Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वयास माझ्या पैंजण घालित....

श — शिव कन्या, गुरुवार, 09/05/2019 - 14:10
शुभ्र रुपेरी हव्यात लाटा बटाबटांच्या डोक्यावरती नकोच तेव्हा काळीकुरळी बट डोळ्यावर सळसळणारी शेलाटीशी रेघ वक्रशी हातावरती उमटून जावी टिचकी मारून गिरकी घेता झोका माझा खाली यावा डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा नाजुक साजुक पेरांवरती खोडावरचे रिंगण यावे साल कोवळी मधुमासाची गंध फुलांचा उडून जावा पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी पाठीवरच्या पानावरचा रंग केशरी विराट व्हावा त्यावर हलते माळ मण्यांची ताठ कण्याची पाठ रहावी हळुच यावे जरा बसावे आस्ते आस्ते कवेत घ्यावे वयास माझ्या पैंजण घालित वार्धक्याने हसुन यावे शिवकन्या

प्रतिक्रिया द्या
8891 वाचन

💬 प्रतिसाद (11)
य
यशोधरा गुरुवार, 09/05/2019 - 14:26 नवीन
वा!
डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी
सुंदर.
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन गुरुवार, 09/05/2019 - 18:51 नवीन
अगदी सुदंर अपेक्षा.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 09/06/2019 - 13:34 नवीन
नेहमाप्रमाणेच.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 09/07/2019 - 14:28 नवीन
कसे सावरू वयास माझ्या , तारुण्याचे वरदान कुठे ? रंगवून टाकल्या सफेद झालरी , काळा रंग लपला कुठे ? झिडकारुनी त्या वार्धक्क्यास , ठेवले माझे मन कोवळे मोतीबिंदूही हिरवे झाले , जीवन सोन्याहुनी पिवळे
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ गुरुवार, 09/12/2019 - 06:10 नवीन
वाह! क्या बात है!! अतिशय सुंदर
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क गुरुवार, 09/12/2019 - 08:51 नवीन
आता तो फक्त एक बागुलबुवा होता असे वाटते. आता सगळ्याच बाबतीत फक्त साक्षीदार या नात्याने जोडला जातो (आणि या साक्षीभावाचे प्रयोजन काय इतकाच विचार मनात असतो,) कारण नाविन्य असे काही नाहीच. वार्धक्य इतरांचे जवळून पाहिलेले म्हणून तेही अपेक्षितच अन... बालपण, तरुणपण स्वतःच अनुभवलेले म्हणून ते ही ताजे नाही. त्यामुळे हा साक्षीभाव पोसून करायचे काय, टाळून करायचे काय हा एक प्रश्नच आहे ? अर्थात शोध चालूच ठेवला की उत्तरे मिळतात खरी :)
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 09/25/2019 - 11:00 नवीन
:-) भारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
र
रातराणी Wed, 09/18/2019 - 06:49 नवीन
सुरेख!!
  • Log in or register to post comments
र
रिकामटेकडा Tue, 09/24/2019 - 13:53 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 09/25/2019 - 10:59 नवीन
आवडली! :-)
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 09/28/2019 - 04:37 नवीन
सर्व रसिकांचे आभार ...
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा