प्रचारपत्रकातील नित्याचेच गुळगुळीत विरोधाभास
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारांच्या अनेकांपैकी एक गुळगूळीत प्रचार पत्रक हाती पडले. तशी सगळीच निवडणूक प्रचारपत्रके भाबडी असतात त्यांच्या गुळगुळीतपणावर भाळून मतदारराजा किमान काही मते आपल्या झोळीत टाकणार असा त्यांचा विश्वास असतो. निवडणूका म्हणजे हे चालायचेच.
माझ्या वाचनात आलेले ह्या एका निवडणूक पत्रातले एक वाक्य विरोधाभासाकडे कुणाचे लक्ष जाणार नाही या अदम्य विश्वासाने छापले आहे. आणि भारतिय मतदारांचे दुर्लक्ष करण्याची पद्धत पहाता हा विश्वास अगदिच चुकीचा म्हणणेही अवघड जाते. असो.
आपल्याच …..परिसराचा स्थानिक आणि घराणेशाही विरहीत सर्वसामान्य कुटूंबातील आल्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा …..परिसराचा स्थानिक कार्यकर्ता!राजकीय उमेदवार पक्ष आणि मतदारसंघ हे नमुद केले नाहीत कारण रिकाम्या जागा अनेक नावांनी भरता याव्यात. सर्वसामान्य कुटूंबातील आल्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणार आणि तर घराणेशाही उमेदवारांच्या बोलण्यात सर्वसामान्य हा शब्द राजकीय अपरीहार्यतेमुळे पोपटपंचीच्या स्वरुपात येतो आणि सर्वसामान्य जगणे कमी वाट्यास आल्याने त्यांच्या सर्वसामान्यांच्या समस्या विषयक जाणीवा कित्पत खर्या अर्थाने प्रगल्भ असतात या बद्दल मी साशंक असतो. माझा तसा तर्क असतो. त्यामुळेच राजकीय घराणेशाही विरुद्ध कुणि चुकून बोलले दिसले की मला भावतेच. पण ह्या प्रचारपत्रकात हेच वाक्य खूपच अधिक भावले कारण आपण ज्या राजकिय पक्षात काम करतो आहोत त्याचेही नेतृत्व घराणेशाहीचाच वारसा चालवते या विरोधाभासाकडे दुर्लक्ष करून वाक्य दणकून सोडून दिले. भाबडा मतदार अशा आपल्या बोलण्या आणि वागण्यातील विरोधाभासांकडे दुर्लक्ष करतो ह्या बद्दल राजकीय उमेदवारांच्या दुर्दम्य विश्वासाचे कौतुक वाटते. एकतर सदर उमेदवाराने राजकीय घराणेशाही नेतृत्वास सामाजिक समस्या आणि जाणीवांचा प्रत्यक्ष अनुभव कमी पडतो हे स्विकारताना जो नियम प्रतिस्पर्ध्यास लागू पडतो तोच आपल्याही पक्षाच्या नेतृत्वास लागू पडतो हे स्विकारावयास हवे. पण हे आपले मिपावर व्यक्त होणे याने उमेदवार आणि मतदारराजा दोघांनाही फरक पडत नाही आणि कोणत्याच पक्षातील राजकीय घराणेशाही संपत नाही. पण न व्य्क्त करण्यापेक्षा व्यक्त करणे अधिक उत्तम. असो. * व्यक्तिगत टिका शुद्धलेखन आणि व्याकरणचर्चा टाळण्यासाठी अनेक आभार .
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Coca-Cola's plastic secrets | DW Documentary