Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंक वितरण कट्टा - रद्द

प
प्रशांत
गुरुवार, 10/24/2019 - 19:30
🗣 12 प्रतिसाद
काही वैयक्तिक कारणांमुळे मला तातडीने माझ्या गावी जावे लागत आहे. त्यामुळे उद्याचा पाताळेश्वर येथील अंक वितरण कट्टा रद्द करत आहोत. अंक मिळण्याबाबत अधिक माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल. अंक वितरण कट्टा नमस्कार मंडळी आताच पहिलावहिला छापील दिवाळी अंक माझ्या हाती आला आहे. पुण्यातील मिपाकरांचा सोयीसाठी दिवाळी अंक वितरण कट्टा शनिवारी दि. २६/१०/२०१९ रोजी १०:३० ते १२:३० वाजे दरम्यान आयोजित करत आहोत. ठिकाण: आपले नेहमीचेच पाताळेश्र्वर मंदिर, जंगली महाराज रोड. अंकाबाबत अधिक माहिती: स्पॉन्सर, जाहिराती आवर्जून न घेता पहिला अंक काढला आणि अत्यंत मर्यादित प्रती आहेत ऑनलाईन अंकापैकी निवडक लेख, दोन-तीन एक्स्क्लुसिव्ह कंटेंट आणि मिपावरची काही गाजलेली दर्जेदार पूर्वप्रकाशित गाळीव रत्नं असा हा संग्रह आहे. मुख्यतः स्मरणिका म्हणून संग्रही ठेवण्यासाठी. विशेषतः पहिला अंक, आणि कदाचित अग्रणी मराठी संकेतस्थळांपैकी छापील अंकाचा पहिलाच प्रयोग यासाठी या अंकाचं महत्त्व असेल. एकूण लेख: ४५ पृष्ठ संख्या: १४० किंमत: २५०₹ प्रशांत: prashaant.tayade@gmail.com

प्रतिक्रिया द्या
7318 वाचन

💬 प्रतिसाद (12)
ब
बाबा योगिराज गुरुवार, 10/24/2019 - 19:37 नवीन
मला एक हवा. पहिला छापील अंक संग्रही हवाच. सगळा व्यवहार मी दिवाळी नंतर करेन. येत्या सोमवारी फोन करून प्लॅन कळवतो.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन गुरुवार, 10/24/2019 - 21:30 नवीन
ब्यनि बघा
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Fri, 10/25/2019 - 01:30 नवीन
पण मी पुण्यात सध्या नसल्याने तेथे येउ शकत नाही. राखून ठेवू शकाल काय? मी नंतर पिक अप करेन.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 10/25/2019 - 03:03 नवीन
अंकाच्या विमोचनाचे फेसबुक लाइव्ह द्वारे प्रक्षेपण थेट प्रक्षेपण करावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 10/25/2019 - 03:04 नवीन
मी अमेरिकेत आहे. इथे अजुनही काही लोक परदेशात अन्क कसा मिळेल असे विचारत असतील. व्यवहार ओन लाइन होउ शकतो. परन्तु अन्क कसा मिळेल?
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 10/25/2019 - 05:45 नवीन
अमेरिकेत मागवायचा टपाल खर्च खूप अधिक होईल. यामुळे मी माझ्या भारतात राहणार्‍या आप्तांना अंक घेऊन ठेवण्यास सांगितले आहे. तसेही अंक ऑनलाइन उपलब्ध असणार आहे. मिपाचा पहिला छापील दिवाळी अंक संग्रही असावा हाच उद्देश आहे भले त्यासाठी काही महिने अथवा वर्षे विलंब का होईना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
व
विजुभाऊ Fri, 10/25/2019 - 05:19 नवीन
मुम्बैकरांसाठी कसा आणि कुठे मिळू शकेल अंक? कोणा एकाकडे गठ्ठा पाठवला तरी तो इतरांकडे पोहोचवता येईल
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 10/26/2019 - 07:18 नवीन
एक करता येवू शकते. एक शेवटची तारीख ठरवा. येथेच कळवा. अन त्या तारखेपर्यंत बुकींग घ्या. आधी पैसे घ्या. ( ते महत्वाचे आहे. परमार्थ नंतर.) तेवढ्या प्रती छापा. (आणि खूप विलंबही नको.) अन मुंपुठानानाको ( मुंबई-पुणे-ठाणे-नाशिक-नागपूर) असा हब करा. त्या त्या ठिकाणच्या मिपाकराला तेवढ्या प्रती पाठवा. (नाशकात मी जबाबदारी घेईन अन अंक द्यायला त्यांच्या घरीही जाईन (अन दिवाळीचा फराळ हादडेन!)) तो मिपाकर इतरांशी संपर्क करून एकमेकांत बोलणे होवून अंक हातोहात देतील. आणि मिपाकरांच्या दिवाळी अंकाच्या हार्डकॉपीची पहिली खेप असल्याने मिपाकर तेवढे सहकार्य करतील. बघा. कसं जमतंय ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मनिष Fri, 10/25/2019 - 07:34 नवीन
व्यनि केला आहेच, उद्या येतो कट्ट्याला.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 10/25/2019 - 10:17 नवीन
युके मधल्या मिपाकरांपैकी माझ्या व पद्मावती तैं व्यतिरीक्त अजुन किती जणांनी छापील प्रत राखुन ठेवायला सांगितली आहे?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 10/26/2019 - 08:06 नवीन
हा मेसेज उशीरा पाहिला, पाताळेश्वराला पोचल्यावर पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सुखी Sat, 10/26/2019 - 17:05 नवीन
काय राव, आत्ता बघितले, आता मिळू शकेल का? Exclusivity maintain करायची हे कळू शकत, पण ज्यांना इच्छा असून मिळू शकलेला त्यांनी काय करायचं?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा