मिपाचा पहिलावहिला छापील दिवाळी अंक
झैरात झैरात झैरात
मंडळी, कळविण्यास अत्यंत आनंद होतोय की आपल्या लाडक्या मिपाचा पहिलावहिला छापील दिवाळी अंक उद्या आपल्या भेटीस हजर होतोय.
आपला पहिलाच प्रयत्न असल्याने मर्यादित प्रती छापण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी आणि आपली प्रत राखून ठेवण्यासाठी
मिपावर प्रशांत ला व्यनि करा
किंवा prashaant.tayade@gmail.com येथे थेट संपर्क साधा.
ऑनलाईन अंकापैकी निवडक लेख, दोन-तीन एक्स्क्लुसिव्ह कंटेंट आणि मिपावरची काही गाजलेली दर्जेदार पूर्वप्रकाशित गाळीव रत्नं असा हा संग्रह आहे. मुख्यतः स्मरणिका म्हणून संग्रही ठेवण्यासाठी. विशेषतः पहिला अंक, आणि कदाचित अग्रणी मराठी संकेतस्थळांपैकी छापील अंकाचा पहिलाच प्रयोग यासाठी या अंकाचं महत्त्व असेल.
- कोमल यांचा राग/वैताग, निराशा अगदीच समजण्यासारखी आहे, त्यांच्या जागी मी असतो तर माझेही असेच झाले असते.
- मिपाच्या छापील अंकात कोमल यांच्या सांस्कृतिक भारताचा धाकटा भाऊ : इंडोनेशिया ह्या लेखाचा लेखक म्हणून चुकून माझे नाव कसे छापले गेले हे मला माहित नाही, आणि त्याच्याशी माझा काहिही संबंध नाही. त्या चुकीची जवाबदारी योग्य व्यक्तिंनी आधीच घेतली आहे.
- मी सांस्कृतिक भारताचा धाकटा भाऊ : इंडोनेशिया हा लेख लिहिला नाही, त्यामुळे त्यावर मी स्वामित्व अधिकार (copyright) सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही - भविष्यातही माझ्याकडून कोमल यांच्या ह्या लेखावर कुठलाही हक्क सांगितला जाणार नाही ह्याची मी खात्री देतो.
- मी copyright ह्या विषयातला तज्ञ नाही, पण मिपाच्या छापील अंकात प्रसिध्द झालेल्या साहित्याचे व रेखाटनांचे सर्व अधिकार 'मिसळपाव डॉट कॉम' कडे असल्याचे नमूद केले आहे. माझ्या मते ते अधिकार संबधित लेखकांकडे आहेत असे नमूद करणे आवश्यक होते/आहे. अन्यथा भविष्यात पुस्तकरुपाने आपापले लेख प्रसिध्द करतांना मिपाची लेखी परवानगी लागेल. मिपाचे संपादक त्याचा योग्य खुलासा करतील अशी अपेक्षा आहे.
कोमल यांचा 'To see my name in print' हा मुद्दा समजला आणि मनापासून पटला देखील. मी देखील माझ्या ग़ज़ल का सफ़र.. हा लेख छापील दिवाळी अंकात छापण्याची अनुमती देतांना माझे संपुर्ण नाव कळवले होते, पण कदाचित घाईगडबडीत ते प्रसिध्द झाले नाही. मिपाचा छापील अंक प्रकाशित करतांना सगळ्याच संबधित लोकांनी खूप मेहनत घेतली आहे, आपापला वेळ आणि पैसे खर्च केले आहेत. त्याबद्दल त्या टीमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, पण त्याचबरोबर त्यांनी थोडे काळजीपुर्वक, जवाबदारीने लेखांचे सर्व अधिकार संबधित लेखकांकडे असल्याचे नमूद करणे गरजेचे होते (त्याच गृहितावर मी माझा लेख ग़ज़ल का सफ़र.. प्रसिध्द करण्यास परवानगी दिली होती). तसेच संबधित लेखक-लेखिकांचे संपुर्ण नाव किंवा इच्छित नाव लेखाबरोबर, कवितेबरोबर द्यायला हवे होते असेही वाटते. आई-वडिलांना (जे ऑनलाईन वाचू शकत नाही) छापील अंक दाखवतांना त्यांनीही 'तुझे पूर्ण नाव नाही का'? हा प्रश्न नाराजीने विचारला, पण त्याबद्दल माझ्याकडे काही उत्तर नव्हते. पुढच्या वेळेस आवर्जून ही काळजी घ्यावी अशी संबधित संपादकांना विनंती. असो. इतक्या देखण्या, वैविध्यपुर्ण आणि दर्जेदार अंकात दृष्ट लागू नये म्हणून ही छोटीशी तीट लागली आहे असे मी समजतो. निदान माझ्या मनात तरी त्याबद्दल कुठलीही अढी नाही. आपल्याच लोकांनी हौसेने इतके सुरेख काम केले आहे, त्यांच्या काही चुका विसरून आपण त्यांना दाद देऊ शकतो ना?