ड्रोनातिरेक आणि इराण सौदी संघर्ष तापण्याची शक्यता
सौदीतील सर्वात मोठ्या तेल सुविधेवर ड्रोनच्या सहाय्याने हल्ला केला गेला आणि आमेरीकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणला जबाबदार धरल्याची बातमी वाचली तर ड्रोन म्हणजे चालक विरहीत विमान नव्हे तर ड्रोन नावाने वापरल्या जाणार्या फिरत्या तबकड्यां वापरल्या गेल्या याची खात्री करणेही अवघड गेले एवढा ड्रोन शब्द दोन्ही बाबींसाथी एकसारखा वापरला जातो.
इराणचा इराक व्यतरीक्त इतर देशांसोबत कोणताही मोठा सिमा विवाद नाही -इराक स्वतःही तसे शिया बहुल राष्ट्र आहे आणि सध्या कमकुवत सुद्धा त्यामुळे सध्या तोही इराणसाठी मोठा प्रश्न नाही.. एकमेव शिया राष्ट्र असल्यामुळे सुन्नी बहुमतापुढे थोडे फार एकटे पडले तरी बाकी जगाशी संघर्ष टाळून गुण्या गोविंदाने जगू शकले असते. पण ते न करता - शांतता धर्मीय धर्मांधता -सत्तेवर आल्यापासून गेली चाळीस वर्षे सातत्याने सौदींना पाण्यात पहाणे, इज्राएल विरोधी दहशतवादी संघटनेस साहाय्य पुरवणे ते गेली काही वर्षे येमेन मधील हाऊथी दहशतवादी संघटनेस सहाय्य पुरवणे इत्यादी उपद्व्याप करत आले आहे. तसे एकटे पडलेल्या इराणला अगदी अलिकडे कतार आणि तुर्कस्थानातून सहानुभूती मिळते, आमेरीकेच्या स्पर्धक म्हणून रशिया आणि चिनही जराशी सहानुभूती दाखवत असणार. पण तरीही इराणची अण्वस्त्र बाळगण्याची गरज आनि इच्छा सुद्धा अनाकलनीय आहे. एखादे नवे युद्ध ओढावून घेण्यास सध्या आमेरीकी जनमत अनुकूल नाही गल्फ मधील देशांकडे युरोमेरीकेने पुरवलेली युद्ध विमाने आणि शस्त्र सामग्री असली तरी जमिनी सैन्याचा अभाव आहे. सौदी स्वसंरक्षणासाठी पाकिस्तानचे जमिनी सैन्य वापरते पण पाकीस्तान ते सैन्य सौदी सिमांच्या पलिकडे वापरु देत नाही तसेच शिया इराण सोबत पाकीस्तान पंगा घेण्याची हिम्मत करु शकत नाही.
सौदीतील तेल सुविधेवर तबकडी ड्रोनांच्या साहाय्याने हल्ला केल्याचा येमेन मधील इराण समर्थित हाउथी दहशतवाद्यांनी दावा केला आहे. आताशा दहशत वाद्यांकडेही आधुनिक तंत्रज्ञानाधारीत उपकरणे आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा वाढताना दिसतो आहे. तरीही येमेन सारख्या दूर ठिकाणी बसून सौदी तेल विहरींवर तबकडी ड्रोण कसे चालवले जाऊ शकतात हे कोडे तुर्तास तरी औघड वाटते तबकडी ड्रोनांना मर्यादीत उर्जेवर एवढी अंतरे कशी कापता येऊ शकतात ? आणि हे खरे असेल तर जगभरासाठी हि चिंतेची बाब आहे. एकतर कमी उंचीवरून या तबकड्या जाऊ शकत असल्यामुळे विमानाम्ना ओळखणार्या रडारच्या कक्षेस चुकवून पुढे जाऊ शकत असाव्यात हवेतून पोह्चवून कसा आणि कुठे हल्ला चालवला जाइल हे सांगणे कठीण आणि त्यांच्या साहाय्याने केवढे नुकसान पोहोचवले जाऊ शकते हे सौदी तेल विहिरींवरील हल्ल्याने दाखवून दिले आहे. या तबकड्या ड्रोनांच्या धोक्यांपासून स्वतःस सुरक्षित कसे ठेवावे याचा भारतीयांनीही अॅडव्हान्स मध्येच विचार करावयास हवा.
दहशतवाद्यांचा असा हल्ला झाल्यास पुलवामा बाबत भारताने पाकीस्तानला जसे जबाबदार धरुन बालाकोटवर हल्ला केला तसे करण्यावाचून सौदी पुढे दुसरा कोणता पर्याय शिल्लक असू शकतो . ड्रोनातिरेकाच्या सरळ इराणविरुद्धच्या बदल्याची सौदीने अद्याप भाषा केली नाही हे खरे असले तरी असे तेल विहिरींवर असे हल्ले सौदी खूपकाळ प्चवू शकणार नाही जमिनी सैन्याच्या अभावी इराणवर मोठा विजय सौदीम्ना मिळवणे शक्य नसले तरी आमेरीकेने पुरवलेली युद्ध विमाने इराणला भारी पडतील आणि आमेरीकी आर्थिक नाकेबंदीने आधीच जेरीस आलेल्या इराणची स्थिती सौदी हवाई हल्ल्यापुढे आणखीच वाईट होईल . आमेरीकी अध्यक्षांना स्वतःच्या जनता आणि संसदेची इराण सोबत युद्धास परवानगी मिळण्याची अपेक्षा नसताना सौदींनी इराण सोबत हवाई युद्ध केल्यास आमेरीकी अध्यक्षांची आयती सोय होईल . इराणने स्वतःची स्थिती मजबूत नसताना येमेनी दहशतवाद्यांना एवढे हाता बाहेर का जाऊ दिले हे समजणे अवघड आहे. पण सौदी यावेळी इराणला मोठी किंमत मोजण्याचा सहज आग्रह धरु शकतील, ती काय आणि कशी असेल ते नजिकच्या काळात कळेलच .
अर्थात दहशत वादाने एवढे परेशान असुनही युरोमेरीका शस्त्रास्त्राम्च्या व्यापारावरच का नियंत्रण आणून दहशतवाद्यांच्या हातात आधूनिक शस्त्रे आणि तंत्रज्ञान पडणार नाही हे का पाहू इच्छित नाही हे समजत नाही. सॅटेलाईट्मधून टाचणीपण दिसते म्हणतात आणि इथे अतिरेक्यांच्या हातात रॉकेटसारखी अत्याधुनिक शस्त्रसामुग्रीही आढळते .. हे थांबवले का जात नाही ह्याबाबत युरोमेरीकन नागरीक दबाव का बनवत नाहीत हा प्रश्न फिरुन फिरुन पडत रहातो.
भारताच्या दृष्तीने कोणत्याही दहशतवादी संघटनांच्या हात मजबूत होणे श्रेयस्कर नाही. इराणसोबतचे भारतिय संबंध म्हणजे तोंड दाबून सहन करणे प्रकारात आहे. अफगाणीस्तानला मदत पोहोचवण्यासाठी इराणमधला रस्ताही जिवंत ठेवणे भाग आहे. दुसरीकडे आमेरीका इराणसोबत भारतीय सरकारी संबंधाने खट्टू होते. सरकारात राहून इराणच्या धर्मांध आंतरराष्ट्रीय खेळांबाबत काही बोलता येत नाही पण भारतीय विरोधी पक्षांनी आणि माध्यमांनी इराणी सरकार समोर प्रष्न उपस्थित करण्याची गरज असावी असे वाटते. असो.
* अनुषंगिकाव्यतरीक्त आवांतरे, व्यक्तीगत टिका, शुद्धलेखन सुचवण्या टाळण्यासाठी चर्चा सहभागासाठी अनेक आभार
बुद्धीला बरेच अधिक ताणावे लागत नाही ना अशी शंका वाटतेआंतरराष्ट्रिय राजकारणात "बुद्धीला बरेच अधिक ताणावे लागेल" असेच डावपेच आखले जातात... तेथे, आपली सगळी पाने उघडी करून खेळणे, बुळेपणा/निर्बुद्धपणा समजला जातो व खात्रीशीरपणे ठरतोसुद्धा. आंतरराष्ट्रिय राजकारण केवळ सत्य, नितीमत्तेच्या गप्पांवर आणि सरळ तर्कांवर खेळले जात नाही. पाकिस्तानचा गेल्या ६० वर्षांचा व्यवहार डोळ्यासमोर असूनही अनेक भारतियांना हे उमगत नाही, हीच या कौटिल्य आणि (गनिमी काव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या) शिवाजी महाराजांच्या भूमीची सर्वात मोठी शोकांतिका आहे. :(इराण बद्दल एवढे प्रेम का येत आहे ?हा प्रश्न माझ्यासाठी असला तर, तो अत्यंत बिनबुडाचा आहे हे नक्की. =)) कारण, इराणबद्दल मी कधी व कसे प्रेम दर्शविले आहे हे दाखवता येईल का ? "आंतरराष्ट्रिय राजकारणात कायमचे मित्र/शत्रू नसतात, केवळ स्वराष्ट्राचे हितसंबधच ते काय कायमचे असतात. हे तत्व ज्यांना समजते ते देश/नेते यशस्वी ठरतात आणि ज्यांना समजत नाही ते बुळे/मुर्ख समजले जाऊन अयशस्वी होतात." ही सार्वकालीक-सार्वस्थलिक वस्तूस्थिती वारंवार सांगूनही काही लोकांना जर ते समजत नसेल तर त्याला मी जबाबदार नाही. १. जर इराणच्या भूमीवरून ड्रोन सोडले गेले असा तुमचा दावा असेल (किंवा त्या दाव्याला तुमचा पाठींबा असला) तर तो का व कसा फोल आहे याची सविस्तर मिमांसा मी माझ्या पहिल्या प्रतिसादांत केली आहे... हे तुमच्या नजरेतून सुटले आहे की ते तुमच्या दाव्यांना सोईचे नाही म्हणून तिकडे दुर्लक्ष केले आहे ? २. तसेच, त्याच प्रतिसादाचे सार लिहितानाअ) इराणप्रणित येमेनच्या भूमीवरून किंवा तडक इराणच्या भूमीवरून, यापैकी कोणत्याही ठिकाणावरून हल्ला होणे शक्य नाही. पण, सौदीत घुसलेले इराणप्रणित हस्तक किंवा इराणच्या मदतीने/मदतीशिवाय स्थानिकांपैकी कोणी हल्ला केला असेल, हा तर्क वास्तविकतेच्या जास्त जवळ असेल.मी असे लिहिले आहे... हे सुद्धा तुमच्या नजरेतून सुटले आहे की ते तुमच्या दाव्यांना सोईचे नाही म्हणून तिकडे दुर्लक्ष केले आहे ? त्यातला महत्वाचा भाग, परत नजरेतून सुटू नये यासाठी, इथे ठळक केला आहे, जो "इराण प्रेमाचा तुमचा दावा" किती पोकळ आहे, हे स्पष्ट करतो आहे. =)) साप साप म्हणून आपल्या मनानेच सोईचा निष्कर्ष काढून एकाच ठिकाणची भुई धोपटत राहिल्याने, साप सापडत नाही... प्रथम त्याचे लपण्याचे सर्व पर्याय तपासून शोध घ्यावा लागतो... कारण, साप तुमच्या "खाजगी तर्कावर (प्रायव्हेट लॉजिकवर)" अवलंबून लपायचे ठिकाण ठरवत नाही ! ;) :) *************** तुमची एकेरी शेरेबाजी पाहता, तुम्ही भारत-इराण संबंधांचा अभ्यास वाढविण्याची जरूरी आहे, असे वाटते. त्यासाठी सुरुवात करायला बीजस्वरूपी थोडे काही इथे देत आहे... १. भारत इराणकडून तेल घेतो ते, इराण स्वस्त आणि जवळचा पर्याय आहे यासाठीच, याबाबत तुमच्या मनात शंका असली तरी माझ्या मनात अजिबात नाही. २. भारत इराणमधील छाबाहार बंदर विकसित करत आहे ते केवळ पुढील कारणांसाठी आहे : (अ) चीनच्या ग्वादार बंदर विकसित करून भारतिय महासागरात वर्चस्व प्रस्थापित करण्यास आडकाठी करण्यासाठी, (आ) तेलावाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या अरबी खाडीच्या प्रवेशद्वाराजवळ चीनचे वर्चस्व कमी करण्यासाठी, आणि (इ) पाकिस्तानला टाळून अफगाणिस्तानबरोबर, खुष्किचा सुरक्षित आणि कमी खर्चाच्या मार्गाचा दूरगामी पर्याय अनिवार्य आहे, यासाठी. बाकी सर्व "शेकडो वर्षांचे जुने मैत्रीचे आणि सांस्कृतिक संबंध" वगैरे 'बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात' आहेत. ते माध्यमांत आणि वेळप्रसंगी संयुक्त विधानांत बोलायला-लिहायला-वाचायला फार छान असतात... त्यापेक्षा त्यांचा जास्त अर्थ लावणे येडबंबू (नाईव्ह) प्रकार होईल. :) ३. हे सर्व नीट समजण्यासाठी खालील किमान दोन विषयांच्या इतिहासाचा अभ्यास जरूरी आहे... अ) अमेरिकेशी संबंध बिघडले की, इराणचे भारताबद्दलचे उधाणाला येणारे प्रेम (पक्षी : तेल स्वस्तात आणि भारतिय चलनात देणे, तेलसाठ्यांचे विकसन करण्याचा आग्रह, छाबाहार प्रकल्पात अधिक सवलती देणे, इ) आणि आ) अमेरिकेशी संबंध जरा बरे झाले की, इराण भारताशी करत असलेला तिरसट व्यवहार (पक्षी : तेलाचे भाव वाढवणे, भारतिय कंपन्यांशी बोलणी चालू असलेल्या तेलसाठ्यांचे विकसन अधिकार रशियन तेलकंपन्यांना देणे, छाबाहार प्रकल्पात अधिक अटी घालणे, इ) वरील अभ्यास केलात तर... (अ) 'अमेरिका+खाडी राष्ट्र' आणि इराणबरोबरचे संबंध ताणलेले राहणे, (आ) 'पाकिस्तान-इराण' संबंध ताणलेले राहणे, आणि (इ) अमेरिकेने इराणला (कोणत्या कारणाने का होईना) सतत धाकात ठेवणे, इ भारताच्या का व किती फायद्याचे आहे, हे समजायला मदत होईल. अर्थातच यासाठी भारताला स्वतंत्रपणे काहीच करायची गरज नाही... संबंधीत राष्ट्रांचे परस्परविरोधी हितसंबंध त्यांना ते करायला भाग पाडत आहे. भारताने अमेरिकेचा विरोध पत्करून (किंवा पत्करत आहोत असे दाखवत) इराणशी "तथाकथित प्रेमसंबंध" चालू ठेवणे पुरेसे आहे... कारण काही का असेना, अमेरिकेचा इराणवर जेवढा जास्त दबाव असेल, तेवढे इराणचे भारतावरचे प्रेम उतू जाईल. ;) :) मात्र, "आंतरराष्ट्रिय राजकारणात कायमचे मित्र/शत्रू नसतात, केवळ स्वराष्ट्राचे हितसंबधच ते काय कायमचे असतात. हे तत्व ज्यांना समजते ते देश/नेते यशस्वी ठरतात आणि ज्यांना समजत नाही ते बुळे/मुर्ख समजले जाऊन अयशस्वी होतात." हे तत्व विसरण्याचा मूर्खपणा भारताने टाळाणे अत्यंत आवश्यक आहे, बस्स !सौदी कडून पुरस्कार मिळतो, ट्रम्प मेळाव्याला उपस्थित रहातात तरी इराणचे पारडे जड याचे रहस्य काय ?असे विनोदी प्रश्न विचारायला स्वतःलाच संकोच वाटू लागेल, इतके मात्र नक्की ! =))आपण माझ्या ज्या प्रतिसादावर मेगाबाईटी प्रतिसाद दिला तो मेगा बाईटी नव्हतामेगॅबाईटी प्रतिसादावर केवळ तुमचाच प्रताधिकार नाही, हे सिद्ध करण्यासाठी तसे केले आहे. ;) :) (हघ्याहेवेसांन)आता सांगा कोणाचा पाय कोणाच्या पायात आहे? आणि हे कडबोळं कसं सोडवायचं?