Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१९

ध
धर्मराजमुटके
Tue, 10/01/2019 - 06:55
🗣 90 प्रतिसाद
नमस्कार ! चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१९ च्या नव्या पानावर आपणा सर्वांचे स्वागत ! या महिन्यात नवरात्र, दसरा, दिवाळी सारखे सण आपण साजरे करणार आहोत त्यामुळे एकंदरीत महिना आनंदाचा असेल अशी आशा बाळगतो. वैयक्तीक रित्या मला स्वतःला हा महिना नेहमीच त्रासाचा जातो. व्यवसाय करणार्‍याला अनेक जणांना खुश ठेवावे लागते. दिवाळी हा महिना ग्राहकांना भेट देण्याचा महिना असतो. त्यामुळे घरातील खरेदी, ग्राहकांना द्यायच्या भेटींची खरेदी ह्यात आर्थिक नियोजनाचा कस लागतो. बरेचसे ग्राहक कॉर्पोरेट क्षेत्रातील असल्यामुळे देण्यात येणार्‍या भेटवस्तू देखील त्या दर्जाच्या असाव्या लागतात. बर्‍याच उद्योगांच्या पॉलीसीनुसार कर्मचार्‍यांना आपल्या विक्रेत्यांकडून एका ठराविक प्रकारच्या / किमतीच्या वरच्या भेटवस्तू घेता येत नाहीत. बर्‍याचशा उद्योगांनी आपल्या कर्मचार्‍यांना अशा भेटी स्वीकारू नयेत असे धोरण बनविलेले असते मात्र हे सगळे असले तरी भेटवस्तू न देण्याच्या पर्याय अजूनतरी भारतीय विक्रेत्यांना १००% उपलब्ध आहे असे म्हणता येणार नाही. भेटवस्तू स्वीकारणारे देखील उघड अपेक्षा ठेवत नाहीत मात्र दिवाळी आली की मनातून अपेक्षा ही असतेच. हितसबंध जपणे हा भेटवस्तू देण्यामागचा मुळ उद्देश्य असला तरी काही ग्राहक खरोखरीच इतके चांगले असतात की त्यांना भेटवस्तू देता यावी असे व्यावसायिकांना मनापासून वाटते. भेटवस्तू विकत घेताना डोक्याला खुपच ताण द्यावा लागतो. ती वस्तू अगदी हलकी वाटली नाही पाहिजे, अगदी महाग नको, आपल्या खिशालाही परवडली पाहिजे, एकंदरीतच उभयतांना आनंद झाला पाहिजे ह्यासाठी खुपच कसरत करावी लागते. अगदी वर्षभर नियोजन केले तरी शेवटच्या क्षणी मन म्हणेल आणि खिसा होकार देईल अशीच वस्तू खरेदी केली जाते. पुर्वी मिठाई वाटण्याचा प्रघात होता मात्र विषबाधेच्या वाढत्या बातम्या, भेसळ इत्यादींमुळे मिठाईचे मार्केट सध्या कमी झाले आहे.त्याची जागा विविध आकर्षक चॉकलेटसने घेतली आहे. सुंदर सुंदर वेष्टनांत पॅक केलेली चॉकलेटस मनाला भुरळ पाडतात. वेष्टन मोठे आणी आतमधे कमी प्रमाणात माल असलेली चॉकलेटस भेट देणे हाच मला सध्या योग्य पर्याय वाटतो. ग्राहकाला भेट देताना कर्मचार्‍यांना विसरुन चालत नाही. मी प्रथमपासूनच कर्मचार्‍यांना नियुक्त करतांना माझ्याकडे बोनस मिळत नाही हे सांगूनच कामाला ठेवतो त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा निर्माण होत नाही मात्र दिवाळीत भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न करतो. मागील काही वर्षांपासून मी स्वतःच १०-१२ वस्तू निवडून एक "गिफ्ट हँपर" बनवतो. त्यातील वस्तू रोजच्या उपयोगातील पण थोड्याश्या 'लक्झरी' वर्गातील असतील अशा असतात. आधी ग्राहक, मग कर्मचारी यांच्यानंतर आई-वडील, बहीण,भाचा, मुलगा आणि बायको आणि यांचा अनुक्रम येतो. त्यांची खरेदी झाल्यावर मग पैसे उरलेच तर स्वतःची दिवाळी असा क्रम असतो. कधीतरी (केवळ) दुसर्‍यांच्या आनंदातच आपला आनंद सामावलेला असतो या उक्तीचा आनंद घेता येतो. मी स्वतःबद्द्ल लिहिले असले तरी थोड्याफार फरकाने प्रत्येक कुटूंबप्रमुखाची हीच कथा असते यात शंका नसावी. धागा चालू घडामोडींचा असला तरी दिवाळी निमित्ते भावनावेगाने फारच अवांतर झाले. आता मुद्यांकडे येऊया.... १. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरचे दोन केंद्र शासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. आजपासून त्यांच्या सुनावणी सुरु होतील. २. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील काही तरतुदी शिथील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता. या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल बहुधा आज लागेल. ऐन निवडणूकीच्या वेळेत निकाल लागला तर कोणत्या पक्षाला फायदा आणि कोणाला तोटा होईल हे बघणे रोचक ठरेल. ३. सरकारने कांदा महाग झाल्यामुळे त्याची निर्यात थांबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधकांनी हे सरकार शेतकरीविरोधी आहे असा आरोप केला आहे. एकंदरीत कधी कधी सरकार चालविणार्‍या पक्षापेक्षा विरोधी पक्षात बसणे मजेचे असते असे वाटते. ४. देशभरात मंदीची ओरड चालू असताना मारुती रोज नवेनवे मॉडेल बाजारात उतरवत आहेत, मॉरीस गॅराज, किया सेल्टोज सारख्या नवीन कंपन्या भारतात येत आहेत. मॉरीस गॅराज ने तर मंदीच्या काळात देखील आपल्या हेक्टर या गाडीची किंमत २०,००० रुपयांपासून वाढविली आहे असे वाचनात आले. ५. देशात सध्या आर्थिक मंदीचं वातावरण असून वस्तूंच्या मागणीतही घट झाल्याचं म्हटलं जात आहे. अशातच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनी मात्र आपल्या फेस्टिव्ह सेलच्या माध्यमातून मोठी कमाई केल्याचं समोर आलं आहे. शनिवारपासून ॲमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ची सुरूवात झाली. यादरम्यान केवळ 36 तासांमध्ये ॲमेझॉनकडून 750 कोटी रूपयांचे मोबाईल विकल्याचा दावा करण्यात आला आहे. तर फ्लिपकार्टनंही सुरू केलेल्या ‘बिग बिलियन डे’ च्या पहिल्याच दिवशी दुपटीपेक्षाही अधिक नफा मिळवल्याचा दावा केला आहे. हे ७५० कोटी रुपयाचे मोबाईल खरेदी करणारे कोण आहेत ? मी सरकारच्या पक्षाचा किंवा विरोधक नाहीये पण मला खरोखरीच प्रश्न पडतो की खरोखर मंदी आहे काय ? एकीकडे लोक ७५० कोटीचे मोबाईल २ दिवसात खरेदी करत आहेत पण ऑटॉ सेक्टर वाले रडत आहेत. नक्की मंदी आहे की रस्त्यांची दुर्दशा, सार्वजनिक वाहनांची वाढती उपलब्धता यामुळे ग्राहक ऑटॉ सेक्टर पासून दूर जात आहे ? माझ्याकडे देखील स्वतःची गाडी आहे पण आजकाल गाडी रस्त्यावर काढायची हिंमत होत नाही, खड्डे, ट्राफिक जाम मुळे मुंबईच्या कोणत्याही एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जायचे तर कमीत कमी २-२.३० तास सहज निघून जातात. खिशात पैसे असले तर ओला उबेरचा वापर केला जायचा मात्र सध्या शहरात सिटीप्लो, गोक्रुझ, शटल सारख्या वातानुकुलीत बसेसचा पर्याय उपलब्ध झाला आहे. १००-१२५ रुपयात घरापासून बर्‍याच ठिकाणी प्रवास करता येतो त्यामुळे हा पर्याय जास्त आकर्षक वाटतो आहे. मेट्रोचा प्रवास हा देखील एक आरामदायक पर्याय आहे. सध्या त्याचा आवाका कमी असला तरी ४-५ वर्षात बर्‍याच ठिकाणी मेट्रोचे जाळे पसरले असेल तेव्हा गाडीची गरज कितपत भासेल ही शंका आहे. असो. तर नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! ता. क. दिवाळी विशेषांकाची वाट पाहत आहे. दिवाळी विशेषांक आला रे आला की मी नेहमी एक प्रश्न विचारतो की आता याची पीडीएफ आवृत्ती कधी ? सं.मं. यावर्षी सुरुवातीलाच पीडीएफ अंक प्रकाशित करुन आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्का देईल काय ? पीडीएफ अंक जपून ठेवणे, ऑफलाईन वाचता येणे, मित्रमंडळींना पाठवून मिपाचा प्रसार करणे या कामी उपयुक्त ठरतो.
वर्गीकरण
समाजकारण बातमी

प्रतिक्रिया द्या
59721 वाचन

💬 प्रतिसाद (90)
ड
डँबिस००७ Sun, 10/13/2019 - 05:16 नवीन
रामजन्म भुमी विवादावर आता सु को चा निर्णय येऊ घातलेला आहे, अजुन आलेला नाही ! भारतीय जनतेच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या ह्या प्रकरणासाठी गेली ८० वर्षे कोर्टात लढा सुरु आहे. ह्याच प्रकरणावर आत मुस्लिम फाॅर पीस नावाच्या संघटनेने नविन पवित्रा घेतलेला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, " सु को आता बाबरी मस्जिदला स्विकारुन राम जन्म भुमिच्या लढ्याला विराम देणार आहे. तरी सुद्धा ह्या सरकारात बाबरी मस्जिद परत उभारणे शक्य नाही. त्यामुळे मुस्लिमांनी मोठ्या मनाने हिंदुंना राम जन्म भुमिची जमिन भेट म्हणुन द्यावी. त्यामुळे दोन्ही समाजात सलोखा राहील व मथुरा काशी सारख्या ४० हजारावर मंदीर तोडुन मस्जिद बांधलेली आहेत त्यावर हिंदुंना दावा करता येणार नाही. " ह्या सर्वामागे मुस्लिम समाजातले उच्चभ्रु लोक शामिल आहेत. त्यात नसीरुद्दीन शहाचा भाउ जमिर उद्दीन शहा सुद्धा आहे. आता सामाजिक सलोख्याच्या बाता मारणार्या जमिर उद्दीन शहाने गुजराथ दंग्यावर भडकवणारे पुस्तक लिहीलेले आहे! गेली ८० वर्षे बाबरी — राम जन्म भुमी विवाद कोर्टात लढला गेला , आता हरायची वेळ आलेली आहे आणि आता ह्यांना ती जमिन हिंदुंना भेट द्यायची आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sun, 10/13/2019 - 06:02 नवीन
१७ नोव्हेंबर पर्यंत बाबरी केसचा निकाल लागला तर तो एक चमत्कारच म्हणावा लागेल असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय. अन हो, नसिरुद्दीन शहाचा भाऊ नाव लिहिताना "लेफ्टनंट जनरल जमीरुद्दीन शहा" लिहिले असते तर बरे ! भारतीय थल-सैन्याचा उप-प्रमुख, प्रणाली आणि मनुष्यबळ (सिस्टिम्स अँड पर्सोनेल) म्हणून निवृत्त झालेला शिपाई आहे तो, उगाच अपमानास्पद उल्लेख करायचा असेल तर पूर्वी केलेली देशसेवा विसरू नये इतकेच म्हणणे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ड
डँबिस००७ Sun, 10/13/2019 - 17:46 नवीन
पूर्वी केलेली देशसेवा ईतक्या मोठ्या पुंजीवर पुढे काही करण्याची परवानगी मिळते हे माहीती नव्हते !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ग
गोंधळी Sun, 10/13/2019 - 07:54 नवीन
GST might have flaws देशातल्या मोठ्या सुधाणेत (जो खुप good and simple आहे) त्रुटी आहेत. अखेर मान्य केल. https://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/gst-might-have-flaws-and-i-am-sorry-for-that-finance-minister-nirmala-sitharaman/articleshow/71544935.cms
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 10/13/2019 - 20:15 नवीन
अयोध्येत जमावबंदीचा आदेश लागू झालाय का?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 10/14/2019 - 10:24 नवीन
बातमी : https://www.loksatta.com/desh-videsh-news/ayodhya-land-case-section-144-imposed-in-ayodhya-till-december-10-ahead-of-verdict-aau-85-1992433/ -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
उ
उपेक्षित Wed, 10/16/2019 - 09:17 नवीन
मंडळी शरद पोक्षेंची माझा कट्ट्यावरची मुलाखत पाहा आवर्जून, कर्करोगावर मात करून पुन्हा हा पठ्ठ्या प्रयोगाला उभा राहणार आहे. यांना उदंड आणि सुधृड आयुष्य मिळो हि प्रार्थना. जाता जाता - माझा कट्ट्यावरचा तो खांडेकर मुलाखत घेताना समोरच्याचा अपमान होईल असा का बसतो ते त्यालाच माहित आणि प्रश्न सुद्धा इतके विचित्र प्रकारे विचारतो कि असे वाटते कि चौकशी करतोय भाऊ.
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 10/16/2019 - 19:31 नवीन
ए बी पी वाले स्वतः ला अगदी न्यायाधीश वगैरे समजतात, सावरकराबाबत केलेल्या कार्यक्रम सादर केला त्यावेळीच त्यांची पातळीवर, हेतू आणि अक्कल दिवाळखोरी समजून आली आहे. पत्रकारीतेमधील सर्वात विकणारी (वारांगनेसही लाजवील) पातिव्रत्य आव आणणारी वाहिनी आहे ही!!! दूरदर्शन प्रेक्षक पांढरपेशा नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
ज
जालिम लोशन गुरुवार, 10/17/2019 - 12:20 नवीन
ABP हे एक कम्युनिस्ट वार्तापत्र आहे. आणी त्यांचे ऊद्दिष्ट समाजात समानता आणणे आहे. ती समानता म्हणजे सर्व समान गरीब असायला हवे आहे. अश्या वाहिन्याना बघुन त्यांचा TRP न वाढवणे ऊत्तम . कंबोडिआ माॅडेल त्यांना भारतात अप्लाय करायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ग
गोंधळी Wed, 10/16/2019 - 10:06 नवीन
काहीही म्हण्जे काहीही ईथे सगळ सुरळीत चालु आहे, कोटींचे फोन विकले जातायत, सिनेमावाले करोडोंचा व्यवसाय करतायत, लवकरच ५ ट्रिलीयनची अर्थव्यवस्था होणार आहे. हे आकडे का नाही बघत हे लोक? https://timesofindia.indiatimes.com/india/india-falls-to-102-in-hunger-index-8-ranks-below-pakistan/articleshow/71606116.cms
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 10/16/2019 - 16:43 नवीन
एकीकडे भारतात अन्नधान्याचे मुबलक उत्पादन होत असताना त्याच्या असमान वितरणामुळे मोठ्या प्रमाणावर आदिवासी आणि खेड्यापाड्यात बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. वितरण व्यवस्था आमूलाग्र सुधारणे आणि लोकसंख्या वाढीच्या भस्मासुराला आळा घालणे या दोन्ही गोष्टी युद्धपातळीवर करणे आवश्यक झाले आहे.
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन गुरुवार, 10/17/2019 - 12:26 नवीन
अन्नधान्य साठवण्यास आणखी जागा नसल्यामुळे भारत अफगणिस्तानला पंधरा लाख टन गहु भेट म्हणुन देणार आहे. संदर्भ इंडीअन एक्सप्रेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डँबिस००७ गुरुवार, 10/17/2019 - 10:21 नवीन
दोन महीन्यापुर्वी भयंकर मदीची लाट भारतात आलेली होती. पार्ले बिस्किट आपल्या १०,००० कामगारांना कामावरुन काढणार होता. जनतेला ५ रु बिस्किटही विकत घेता येत नाही ईतकी कडक मंदी भारतात आलेली आहे असा प्रचार केलेला होता अस समोर आलेल आहे. त्याच पार्ले बिस्किट कंपनीला ह्या वर्षी ४५० कोटी चा नफा झालेला आहे. गेल्या वर्षी हाच नफा ३७० कोटी होता. पार्ले बिस्किट कंपनीची उलाढाल ह्या वर्षी ९०५० कोटी ची असुन ६.२% ने त्यात वाढ झालेली आहे. https://youtu.be/HRsFXmlven0
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क गुरुवार, 10/17/2019 - 15:16 नवीन
त्यामुळे ही बातमी अत्यन्त रोचक वाटतेय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
थ
थॉर माणूस गुरुवार, 10/17/2019 - 20:56 नवीन
युट्यूबवर पृथ्वी सपाट आहे हे "सिद्ध" करणारे व्हिडीओ पण आहेत... पण तिथे दाखवले आहे म्हणजे मंदी नाही हे खरेच असणार. https://economictimes.indiatimes.com/parle-industries-ltd/quarterly/companyid-2047.cms ह्या आकड्यांची काळजी करायचे काहीच कारण नाही मग... हे त्या व्हिडीओ पेक्षा खरे थोडीच असणारेत? .Mar'19Jun'19Jun'18 Total Income1.371.321.94 बाकी ते व्हिडीओमधले रीझल्ट्स १८-१९ चे आहेत आणि सध्या १९-२० चालू आहे. आत्ता मंदी येऊ शकते त्यावर उहापोह करणे आवश्यक आहे, तेव्हा मंदी नव्हती हे दाखवून काय उपयोग? भारत मंदीच्या लाटेत गेला आहे का? - नाही मंदीसदृश परीस्थीती आहे का? - हो जगभरात मंदीचे सावट दिसत आहे का? - हो भारताने परीस्थीती मान्य केली नाही तर नजीकच्या काळात भारतामधे मंदी येऊ शकते का? - हो पण असा उहापोह करण्यात काय हशील? आपण मनाशी पक्के ठरवायचे हो किंवा नाही ते आणि गुगलबाबाला सांगायचे की बाबा मला माझ्या मताशी जुळणार्‍या लिंका काढून दे मग त्या व्हेरीफाईड सोर्स असोत की नसोत. झाले काम. :) त्यात ही तिमाही उत्सवांची असल्याने थोडी सुधारणा अपेक्षीत आहे रिझल्टस मधे. ते एकदा आले की कुठे आहे मंदी म्हणायला आपण सगळे मोकळे! अजून एखादा पिक्चर २०० कोटी मारून जाईल किंवा कुठे १००० कोटी च्या सेलची बातमी येईलच मग काय बहारच बहार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ज
जॉनविक्क गुरुवार, 10/17/2019 - 23:06 नवीन
युट्यूबवर पृथ्वी सपाट आहे हे "सिद्ध" करणारे व्हिडीओ पण आहेत...
फ्लॅट अर्थ थिअरी ही सिद्ध झालेली नाही ( आणी होणारही नाही हे सांगायला नकोच) या बिंडोकाना अजूनही बीबीसी सारखी वहिनी फुटेज देते हे खरे दुःख आहे कारण पृथ्वी बशी सारखी आहे असे बायबल व बहुतेक कुराण देखील म्हणते आणी यांमुळे यांना मिळणारा पैशाचा ओघही आटत नसावा की हे लोक इतकी महागडी अविज्ञानीक कॅम्पेन चालवतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
म
महेश हतोळकर Fri, 10/18/2019 - 06:24 नवीन
Flat earth society has thousands of followers ROUND THE GLOBE.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
ज
जॉनविक्क Sat, 10/19/2019 - 19:40 नवीन
अलकायदाचेही हजारो फॉल्लोवेर्स आहेत मग काय म्हणता ? खरे तर याक्षणी इंटरनेटही बंद पडले असते पृथ्वी बशी सारखी सपाट असती तर, वाईट इतकेच वाटते BBC सारखी वहिनी याना फुटेज देते. यांचा प्रमुख बलून मधे बसून उडाला आणी खाली आल्यावर म्हणतो की मी पुरेसे उंच गेलो न्हवतो नाहीतर खात्रीने सांगितले असते ती चेंडू सारखी गोल आहे की बशी सारखी सपाट व पसरट. नासा इस्रो बिंडोक आहेत जे पृथ्वी गोल समजून साटेलाईट प्रक्षेपण करतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर
ग
गोंधळी गुरुवार, 10/17/2019 - 19:02 नवीन
माझ्या मते तरी मंदी आलेली नाही पण ती पुढे येउ शकते याची लक्षण मात्र दिसत आहेत. काही आकडेवारी बघितली उदा. टॅक्स कलेक्षण कमी झाले आहे , ईन्डस्ट्रियल प्रोडक्षण तळात गेलेल आहे , वाहन उद्योगात सध्या मंदी अस्ल्यामुळे त्या संलग्न असलेल्या उद्योगांवर त्याचा परीणाम झाला आहे , रियल ईस्टेट क्षेत्रात मागील काही कालापसुन स्लोडाउन असल्यामुळे व बँकिंग क्षेत्राला अनुत्पादीत मालमत्तांचा प्रश्न भेडसावद असल्यामुळे रोख तरलतेची समस्या मार्केटमधे आहे. त्यात नवीन रोजगार निर्माण होत नाहि आहेत. ह्या सगळ्याचा परीणाम म्हणुन जीडीपी मल्टी ईयर लो वर आला आहे. ही मंदी सद्रुष्य परीस्थिती आहे असे म्हणु शकतो. यावर योग्य उपाय योजना न केल्यास मात्र मंदी येउ शकते.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 10/17/2019 - 21:44 नवीन
>>>>>ही मंदी सद्रुष्य परीस्थिती आहे असे म्हणु शकतो. यावर योग्य उपाय योजना न केल्यास मात्र मंदी येउ शकते. <<<<<< अर्रे व्वा !! मंदी सद्रुष्य परीस्थिती आहे असे म्हणु शकतो ? आता पर्यंत अगदी ठाम पणे म्हणत होते तुम्ही !! अश्या वागण्याने देशातल्या व बाहेरच्या शत्रुलाच मदत होते !! देशातले शेअर बाझार हे खुप संवेदनशील असतात . अश्या अफवांमुळे शे. बाझार खाली जाउ शकतो, ज्याच्या मुळे परत मंदी सदृृृृृृष्य परिस्थिती तयार होते ज्यामुळे भारतात परदेशी गुंतवणुकीचा दर मंदावतो, विकास मंदावतो. पार्ले बिस्किट सारख्या कंपन्यांनी अफवा पसरवुन स्वःताच नुकसान करुन घेतलेल आहे. जेंव्हा १०,००० कामगार कामावरुन काढणार अशी बातमी आली त्यावेळेला पार्ले बिस्किट कंपनीने प्रेस काॅंफेंरेंस घेउन बातमी खोडली पाहीजे होती. अशी खोटी बातमी पसरवुन पार्ले बिस्किट कंपनीला काय फायदा झालेला आहे ह्याचा शोध पत्रकारांनी लावला पाहीजे !
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Fri, 10/18/2019 - 07:33 नवीन
अर्रे व्वा !! मंदी सद्रुष्य परीस्थिती आहे असे म्हणु शकतो ? आता पर्यंत अगदी ठाम पणे म्हणत होते तुम्ही !! ओ भक्त डँबिस००७ साहेब मी असे कुठे म्हणालो होतो दाखवाल का??? ओ आपल्या भारताची अर्थ्व्यवस्था export oriented नाही आहे तर Domestic consumption वर जास्त करुन चालणारी आहे. आपल्या देशात खुप सण साजरे केले जातात जे खरेदीला प्रोस्ताहन देतात. त्यामुळे भारतात सध्या स्लो-डाउन असले तरी मंदी येण्याची शक्यता कमी आहे. सध्याच्या स्लो-डाउन मध्ये सरकाचा वाटा ५० टक्के आहे कारण की नोटबंदीचा चुकलेला निर्णय व घाईत केलेली सदोष GST ची अंमलबजावणी. ह्या दोन निर्णयाने आपल्या अर्थ व्यवस्थेला फटका बसलेला आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 10/19/2019 - 13:15 नवीन
UP DGP, OP Singh said, "A joint team of UP and Gujarat Police has detained 3 persons & interrogating them. Their names are Maulana Mohsin Sheikh, Faizan, & Khurshid Ahmed Pathan. Two other accused were also detained but released later, they are being monitored." The gruesome murder of the president of a little-known Hindu Samaj Party at his home in Khurshed Bagh in Lucknow has created outrage with demands for swift justice and allegations of police inaction. Kamlesh Tiwari was brutally murdered at his home at Khursheda Bagh in Lucknow on Friday
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 10/19/2019 - 13:16 नवीन
शांतता प्रिय धर्माच्या लोकांनी कमलेश तिवारीला ठार मारले ! पण अर्बन नक्षली पत्रकारांना काही दिसत नाही . त्या सोनम कपुरला , स्वरा भास्करला काहीच दिसत नाही.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 10/19/2019 - 13:16 नवीन
शांतता प्रिय धर्माच्या लोकांनी कमलेश तिवारीला ठार मारले ! पण अर्बन नक्षली पत्रकारांना काही दिसत नाही . त्या सोनम कपुरला , स्वरा भास्करला काहीच दिसत नाही.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 10/19/2019 - 13:54 नवीन
शांतता प्रिय धर्माच्या लोकांनी कमलेश तिवारीला ठार मारले !Maulana Mohsin Sheikh, Faizan, & Khurshid Ahmed Pathan. ह्यांना सुरत मधुन पकडल आहे. NDTV : ह्या निष्पाप मुसलमान लोकांना निष्कारण अडकवले जात आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 10/19/2019 - 13:54 नवीन
कमलेश तिवारी विरूद्ध सुरतच्या मौलवीने फतवा जारी केलेला होता की ईस्लाम बद्दल अल्ला बद्दल अपशब्द काढलेले असल्याने कमलेश तिवारी मृृृृृत्युदंड दिला पाहीजे. लगेच कार्यवाही करण्या साठी काही लोक पुढे येतात. हेच हिंदु देव देवतां बद्दल बोलल तर मात्र स्वःता हिंदु सकट कोणालाच फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 10/19/2019 - 17:33 नवीन
डँबिस००७, प्रश्न : आपण काय करू शकतो या बाबतीत? उत्तर : मत कोणाला द्यायचं ते कळतं यातनं. २१ तारखेपासनं मतदान आहे ना. जे पक्ष मुस्लिमांचं नेहमी लांगूलचालन करतात त्यांना उखडून टाका. जे पक्ष भ्रष्टाचारास प्रोत्साहन देतात त्यांना उखडून टाका. जे पक्ष हिंदूंमध्ये दुही माजवतात त्यांना उखडून टाका. शिवाजीमहाराज दादोजी कोंडदेवांचा उल्लेख आदरपूर्वक करतात. पण ते केवळ ब्राह्मण असल्याने त्यांच्याविरुद्ध नाहक चिखलफेक करणारी दंभाजी ब्रिगेड ही संघटना कोणाच्या पाठींब्यावर चालते? हे पापी अपत्य कोणाचं? त्यांना उखडून टाका. भेकडकसब,अफजल गुरु यांच्या अवलादी ज्यांच्यामुळे पुष्ट होतील त्यांना उखडून टाका. इक्बाल मिरची या कुप्रसिद्ध दहशतवादी गुंडाला मालमत्ता देणाऱ्या प्रफुल्ल पटेलांना आणि त्यांच्या पक्षाला फुल्लपणे उखडून टाका. बाकी सुज्ञांस अधिक सांगणे नलगे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
उ
उपेक्षित Sat, 10/19/2019 - 16:20 नवीन
२ प्रकारचे व्यवसाय करत असल्यामुळे मंदी आहे हे (हि तर सुरवात आहे असे आमच्यातले मोठे मासे म्हणत आहेत) १००% खरे आहे आणि त्याचा स्वतः अनुभव घेत आहे. साधारण ५/६ दिवसांपूर्वी business whats up ग्रुप वर (सर्व भाषिक/धार्मिक ग्रुप आहे हा) मी सहज मला येत असलेल्या अडचणींबद्दल विषय काढला आणि अहो काय आश्चर्य धडा धड सगळे सेम बोलायला लागले, आमच्या व्यवसायातील प्रस्थापित लोक सुद्धा अन्य करत आहे कि सध्या कठीण कल चालू आहे आणि तो लवकरच सरेल म्हणून. नंतर ४/५ जणांनी माझे अभिनंदन केल कारण मी उघडपणे हि गोष्ट ग्रुप वर कबुल केली कि हो धंदा मंदा है. सो मंदी आहे पण त्यावर उपाय सुद्धा लवकरच होतील अशी आपण सगळे आशा करू.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 10/19/2019 - 22:06 नवीन
आंतरराष्ट्रीय मंदी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा माल पुरवणे ईतकाच स्कोप भारतातले निर्यातक करत असतात. फार तर कृृृृृृषी माल भारतातुन निर्यात होतो ज्याला मंदीची झळ कधीही बसत नाही. भारतातला तयार मालाला जागतिक बाजारात उचल नाही कारण त्याची खालच्या दर्ज्याची गुणवत्ता. अर्थात बर्याच युरोपीयन अमेरीकन कंपन्यांनी भारतात उत्पादन सुरु केलेल आहे त्याचा अपवाद !! काही भारतीय उत्पादक चीनी कंपन्यांना आपला माल हा त्या कंपन्यांसाठी कच्चा माल म्हणुन द्यायचे. चीनी मालाला अमेरीकेच्या आयात प्रतिबंधामुळे मोठा फटका बसलेला आहे. भारतीय हीरा उद्योगाला अचानक मार बसलेला आहे. देशांतर्गत मंदी : भारतीय मालाला फार तर चीनच्या आयात केलेल्या मालाची प्रतिस्पर्धा आहे. भारतीय कृृृृृृषी मालाला मंदीची झळ कधीही बसत नाही. भारतात देशांतर्गत दळणवळणाच्या सुविधा चांगल्या व स्वस्त नसल्याने माल देशाच्या दुरवरच्या प्रदेशात पोहोचु शकत नाही. नेसले, युनिलीव्हरचा माल पोहोचु शकतो कारण ह्या मोठ्या कंपन्यांची ताकद ! पार्ले बिस्किटचे उदा सर्वांनी बघितलेले असेलच. काही महिन्यां पुर्वी ह्याच कंपनीला १०,००० कामगार कमी करावे लागणार अशी अफवा होती. दोन महीन्यां नंतर त्याच पार्ले बिस्किट कंपनीला ४५० कोटी चा फायदा झाला. वार्षिक उलाढाल ९०५० कोटीची झाली. गेल्या वर्षी वार्षीक फायदा ३७० कोटींचा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
उ
उपेक्षित Sun, 10/20/2019 - 13:37 नवीन
दादानू जागतिक पातळीवरचे मला खरच माहीतही नाही आणि रसही नाही त्यात आपल्या इथे आजूबाजूला काय परिस्थिती आहे ते मी सांगत आहे, कारण आज मलेशियाला कसा इंगा दाखवला आणि पाकडे कसे तोंडावर पडले ह्या बातम्या म्हणून ऐकायला ठीक वाटतात पण स्थानिक पातळीवर याचा काहीही फरक पडत नाही. तसेच यात फ़क़्त आणि फ़क़्त सरकारचा दोष आहे हेही मी म्हणत नाहीये. आपण समजून घ्याल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ज
जॉनविक्क Sun, 10/20/2019 - 18:32 नवीन
इतकेच
आज मलेशियाला कसा इंगा दाखवला आणि पाकडे कसे तोंडावर पडले ह्या बातम्या म्हणून ऐकायला ठीक वाटतात पण स्थानिक पातळीवर याचा काहीही फरक पडत नाही.
हे विधान सत्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
ड
डँबिस००७ Sun, 10/20/2019 - 11:22 नवीन
जागतीक पातळीवर पाकिस्तानला पाठिंबा देणार्या तुर्की व मलेशीयाला भारताने चांगलाच ईंगा दाखवलेला आहे. तुर्कीची जागतीक पातळीवर चांगलीच नाचक्की भारत करत आहे. तुर्की सायप्रस ग्रीस सारख्या देशांवर हूकुमत गाजवायचा प्रयत्न करत आहे. भारताने त्याला जोरदार आक्षेप घेतलेला आहे. त्या शिवाय तुर्की कंपनी बरोबर होऊ घातलेला २.३ बिलीयन $ चा सौदाही रद्द केलेला आहे. मलेशीयाला तर पुर्णच नागवल आहे. पाम तेल निर्यातीत ईंडोनेशियाच्या खालोखाल मलेशियाचा नंबर लागतो. भारत हा जगातला एक नंबरचा जगात पाम तेल खरेदी करणारा देश आहे. भारत पाम तेल मलेशीयाकडुन तसेच ईंडोनेशीया कडुन खरेदी करतो. मलेशियाने युएन मध्ये कश्मिर संबंधात पाकिस्तानच्या बाजुने वक्तव्य केल्यानंतर परराष्र्टीय मंत्रालयाने जलद गतीने मलेशिया विरुद्ध मोर्चे बांधणी सुरु केली. मलेशियावरुन येणार्या पाम तेलावर ५% आयात कर वाढवला. भारतीय व्यापांर्यांनी लगेच मलेशिया पाम तेल उत्पादक / विक्रेत्या कडुन पाम तेल विकत घेणे तातडीने थांबवले. आता भारतीय व्यापांर्यांनी पाम तेल ईंडोनेशिया कडुन विकत घेण्याचे सुरु केलेले आहे. ईंडोनेशियाने सुद्धा ह्याच संधीचा फायदा घेत पाम तेलाच्या बदल्यात भारता कडुन साखर व म्हशीचे मांस विकत घेऊ अशी काँऊटर ऑफर भारताला केलेली आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 10/22/2019 - 05:18 नवीन
राम मंदिर बाबरी मस्जिद विवादावर सु को केस चालु आहे. केस वरील पक्ष प्रती पक्षाच्या बाजु मांडण्यासाठी दिलेला वेळ संपलेला आहे. केसचा निकाल हा हिंदु समाजाच्या बाजुने लागण्याची शक्यता लक्षात घेऊन ह्या केस मधिल मुस्लिम पक्षाने नविन डाव आज खेळलेला आहे. ह्या मुस्लिम समाजाच्या दोन्ही बाजुने ईंग्लिश मिडीया, डावे पक्ष तसेच अर्बन नक्षलींचा भक्कम आधार आहे. आज मुस्लिम पक्षकारांकडुन सीलबंद पाकीटात Moulding of Relief पेटीशन सु कोर्टाच्या सरन्यायाधीशां कडे दिल. Moulding of Relief चा अर्थ यदा कदाचीत मुस्लिम पक्षकार ही केस हरले तरी कोर्टाने उदारता पुर्वक विचार करुन दुसर्या पक्षासाठी सुद्धा काही तरी तजविज करावी. बंद पाकिटाकडे बघत सर न्यायाधिशांनी मुस्लिम पक्षकारांकडे पहात विचारल की हे अती गोपनिय पत्र तुम्ही मला दिल आहेत पण हेच पत्र आजच्या ईंडीया टाईंम्सच्या पहील्या पानावर छापलेल आहे. आजच्या ईंडीया टाईंम्स सकट ईतर English Mediaच्या पहील्या पानावर अस काय छापलेल होत ? सु को भारतीय संविधानाच्या मुल्यांचा विचार करुन योग्य तोच निर्णय घेईल. भारतात अनेक धर्मांचे लोक रहातात त्यामुळे एका धर्मांच्या लोकांवर अत्याचार होउ नये. सर न्यायाधिशां कडे बंद पाकिटात पत्र, तेच पत्र खुल्या मिडीयात पहील्या पानावर !! कश्या प्रकारे न्याय व्यवस्थेवर दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहेत हे लोक !! हिंदु समाज नेहमी प्रमाणे गाफील, बेदरकार, बेपर्वा आहे. https://youtu.be/2l4Nq__si2w
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 10/22/2019 - 05:19 नवीन
देशात ४०,००० पेक्षा जास्त अत्युत्तम हिंदु मंदिरे तोडुन तिथेच मशीदी बनवल्या गेल्या । अहमदाबादेत एक मोठी मशीद आहे, "जामा मशीद " नावाची. श्रद्धा कपुरच्या एका सिनेमात ही मशीद दाखवली होती. अर्ध्या मिनीटाच्या त्या मशीदीच्या पिक्चरायझेशन मध्ये मला हे लक्षात आल की ही मुळात मशीद नव्हतीच तर तिथे एक भव्य दिव्य मंदीर होत. ईंटरनेट वर सर्च केल्यावर समजल की तिथे प्राचीन भद्रकाली मंदिर होत. माझ्यासाठी ही माहीती नविन होती. खुद्द मक्का मदिना मध्ये रस्ता रुंदीकरण किंवा अश्या कोणत्याही कारणाने मशीदी तोडतात. जिथे ईस्लाम आला तिथे मशीदी तोडु शकतात पण भारतात मशीदी तोडु नये अस चलन आहे ? मायबोलीवर सुद्धा बरेच पुरातत्व भागाचे विद्वान आहेत पण कोणालाही ह्या विषयावर बोलायची हिंम्मत नाही. रहाता राहीला प्रश्न हिंदुंच्या सांस्क्रुतीक समस्यांवर ईंग्लिश मिडीया, डावे, लिबरल , अर्बन नक्षली एकत्र का येतात ? नेहमी हिंदुंनीच का नमते घ्यावे ? राम मंदीरा साठी कोर्टाकडुन आदेश मिळाल्याने पुरातत्व विभागाने संशोधन करुन अहवाल सादर केला की तिथे राम मंदीर होते जे तोडुन बाबरी मशीद बांधली गेली. त्या वेळी ह्या वरच्या सगळ्यांनी पुरातत्व विभागावर दबाव आणला होता की मंदीर नाही असा अहवाल द्या !! समाजीक सलोखा वैगेरे साठी सत्यमेव जयतेचा खुन करायचा ? मग कश्याला अशी मोठी मोठी वाक्य वापरायची ? हिंदु समाजाने गेली १००० वर्षे हाल अपेष्ठा सोसली . पण आता नाही. हिंदु समाजाने जाग्रुत व्हायलाच पाहीजे. आपल्या धर्माबद्दल, समाजाच्या रक्षणा बद्दल जागरुक व्हायलाच हव !! जो काळा ईतिहास डाव्या लोकांनी आपल्या गळी उतरवला तो पुसुन नवा ईतिहास लिहायला पाहीजे !! हिंदु समाजाचा कोणीही मित्र नाही ही वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Tue, 10/22/2019 - 16:54 नवीन
40000 मंदिराचे काय घेऊन बसला आहेत? इथे तुमच्या आमच्यासमोर मशिदि उभ्या रहात आहेत. आणि हिंदू धर्माला पाठिंबा देणारे सरकार डोळे झाकुन बघत आहे. भाजपाचा हिंदू एजेंडा फक्त आणि फक्त निवडणुका पाहुनच रेटला जातो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
व
विजुभाऊ Tue, 10/22/2019 - 21:19 नवीन
मॉटो सेक्टर मधल्या मंदीचे कारण वेगळे आहे. लोक हायब्रीड मॉडेल चा विचार करत आहेत. इलेक्ट्रीक कार्स चा विचार करत आहेत. पेट्रोल डिझेल वरच्या गाड्या या येत्या तीन चार वर्षात ऑट डेटेड होणार आहेत असा एक प्रवाद लोकाम्मधे आहे. तीन चार वर्षात गाडी फुंकून टाकणारी जनता भारतात तरी अजून फार मोठ्या प्रमाणात नाहिय्ये
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस Fri, 10/25/2019 - 00:18 नवीन
काही अंशी खरे असले तरी हा तर्क पुर्ण ऑटो सेक्टरला लागू होत नाही. पॅसेंजर कार्स सेक्टर गेल्या सहामाहीमधे गेल्या वर्षीच्या सहामाहीपेक्षा ३५% ने खाली आहे. तिथे हे लॉजिक लागू पडले तरी मग त्याच कालावधीसाठी दुचाकी १६%, व्हॅन्स ३५%, जड ते मध्यम वाहतूकीची वाहने ३५% तर हलक्या वाहतूकीची वाहन विक्री १४% खाली आलेली आहे. तिथे हे लॉजिक लागू होत नसताना इतकी मोठी उतरण कशामुळे असेल? फक्त इथेच नाही तर मालवाहतूकीच्या व्यावसायिकांना सुद्धा गाड्यांच्या खेपांची मागणी १५% हून जास्तने कमी झालेली दिसत आहे. (ज्याचा परीणाम कदाचित जड माल वाहतूक वाहनांच्या मागणीवर दिसतोय?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ग
गोंधळी Sun, 11/17/2019 - 06:34 नवीन
नोटबंदी कशी यशस्वी झालेली आहे हे जाणुन घ्यायचे असेल तर खालिल लेख वाचलाच पाहिजे. https://www.loksatta.com/vishesh-news/demonetization-note-ban-pm-narendra-modi-abn-97-2016723/ यातुन आपल्याला कळेल की आपल्या देशात सर्वात जास्त बकरी,गाढव, मेंढ्या राहतात ते. आता जीथे मेंढ्या,बकरी तिथे लांडगे असणारच. (अंध)भक्तांनी वाचु नये.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 11/17/2019 - 08:36 नवीन
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 11/17/2019 - 09:58 नवीन
नोव्हेंबर मधे ज्या घडामोडी घडल्या त्यावर अगोदरच बरेच धागे निघाले आहेत. डिसेंबर मधे नवीन धागा नक्की काढतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा