकतर पेट्रोल पूर्ण न जळल्याने येतो किंवा पेट्रोल मध्ये भेसळ असेल किंवा इंजिनच्या पिस्टन रिंग नीट काम करत नसतील तर वंगण इंजिनमध्ये जाळून धूर होतो. ३) टर्बो चार्जिंग या प्रक्रियेत इंजिनच्या हवा आत घेण्याच्या नळकांड्याच्या पुढे एक वेगाने फिरणारा पंखा( हा इंजिन बरोबरच फिरतो) लावला जातो ज्यामुळे आत येणारी हवा दाबून जास्त घनतेची केली जाते. या दबावामुळे हवा गरम होते आणि त्याची घनता कमी होते म्हणून टर्बो चार्जरच्या पंख्यानंतर हवा थंड करण्यासाठी एक इंटर कुलर वापरला जातो. हवा थंड केली कि तिची घनता वाढते. यामुळे इंजिनातील इंधन जवळ जवळ पूर्णपणे जळते. ( डिझेल इंजिनातील धूर हा त्यातील अशुद्ध तत्वे जळल्यामुळे होते याची पुढची पायरी म्हणजे CRDI (COMMON RAIL DIRECTI NJECTION) इंजिन यात इंधन आणि हवा १६०० बार इतक्या प्रचंड दाबाखाली इंजिनात सोडले जातात. अर्थात त्यात टर्बो चार्जिंग आणि इंटर कुलिंग असतेच ज्यामुळे इंधनाचे संपूर्ण ज्वलन होते. या दोन तंत्रज्ञानामुळे डिझेल इंजिने बरीच जास्त कार्यक्षम झाली असून त्यातुन मिळ्णारे सरासरी किमी बरेच जास्त मिळतात शिवाय त्यातून होणारे प्रदूषण खूप कमी झालेले आहे. हे तंत्रज्ञान १९२३ पासून उपलब्ध आहे. अर्थात तेंव्हा हि इंजिने बोजड असल्याने ती विमान किंवा जहाजात वापरली जात होती. जसा जसा आकार कमी होत गेला तसे हे तंत्रज्ञान मोटारीत पण आले. असेच तंत्रज्ञान पेट्रोल इंजिन मध्ये सुपरचार्जींग द्वारे केले जाते. ४) इंधनांची ऊर्जा क्षमता- एक लिटर इथेनॉल ची २३.५ मेगॅज्यूल आहे तर दबावाखालील नैसर्गिक वायू (CNG) २१.८, पेट्रोलची ३३. ५ आणि डिझेल ची ४५ मेगॅज्यूल आहे. ज्या इंधनाची घनता जास्त तितकी त्यातून मिळणारी ऊर्जा जास्त असते म्हणूनच रॉकेट किंवा क्षेपणास्त्रात घन इंधन वापरले जाते.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा गुरुवार, 09/12/2019 - 11:26 नवीन
धन्यवाद , प्रतिसाद टाकल्याबद्दल थोडेसे इथेनॉलबद्दल, काही दिवसापूर्वीच टीवीएस कंपनीने फक्त इथेनॉलवर चालणारी दुचाकी बाजारात आणली. वाजतगाजत तिचे उदघाटन केले. ही बातमी तुमच्या कानावर आली नाही बहुतेक? दूसरी गोष्ट म्हणजे इथेनॉल फक्त उसापासून तयार होते, हे तर घोर अज्ञान. इथेनॉल ज्वारी, बाजरीपासून देखील होते. अगदी शुद्ध अल्कोहोल देखील एक इंधनच असते फक्त ते महाग असते. ब्राजील व अर्जेटीना या देशात इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आहेत, मी पन्नास टक्केचा दावा बघितला आहे. आपल्याकडे उस हा राजकारण्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. एक वेळ अशी होती कि महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री शुगर लॉबी ठरवायची. आता आपल्याकडे साखरेमध्ये राजकारण आहे म्हणून आयात साखरेला परवानगी मिळत नाही, नेमके हेच काऱण इथेनॉल निर्मितीला मारक आहे. ब्राजील व अर्जेटीनामधे उसाचे पिक वारेमाप येते याचे कारण हे देश विषुववृत्तावर आहेत, जिथे वर्षभर पाऊस पडतो. आपल्याकडे मात्र साखर कारखानेदार जगावा म्हणून पाण्याचा वारेमाप उपसा करून उस वाढवला जातो. तेल लॉबी तर याहुन मोठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आनन्दा गुरुवार, 09/12/2019 - 14:20 नवीन
ठीक आहे, ज्वरी पासुन तयार होते, पण विशेषतः शेतीपासुनच ना? उसापासुन तयार होते हे फेमस आहे कारण उसासाठी इथेनोल हे बाय-प्रॉदक्ट आहे. इथेनॉल हवे म्हणून आपण ज्वारी लावू काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा गुरुवार, 09/12/2019 - 14:29 नवीन
नक्कीच , आपण इथेनॉलसाठी ज्वारी लावू शकतो, उसाला लागणारा कालावधी, पाण्याचा उपसा बघता तीन महिन्यात येणारे ज्वारीचे पिक फ़ायदेशीर असू शकते. पण गाभ्यात म्हटल्याप्रमाणे इथे एक मोठी लॉबी कार्यरत असू शकते हे सर्व प्रत्यक्षात येण्यास अडवण्यासाठी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा गुरुवार, 09/12/2019 - 15:12 नवीन
तसा विषय नाही तो. उसापासुन साखर तयार झाल्यावर जे शिल्लक राहते त्यापासून इथेनॉल तयार होते.. नुसत्या इथेनॉल साठी जर ऊस करायचा झाला तर ते तितके किफायतशीर राहणार नाही. त्याचप्रकारे ज्वारी वगैरे देखील केवळ इथेनॉलसाठी जावणे परवडणार नाही... तरीही तुम्हाला रस असेल तर जरा त्यामागचे अर्थकारण कागदावर मांडुन बघा. किफायतशीर आहे असे वाटले तर आम्हाला पण सांगा. उदा - एका हेक्टरमध्ये ५ टन ज्वारी, त्यापासुन १टन इथेनॉल, त्याचा दर ५०रु लिटर, म्हणजे ५००००रु वगैरे. बघुया फायद्याचे आहे का ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा गुरुवार, 09/12/2019 - 15:39 नवीन
कृषिजागरण डॉट कॉम नावाच्या साइटवर ज्वारीपासून इथेनॉल बनवण्याचे फायदे दाखवले आहेत, त्यात त्यांनी इथेनॉलसाठी धाटे पिळल्यावर उरणारा चोथा पशुखाद्य म्हणुन वापरता येईल असे म्हटले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Fri, 09/13/2019 - 06:11 नवीन
तसे असेल तर विचार करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
श
शाम भागवत गुरुवार, 09/12/2019 - 15:44 नवीन
सडक्या ज्वारीपासून (जी फेकूनच द्यायची होती) दारूनिर्मितीचे दोन कारखाने घाट्यात येऊन बंद पडल्याचे आठवतंय. शेवटी सरकारने ७२ कोटी नुकसीन भरपाई दिली. मला तपशीलात रस नाही.;) मला तरी वाटते, शेतीतून बायप्राॅडक्ट म्हणूनच हा उद्योग किफायतशीर ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ज
जालिम लोशन गुरुवार, 09/12/2019 - 18:45 नवीन
दिली तर सगळ्या टाकावु माला पासुन ते अल्कोहोल बनवुन देतील. ते ही स्वस्तात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
स
सुबोध खरे गुरुवार, 09/12/2019 - 16:03 नवीन
ज्वारी पासून इथेनॉल तयार करतात त्यात ज्वारीच्या दाण्यांचा वापर होत नाही तर ज्वारीच्या ताटातील( खोड) रसाचा उपयोग केला जातो आणि या पिकासाठी पाणी उसापेक्षा बरेच कमी लागते. ज्वारीच्या ताटातून रस हा शेताच्या जवळच काढावा लागतो अन्यथा ते वाळून जाण्याचा धोका असतो. हा रस काढण्यासाठीची यंत्रे अजून सहज पणे उपलब्ध झालेली नाहीत. शिवाय या तंत्रज्ञानाला अजून सर्व मान्यता मिळालेली नाही. याची ़कारणे राजकीय आहेत कि आर्थिक आहेत हे मला माहित नाही. परंतु हा एक समर्थ पर्याय उपलब्ध होऊ शकतो असे सकृतदर्शनी वाटते. https://www.business-standard.com/article/markets/ethanol-fuels-sorghum-cultivation-105082701034_1.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
भ
भंकस बाबा गुरुवार, 09/12/2019 - 16:42 नवीन
या पिकापासुन ज्वारी मिळवायची असेल तर पिक कालावधी वाढेल. परिणामी धाटे सुकून मूळ उद्देश्य बाजूला राहिल. मी काही काळ शेती केली होती , चाऱ्यासाठी लावणारी ज्वारी व अन्नासाठी होणारी ज्वारित फरक असतो. उसाच्या एका पिक कालावधीत ज्वारीची तीन पीके मिळतात , शिवाय पाणी कमी लागते. तुमचे मुद्दे खोडत आहे म्हणून राग मानू नका, तुमच्यासारख्या व दुसऱ्या अनेक जाणकार मिपाकराचा प्रतिसाद या धाग्यासाठी आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 09/13/2019 - 06:08 नवीन
मी कुठे पिकापासून ज्वारी मिळेल म्हणतोय. उलट तुम्ही मी मांडलेल्या मुद्द्याला दुजोराच देत आहात किंवा मी तुमचा मूळ मुद्दाच समर्थन केलाय आणि त्यासाठी लागणार संदर्भ सुद्धा दिलाय. (नक्कीच , आपण इथेनॉलसाठी ज्वारी लावू शकतो, उसाला लागणारा कालावधी, पाण्याचा उपसा बघता तीन महिन्यात येणारे ज्वारीचे पिक फ़ायदेशीर असू शकते. पण गाभ्यात म्हटल्याप्रमाणे इथे एक मोठी लॉबी कार्यरत असू शकते हे सर्व प्रत्यक्षात येण्यास अडवण्यासाठी) हा आपला श्री आनंदा याना दिलेला प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
स
सुबोध खरे Fri, 09/13/2019 - 06:43 नवीन
https://marathi.krishijagran.com/agriculture-processing/ethanol-production-from-sweet-sorghum/ हा अजून एक दुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चामुंडराय Sun, 09/15/2019 - 22:34 नवीन
अहो डॉ. खिरे, तुम्ही डॉक्टर आहात कि इंजिनिअर? एकदम टेक्निकल प्रतिसाद दिला कि. फारच छान !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चामुंडराय Sun, 09/15/2019 - 22:36 नवीन
* डॉ. खरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
R
Rajesh188 गुरुवार, 09/12/2019 - 08:57 नवीन
पाण्याचे रासायनिक सूत्र h2o हे आहे म्हणजे हायद्रोजन चे 2 अनु आणि ऑक्सीजंन चा एक अणू मिळून शुद्ध पाणी तयार होते . पण असे शुद्ध पाणी असतं का त्या मध्ये बऱ्याच घटकांचे मिश्रण झालेलं असतं . पेट्रोल चे एक ठराविक रासायनिक सूत्र नाही मग शुद्ध पेट्रोल कशाला म्हणतात ? इंजिन मध्ये कधीच १००% इंधनाचे ज्वलन होवू शकणार नाही आणि धूर विरहित ऊर्जा मिळणार नाही असे मला वाटत . शास्त्रीय ज्ञान मला बिलकुल नाही पण ही शंका आहे तुम्ही मत मांडावे .
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 09/12/2019 - 13:48 नवीन
कोणतीही शक्ति रूपांतरित होताना १००% रूपांतरीत होऊ शकत नाही. त्या उर्जेचा काही भाग रूपांतर प्रक्रियेला वापरला जातो असं कुठेतरी वाचलं होतं. त्यामुळे तेलाचे रूपांतर १००% गतीज उर्जेत होणे शक्य नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
आ
आनन्दा गुरुवार, 09/12/2019 - 14:25 नवीन
भाऊ १००टक्के वपरले जाणे म्हणजे १००% ज्वलन. म्हणजे, जेव्हा कार्बन जळतो, तेव्हा डाय ऑक्साईड तयार होतो. आणि उष्णता सोडली जाते. मोनॉक्साईड तयार होताना उष्णता सोडली जात नसणार. ज्वलन म्हणजे १००% कार्बन चे डायओक्साईड मध्ये रुपांतर. त्याचे पुढे काय होते ते वेगळ्या घटकांवर अवलंबून असते. बाकी impurities चे सोडुन द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत गुरुवार, 09/12/2019 - 14:34 नवीन
ओहो. असं होय. मग बरोबर आहे तुमचे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
क
कंजूस गुरुवार, 09/12/2019 - 15:52 नवीन
उस,ज्वारी,जेट्रोपा यांच्यापेक्षा पूमेथड आणणे ही गरज आहे. त्याची (मिथेनची)क्षमता कमी असली तरीही उपयुक्तता महत्त्वाची. फक्त एक धोका म्हणजे आपल्याकडे संयत्रांची छेडछाड होते ती टाळली पाहिजे. फटाके वगैरेनी स्फोट होऊ शकतो टाकीचा. शिवाय एक मोठा नकारात्मक मुद्दा आहे. - संडासात डिसेन्फेक्टंटस वापरले तर मैला कुजवणारे चांगले उपयुक्त ब्याक्टेरिआ मरतात, कुजणे थांबते, मिथेन होत नाही. संयत्र बंद पडते. असिड, फिनोल,हार्पिकवगैरेचा धंदा बंद होईल.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 09/15/2019 - 19:20 नवीन
जो सौदीमधील एक मोठी कंपनी सौदी अरमाको हिच्या तेलसाठयावर झाला हा पण एक मोठा बनाव वाटत आहे. सीरियातील इराण समर्थक बंडखोरानी हा हल्ला केला असे मीडिया कोकलून सांगत आहे. अगदी त्या बंडखोरानी त्याची जबाबदारी पण घेतली. काहीतरी मुरते आहे खास! ड्रोन टेक्नोलॉजी ही अमेरिका ,इजरायल या देशांची मक्तेदारी मानली जाते. हे देश या भागात नजर ठेवून आहेत. अशा वेळेला एक ड्रोन चारशे किलोमीटरचे अंतर तोडून विनासायास येतो व अचुकपणे वार करतो हे पटत नाही , कारण अशा हल्ल्यासाठी सैटेलाइटची मदत लागेल. इंधनयुद्ध , लालच व धर्मवेड याची कुठे सांगड लागत आहेसे वाटते.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 09/15/2019 - 19:21 नवीन
जो सौदीमधील एक मोठी कंपनी सौदी अरमाको हिच्या तेलसाठयावर झाला हा पण एक मोठा बनाव वाटत आहे. सीरियातील इराण समर्थक बंडखोरानी हा हल्ला केला असे मीडिया कोकलून सांगत आहे. अगदी त्या बंडखोरानी त्याची जबाबदारी पण घेतली. काहीतरी मुरते आहे खास! ड्रोन टेक्नोलॉजी ही अमेरिका ,इजरायल या देशांची मक्तेदारी मानली जाते. हे देश या भागात नजर ठेवून आहेत. अशा वेळेला एक ड्रोन चारशे किलोमीटरचे अंतर तोडून विनासायास येतो व अचुकपणे वार करतो हे पटत नाही , कारण अशा हल्ल्यासाठी सैटेलाइटची मदत लागेल. इंधनयुद्ध , लालच व धर्मवेड याची कुठे सांगड लागत आहेसे वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गतीशील Tue, 09/17/2019 - 14:29 नवीन
डॉ. खरे सोडले तर बऱ्याच जणांनी अर्धवट आणि ऐकीव माहिती दिली आहे असे दिसते. इंधन कमी पिणे हे त्या इंधनावर अवलंबून नसून त्या इंधनातून आपण जास्तीत जास्त ज्वलन शक्तीला यांत्रिकी शक्ती मध्ये कसे रूपांतर करू शकतो यावर अवलंबून आहे.तंत्रज्ञान हे हळूहळू उत्क्रांत होत जाते,आणि एक वेळ अशी येते कि त्याहून पुढे जाणे हे खर्चिक आणि उपलब्ध जागेचा विचार करता अशक्य असते. डिझेल आणि पेट्रोल ची हि वेळ आली आहे. उदा. CRDI इंजिन हे पारंपरिक डिझेल इंजिनपेक्षा खूपच कार्यक्षम (Efficient) आहे. याचे कारण तंत्रज्ञानमध्ये झालेली उत्क्रांती Turbocharger विषयी हास्यास्पद म्हणावी अशी माहिती बऱ्याच जणांनी दिली आहे. Turbocharger हा इंधनाची बचत करण्यासाठी नसून इंजिनची ताकद वाढवण्यासाठी वापरतात. उदा. १००० CC चे इंजिन हे १३०० CC इंजिन एवढी अश्वशक्ती चे काम करू शकेल. उलट turbocharger मुळे इंधन थोडे जास्तच जळते. आता खरे काय या प्रश्नाकडे वळूया. खरे हेच आहे कि आता पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये संशोधन करून त्याची कार्यक्षमता वाढवण्यासारखे काही उरलेले नाहीये. शिवाय वातावरणावर होणारे गंभीर दुष्परिणाम आहेत ते वेगळेच. (र.च्या.क.ने. गेल्या काही वर्षात वनक्षेत्र हे ७% ने वाढले आहे तरी प्रदूषण हे वाढता वाढता वाढे असेच चालू आहे याचे कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेल चा अमर्याद वापर.) इलेकट्रीक गाड्यांविषयी पण थोडे बोलू. जरी इलेक्ट्रिक गाड्या या प्रदूषण करत नसल्या तरी त्या ज्या विजेवर चालणार आहेत ती वीज कशी बनवली हे महत्वाचे आहे. वीज जर कोळसा जाळून चंद्रपूरला बनवली तर पुण्यात होणारे प्रदूषण कमी होईल, पण चंद्रपूरला प्रदूषण दुप्पट-तिप्पट वाढेल कारण विजेची मागणी वाढली असेल. थोडक्यात पवनचक्की आणि सौरऊर्जा वापरून बनवलेली वीज आणि त्या विजेवर चालणाऱ्या गाड्या या खऱ्या अर्थाने पृथ्वीसाठी उपकारक असतील. बाकी मोटारसायकलने १०० कि.मी. प्रति लिटर मायलेज देणे हे अशक्य कोटी मध्ये मोडते. मी कुठेसुद्धा कोणाला सुद्धा भेटायला तयार आहे जो मला हे सिद्ध करून दाखवेल माझ्या डोळ्यासमोर. उतारावरती clutch दाबून ४-५ कि.मी. गाडी चालवून त्याला १०० कि.मी. च्या त्रैराशिक समीकरणामध्ये बसवून दाखवणे याला थोतांड असे म्हणतात शेवटी खरे हेच आहे कि येत्या काळात अपारंपरिक ऊर्जा स्रोत आणि त्यावर चालणाऱ्या गाड्या याच फक्त आपल्या वसुंधरेला वाचवू शकतात
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Tue, 09/17/2019 - 15:14 नवीन
इंटरनेटवर असंख्य लेख उपलब्ध आहेत टर्बोचार्जरवर. जे ईंधन न जळता बाहेर पडते त्याला परत ज्वलनासाठी वळवून पॉवर व इंधनाची बचत असे कार्य लिहिले आहे तिथे . बरे विषय ज्या मुद्द्यावर होता तो सोडून तुम्ही बाकी सर्व लिहिले आहे जे येथील बहुतेक लोंकानी मांडले आहे . परत एकदा लिहितो की जे नवीन संशोधन येत आहे ते पुरेसे नाही आहे. यामधे अनेक देशांचे हितसंबध गुंतलेले आहेत. आणि आपल्याकडे राजकारणाचे देखील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गतीशील
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा