Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अनुष्टुभ छंद - विस्तारीत अष्टाक्षर बांधणी

ब — बेसनलाडू, Tue, 11/11/2008 - 03:56

प्रतिक्रिया द्या
14661 वाचन

💬 प्रतिसाद (24)
आ
आजानुकर्ण Tue, 11/11/2008 - 04:29 नवीन
श्री. बेसनलाडू, या कार्यक्रमास आमच्या शुभेच्छा. मात्र रामरक्षेतील वरील ओळींमध्ये १ चूक झाली आहे असे वाटते. एकैकमक्षरम् पूसाम् मधील शब्द पूसाम् असा नसून तो पुंसां किंवा पुंसाम् असा आहे. असो. आपला (रामभक्त हनुमान) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 11/11/2008 - 04:37 नवीन
चरितम् रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरम् पूसाम् महापातकनाशनम् म्हणजेच अनुष्टुभाच्या चरणांमधील प्रत्येक ओळीत आठ अक्षरे हवीतच. :?
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 11/11/2008 - 05:52 नवीन
आता आहेत ना आठ अक्षरे? :) अम् = अं = एक दीर्घ अक्षर, लोचनम् = लोचनं (अनुस्वारविरहित)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
प
प्रमोद देव Tue, 11/11/2008 - 06:09 नवीन
शंका निरसन झाले! :) धन्यवाद बेला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
आ
आजानुकर्ण Tue, 11/11/2008 - 04:37 नवीन
दुड्डाचार्य नव्हे दुढ्ढाचार्य. (कन्नड 'दोड्ड' आणि संस्कृत आचार्य यापासून हा शब्द तयार झाला आहे. मात्र संधी होताना ड चा ढ झाला.) देखिल नव्हे देखील. पाहुन नव्हे पाहून. आपला (अस्सल डॉन) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
ख
खरा डॉन Tue, 11/11/2008 - 04:37 नवीन
मागे त्या चारोळ्यांनी आणला होता तसा वात येऊ देउ नका म्हणजे झाल. बाकी छंद कविता वगैरे चालू दे पण अतिरेक नको. -- धोंडोपंत मी माझे मत नोंदवले आहे ते का उडवलेत? खरे डॉनराव, प्रत्येकच ठिकाणी वादविवाद करण्याचा आणि भांडायचा तुमचा मूड दिसतो आहे! सगळीकडे फक्त विषयांतर करणारे, हुकूम गाजवणारे, उठसूठ संपादक मंडळाला जाब विचारणारे प्रतिसाद दिसत आहेत.कृपया शांत रहा...! इतर चारचौघांसारखे इथे या, काय वाचायचं ते वाचा, गरज वाटल्यास विषयानुरुप प्रतिसाद द्या, परंतु उठसूठ प्रत्येकाला धारेवर धरण्याची सवय सोडून द्या..! प्रत्येकच वेळेस इथे केवळ वादा-भांडणाचे वातावरण कसे राहील हे पाहू नका.. (डॉन मंडळींचा डॉन..!) तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 11/11/2008 - 04:38 नवीन
थोडे शांत राहा. आपला (सल्लागार) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खरा डॉन
ख
खरा डॉन Tue, 11/11/2008 - 04:39 नवीन
हे तु कोण मला सांगणारा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Tue, 11/11/2008 - 04:40 नवीन
तु नव्हे तू (मी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खरा डॉन
ख
खरा डॉन Tue, 11/11/2008 - 04:41 नवीन
ह्यातच सगळ आल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ऋ
ऋषिकेश Tue, 11/11/2008 - 04:57 नवीन
बापरे! हा छंद अंमळ कठीण वाटला आमच्यासारख्या पहिल्यांचंदा छंदबद्ध लिहू पाहणार्‍यांसाठी मराठी उदाहरणे द्याल का? -(सुसंस्कृत मराठी) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 11/11/2008 - 05:02 नवीन
असेच म्हणतो. शिवाय छंद सोदाहरण स्पष्ट केल्यास अधिक उत्तम होईल. कृपया विचार व्हावा. संस्कृत -> मराठी संबंध जोडणे थोडे अवघड जाते. मराठी उदाहरणे असल्यास जास्त चांगले. -भटोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ध
धष्टपुष्ट Sat, 11/24/2018 - 09:38 नवीन
मला स्वतःला या छंदाची चाल लक्षात ठेवली की हा छंद एकदम सोपा वाटतो (राम रक्षा किंवा गीतेतल्या कुठल्याही श्लोकाच्या तुमच्या आवडत्या चालीवर खालील श्लोक म्हणा) ल ल ला / ला ल ला / ला ला ला ला ला ला / ल ला ल ला ल ला ला / ला ल ला / लाला ला ल ला / ल ल ला / ल ला फारच बाष्कळ आणि निरर्थक उदाहरणार्थ बघुनी लालसा झेंडा रेडा कापे चळाचळा करोनी लालसा त्याची रक्त वाहे भळाभळा अथवा 5/6/7 व्यतिरिक्त काही लघुगुरू अक्षरे बदलून बघोनी लालसा झेंडा रेडा कापे चळाचळा करोनी लालसा त्याची रक्ताने भरिला मळा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
अ
अमोल केळकर Tue, 11/11/2008 - 05:01 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद एक सुचवायचे आहे. राग मानू नये. पंतांनी देवद्वार छंद जसा सोपी उदाहरणे देऊन समजावून सांगितला तसे आपण ही या छंदातील काही मराठी गझल, गाणी, श्लोक याची उदाहरणे द्यावीत ही विनंती. त्यामुळे समजून घेण्यास सोपे जाईल. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 11/11/2008 - 05:02 नवीन
गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता पडतां झडतां घेई उचलोनी कडेवरि !
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 11/11/2008 - 05:03 नवीन
मागील भागात पाहिलेला पादाकुलक (अष्टाक्षरी) छंद हा अनुष्टुभाची पहिली पायरी. म्हणजेच अनुष्टुभाच्या चरणांमधील प्रत्येक ओळीत आठ अक्षरे हवीतच. त्याबरोबरच अनुष्टुभ छंद पुढील लक्षणांनी अधिक घट्ट विणला गेला आहे - १. प्रत्येक ओळीतले पाचवे अक्षर लघु (र्‍हस्व) हवे. २. प्रत्येक ओळीतील सहावे अक्षर गुरू (दीर्घ) हवे. ३. सातवे अक्षर दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत लघु (र्‍हस्व) नि बाकीच्या ओळींत (पहिल्या नि तिसर्‍या) गुरू (दीर्घ) हवे. झालं. बेला संपवलीस आमची शाळा. :-) पंतांनी अजुन सोपे शिकवले तर ठीक नाहीतर आपण मुक्त नवकाव्य ह्या एकाच प्रकारात कविता[??] बांधू :-)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/11/2008 - 06:02 नवीन
बेला, चांगला उपक्रम... पण हा छंद लैच अवघड वाटतो लघु गुरु मोजायला र्‍हस्व-दीर्घ समजले पाहिजे आणि नेमके तिथेच आमची गोची होते :) -दिलीप बिरुटे (मुक्तछंदी )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ब
बेसनलाडू Tue, 11/11/2008 - 06:10 नवीन
साधारणपणे र्‍हस्व अक्षर = लघु (नु, प, इ, पि, ल, हु इत्यादी) आणि दीर्घ अक्षर = गुरू (आ, का, पो, लो, शै, शे, ची, नी, पं, खू, पू इत्यादी) हे र्‍हस्व दीर्घपण उच्चारावरून आले आहे. महत्त्वाचा अपवाद असा की जोडाक्षराच्या आधीचे अक्षर लघु असले तरी ते गुरू मोजतात. जसे र्‍हस्व, अकस्मात - यांत स्व, स्मा या जोडाक्षरांच्या आधीचे र्‍ह, क हे वास्तविक लघु असए तरी गुरू मोजतात. उच्चारणानुसार विचार केला तरी अकस्मात हा शब्द उच्चारताना क वर जोर दिला जातो, त्याचा उच्चार नेहमीच्या लघु क पेक्षा किंचित लांबतो. तेव्हा या ठिकाणी क गुरू मोजावा :) मात्रावृत्तांमध्ये लघु अक्षरासाठी एक नि गुरूसाठी दोन मात्रा मोजतात. म्हणजे अकस्मात या शब्दांत एकूण मात्रा = १ (अ) + २ (क गुरू मोजायचा असल्याने) + २ (स्मा) + १ (त) = ६. तसेच या वृत्तांमध्ये दोन लघुंचा एक गुरू याप्रमाणे दोन क्रमिक लघ्वाक्षरांच्या मिळून दोन मात्रा मोजतात. (शिक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/11/2008 - 06:17 नवीन
कधी-कधी लघु अक्षर असले तरी ते गुरु मोजतात याची मला लै गम्मत वाटते. :) एखादा शब्द उच्चारतांना तो उच्चारतात कसा त्यावरुन त्याचे मात्रा ठरवणे वगैरे लै जड वाटते. असो, मार्गदर्शनाबद्दल आभारी !!! दिलीप बिरुटे (बेलाचा विद्यार्थी )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
क
कपिल काळे Tue, 11/11/2008 - 05:11 नवीन
<<मात्र संपूर्ण रामरक्षा अनुष्टुभात आहे का, याबद्दल मी स्वतः साशंक आहे; कारण रामरक्षेतील काही श्लोक शुद्ध शार्दूलविक्रीडितात आहेत.>> वृत्त आणि छंद ह्यातील फरक काय? मी रामरक्षा एकदा अनुष्टुभात आहे का, ह्या दॄष्टीने तपासली होती म्हंजे लघु गुरु नियम माहित नव्हता. फक्त अक्षरे मोजली. तेव्हा काही श्लोक नजरेस पडले. तेव्हा वृत्त आणि छंद ह्यातील फरक काय? कोण सांगेल? http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 11/11/2008 - 06:02 नवीन
छंदाची लक्षणे सांगणार्‍या श्लोकाचे एक मराठीकृत स्वरूप पहा - अनुष्टुभ् छंद तो ज्याला एक नेम नसे गणी अक्षरे चरणी आठ देवा तार मला त्वरे तसेच - वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा (उदाहरणार्थ)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 11/11/2008 - 06:06 नवीन
१. प्रत्येक ओळीतले पाचवे अक्षर लघु (र्‍हस्व) हवे. २. प्रत्येक ओळीतील सहावे अक्षर गुरू (दीर्घ) हवे. ३. सातवे अक्षर दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत लघु (र्‍हस्व) नि बाकीच्या ओळींत (पहिल्या नि तिसर्‍या) गुरू (दीर्घ) हवे. अरे देवा, हा मामला मुश्किल आहे आणि आमच्या आवाक्याभाएरचा आहे! :) तात्या. अनुष्टुपछंद काव्य नसे आपुल्या कामाचे करताना चुकायचो! मनी सावट भितीचे! :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 11/11/2008 - 06:09 नवीन
अनुष्टुभ् छंद तो ज्याला एक नेम नसे गणी अक्षरे चरणी आठ देवा तार मला त्वरे
अनुष्टुभात यमक जुळले नाहि तरी चालते का? का हि रचना अशी होती? अनुष्टुभ् छंद तो ज्याला एक नेम नसे गणी अक्षरे चरणी आठ देवा तार मला झणी -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 11/11/2008 - 06:22 नवीन
पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः नद्रष्टुमपिशक्तास्ते रक्षितम् रामनामभि: म्हटलेच आहे ना वर - ..छंद तो ज्याला, एक नेम नसे गणी ;) :D याचा अर्थ यमक नसते/नसावे असे नाही; पण जुळणीचा नियम नाही. रामरक्षादींमध्ये यमक न जुळण्याची उदाहरणे आहेतच; एक वर दिलेलेच आहे. यमक असले तर पादांती असावे, असे ऐकले आहे. याबाबत अधिक माहितीचे उत्खनन सवडीने करेन म्हणतो; अन्यथा शंकासमाधानासाठी पंत आहेतच :) (माफक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा