Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गंध अद्वैताचे

म — मायमराठी, Mon, 09/23/2019 - 06:29
केसांचे हळवे वळसे पाठीवर सळसळ हलके सुटण्या धडपडती ओले जणू कामशराचे चेले मानेला लटके मुरके ज्याने सगळे वेढे सुटले मग कुंतलसंभाराचे जणू प्रपात ते कोसळले धुंद मोगरा हसे साजरा गंधित झाला तुला माळता क्षण शारीर करुनी गेला मादकतेचा कोरा गजरा चढता लाली तुझ्याच गाली अवचित होई गोरामोरा केशी लपवुनी अंग मखमली चेहरा झाके विसरुनी तोरा सुमनदलांची तनू थरथरे मुग्ध मोकळी चुरगळ पसरे उन्मनी तुझे हास्य मोहरे गात्रीं तुझिया लक्ष मोगरे धवलपुष्पी सुख उन्मळे कुसुम हरपले मुरून गेले भारुनी काया तुझी परिमळे उरले गंधांचे अद्वैत आगळे । - अभिजीत

प्रतिक्रिया द्या
3191 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ज
जयंत कुलकर्णी Mon, 09/23/2019 - 12:58 नवीन
मस्त... !
  • Log in or register to post comments
म
मायमराठी Wed, 09/25/2019 - 06:27 नवीन
प्रतिसादाबद्दल अनेकानेक आभार
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/25/2019 - 06:33 नवीन
चढता लाली तुझ्याच गाली अवचित होई गोरामोरा केशी लपवुनी अंग मखमली चेहरा झाके विसरुनी तोरा
अहाहा ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मायमराठी गुरुवार, 09/26/2019 - 05:46 नवीन
अन्न, वस्त्र, निवारा या व्यतिरिक्त पाठ थोपटली जाणे ही फार महत्त्वाची गरज असते. अर्थात त्या कुवतीचे काम असायला हवं. सर, आपला अभिप्राय " वारी" पासूनच फार आदरणीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा