Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे लागतील?

क
कोहंसोहं१०
गुरुवार, 11/07/2019 - 21:08
🗣 73 प्रतिसाद
माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही. आई वडील आहेत परंतु खर्चासाठी याच्यावर अवलंबून नाहीत आणि म्हातारे असले तरी पुढेही सधन असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नसतील असे त्याचे म्हणणे आहे. पुण्यात स्वतःचे loan free घर आहे. हा व याची पत्नी अगदी frugal नसले तरी गरजेइतकाच पैसा खर्च करतात व त्यात समाधानी आहेत. दोघांना सध्यातरी कोणताही आजार नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो. तो सध्या लवकरच (२-३ वर्षात) रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. रिटायरमेंट नंतर आर्थिक कारणासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे. आई वडील हयात असेपर्यन्त पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे. त्याची आणि पत्नीची जीवनशैली गेल्या अनेक वर्षांपासून साधी आहे आणि ती तशीच राहील किंबहुना रिटायरमेंट नंतर अजूनहि फ्रुगल होईल. ४८ व्या वर्षी रिटायर झाल्यास सध्याची जीवनशैली, वाढलेले आयुर्मान पाहता रिटायरमेंट घेण्याआधी किती पैसे लागतील असे आपल्याला वाटते? एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे. त्यामुळे चर्चा उरलेले सध्याच्या जीवनशैलीप्रमाणे जगायला आयुष्य जगायला किती पैसे लागतील यावरच मर्यादित राहिल्यास उत्तम.

प्रतिक्रिया द्या
39824 वाचन

💬 प्रतिसाद (73)
च
चौथा कोनाडा Wed, 11/20/2019 - 08:49 नवीन
वीकेंडला चालणारे दारुकाम रोज होऊ लागले तर खर्च वाढतील.
खरं तर सेवानिवृतांच्या उत्तम मानसिक स्थितीसाठी छंद / इतर ( यात मर्यादित दारुकाम सुद्धा येवु शकेल) यांचे वाढते खर्च गृहित धरून एम्प्लोयरने / शासनाने वाढती पेन्शन सुरु करायला काय हरकत आहे ? :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
सुबोध खरे Wed, 11/20/2019 - 15:25 नवीन
पैसे कुणी द्यायचे? का पेट्रोल डिझेल वर सेस लावायचा? सेवानिवृत्तांनी स्वतः ची काळजी स्वतः का घेऊ नये? काल एक सुखवस्तू वरिष्ठ नागरिक मला वरिष्ठ नागरिक म्हणूनतुम्ही सवलत का देत नाही म्हणून टेचात विचारात होता. त्याला मी थंड शब्दात सांगितले कि माझ्यापेक्षा काही वर्षे अगोदर तुम्ही जन्माला आलात यापेक्षा तुमचे काय कर्तृत्व आहे ज्यासाठी मी तुम्हाला सवलत द्यावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
ज
जॉनविक्क Wed, 11/20/2019 - 16:30 नवीन
अन्यथा तुम्हाला त्यांचेकडे सूट मागायचे दिवस दिसले आस्तेही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
किल्लेदार Tue, 11/19/2019 - 09:21 नवीन
आपण रिटायर झालो आहे आणि वेळ जात नाही म्हणून काम करतो आहे असे मनावर ठसवत रहा. पैसे आणि आनंद दोन्ही मिळेल :D :D :D
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 11/20/2019 - 09:10 नवीन
जिओ किल्लेदार साहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार
क
किल्लेदार गुरुवार, 11/28/2019 - 11:34 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
ज
जॉनविक्क Tue, 11/19/2019 - 14:28 नवीन
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 11/28/2019 - 12:22 नवीन
९ कोटी
  • Log in or register to post comments
ट
टीकोजीराव गुरुवार, 11/28/2019 - 14:06 नवीन
एव्हडे जमवायला १०० व्या वर्षा पर्यँत नोकरी करावी लागेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ख
खटपट्या गुरुवार, 11/28/2019 - 18:32 नवीन
आणि तेव्हढे जमतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीकोजीराव
स
सुधीर गुरुवार, 11/28/2019 - 21:33 नवीन
समजा आजच्या घडीला मला दरमहा ५० हजार म्हणजे वार्षिक ६ लाख रुपये लागतात (गृहीत धरू की हेल्थ इन्शुरन्सचे हप्ते - म्हातारपणातल्या आजारपणाची सोय अन्यथा पुढचे सगळेच गणित चुकून जाईल + वार्षिक सणासुदीची खरेदी + वार्षिक ट्रीप + ५-७ वर्षांनी लागणार्‍या खर्चाची तरतूद जसे फर्निचर बदल, रंग रंगोटी, नवे वाहन इत्यादीची वार्षिक तरतूद यात गृहीत धरली आहे पण अगदीच वयोवृद्ध झालो तर वृद्धाश्रमाचा खर्च/सुशृशा करणार्‍याचा खर्च, औषध पाण्याचा खर्च गृहीत धरले नाहीत, गृहीत धरून चालू की मी इतका म्हातारा झालोच आणि तो खर्च झालाच तर कॅपिटल कन्झ्यूम करून करेन कारण माझ्या पूर्वजांची इतकी वर्ष जगण्याची हिस्ट्री नाही त्यामुळे अशी शक्यता कमी. किंवा अशी परिस्थिती आलीच तर त्याची तजवीज मी वेगळी करेन.) समजा इन्कम जनरेटींग इलिक्विड अ‍ॅसेट क्लास (जसे रिअल इस्टेट) मधून येणारे आजचे उत्पन्न २५ हजार आहे आणि ते इन्फ्लेशन नुसार वाढत जाईल आणि अशा अ‍ॅसेट बद्धल काही भावना जडल्यात त्यामुळे ते विकण्याची शक्यता नाही पण ते इन्फ्लेशन अ‍ॅडजस्टेड उत्पन्न देत राहतील पिढ्यान पिढ्या आणि पुढल्या पिढीला ते मी देईन. म्हणजे मला शॉर्ट फॉल २५ हजाराचा आहे (जी धागाकत्याची गरज आहे). म्हणजे वार्षिक ३ लाखाचे उत्पन्न जनरेट होत राहीले पाहिजे. [जर इन्कम जनरेटीम्ग अ‍ॅसेट नसेल तर ६ लाखची तरतूद करावी लागेल] आणि ते इन्फ्लेशन्/लाईफ स्टाईल स्पेंडीग नुसार वाढत गेले पाहिजे. आता गृहीत धरावयाच्या गोष्टी: १. महागाईचा दर ४.५% धरू (जो लाईफ स्टाईल मेंटेन करायलाही तेवढाच लागेल असे गृहीत धरून. साधारण आरबीआयच्या लाँग टर्म इन्फ्लेशन टार्गेटच्या आसपास). फार अ‍ॅग्रेसिव्ह असाल तर महागाईचा दर अजून कमी म्हणजे ३% वा फार कन्झरव्हेटीव्ह असाल तर ६% या रेंज मध्ये धरा. कमी महागाईचा दर गृहीत धरला तर रिटायरमेंट फंडींग कॅपिटल कमी लागेल, जास्त महागाईचा दर गृहीत धरला तर रिटायरमेंट फंडींग कॅपिटल जास्त लागेल. २. गोळा केलेल्या कॅपिटलवरचे परतावे: पोस्ट रिटायरमेंट अ‍ॅबिलिटी टू टेक रिस्क (जोखिम घेण्याची क्षमता) बिलो अ‍ॅव्हरेज असेल असे गृहीत धरून जे काही "कन्झरव्हेटीव्ह अ‍ॅसेट अलोकेशन" (असे अलोकेशन ज्यात इन्कम जनरेशन आणि कॅपिटल सेफ्टी हे मूख्य उद्दिष्ट असतील, जास्तीतजास्त अलोकेशन फिक्झड इंन्कम अ‍ॅसेट क्लास जसे सरकारी बँकांच्या एफडीज, हाय क्रेडीट क्वालीटी डेट इन्स्ट्रूमेंटस जसे बाँड्स, एन्स्डीडीज वा त्याशी संबंधीत डेट म्युच्युअल फंड्ज इ. आणि थोड्याफार प्रमाणात इन्फ्लेशन शॉक अ‍ॅब्झॉर्ब करण्यासाठी डायव्हरसिफाईड इक्विटी क्लास जसे इक्विटी म्युच्युअल फंड्स, वा इटीएफ्स इ.) असेल त्यातून येणारे परतावे ८.५% गृहीत धरू शकता. अ‍ॅग्रेसिव्ह अझम्शन करून हा दर जास्त पकडला (९% ते १०%) तर कमी कॅपिटल लागेल. पण अगदीच कमी म्हणजे सरकारी बँकेच्या एफडीचा दर पकडला ६.५% तर कॅपिटल जास्त लागेल). ३. गोळा केलेले कॅपिटल शक्यतो टिकवायचे आणि आपल्या पाश्चात पुढल्या पिढीकडे सपूर्द करायचे किंवा चॅरिटी डोनेशन करून टाकायचे. फॉर्म्युला: रिटायरमेंटच्या वेळी लागणारी फंडींग (समजा याच वर्षी रिटायर व्हायच आहे)= (आजची वार्षिक गरज रिअल इस्टेट उत्पन्न वजा जाता) * ( १ + महागाईचा दर) ^(१ + रिटायर होण्यासाठी उरलेली वर्ष) / (गोळा केलेल्या कॅपिटलवरच्या परताव्याचा दर - महागाईचा दर) = (३ लाख) * ( १ + ४.५%) ^(१ + ०) / (८.५% - ४.५%) = ७८.३७ लाख क्रॉस चेक एक्सेलवर करू शकता वर्ष ०: कॅपिटल : ७८.३७ लाख -- खर्चाची रक्कमः ३ लाख -- उरलेली रक्कम = ७५.३७ लाख जी ८.५% ग्रो होईल. ७५.३७ * (१ + ८.५%) = ८१.७८ लाख वर्ष १: कॅपिटल : ८१.७८ लाख -- खर्चाची रक्कमः ३ लाख * (१ + ४.५%) = ३.१४ लाख -- उरलेली रक्कम = ७८.६४ लाख जे ८.५% ग्रो होईल. ७५.६४ * (१ + ८.५%)= ८५.३३ लाख ..... वर्ष २५: कॅपिटल : २ कोटी २१ लाख -- खर्चाची रक्कमः ९.०२ लाख -- उरलेली रक्कम = २ कोटी १२ लाख --------------------------------------------------- जर मी महागाईचा दर ४.५% धरला पण परताव्याचा दर कमी केला ७% तर मला आजच्या घडीला १ कोटी ५६ लाख लागतील. जर मी महागाईचा दर ६% पकडला आणि परताव्याचा दर ७% पकडला तर मला आजच्या घडीला ४ कोटी २६ लाख रुपये लागतील.
  • Log in or register to post comments
स
सुधीर Fri, 11/29/2019 - 09:12 नवीन
एक राहून गेले, गुंतवणूकीवरचे परतावे आफ्टर टॅक्स पकडावेत. अजून सोप्या गणिती भाषेत: समजा माझ्याकडे गोळा केलेली रक्कम १ कोटी आहे. तर या रकमेच्या मी फक्त (गुंतवणूकीतून मिळणारा आफ्टर टॅक्स परतावा - महागाईचा दर)% वा त्याहूनही कमी पैसा दरवर्षी खर्च करत राहीलो तर कदाचित माझे १ कोटी मला आयुष्य भर पुरून उरतील अन्यथा ते संपून जातील. म्हणजे माझ्याकडे १ कोटी असेल, महागाईचा दर पुढील काही वर्षे ४%(*) असेल आणि मला माझ्या गुंतवणूकीतून कमीत कमी ७%(#) परतावे मिळत राहीले तर ७ वजा ४ म्हणजे ३% रक्कम (म्हणजे ३ लाख वा त्याहूनही कमी रक्क्म ) मी दरवर्षी खर्च केली तर १ कोटीचा फंड आयुष्यभर पुरून उरेल. म्हणजे मी १ कोटीची गुंतवणूक (अ‍ॅसेट अलोकेशन) अशा पद्धतीने केली की मला निदान लाँग टर्म ७% परतावे येत राहीले पाहिजेत. जास्त आले तर चांगलेच आहे पण त्याहून अधिक परताव्यासाठी अवाक्याबाहेरची रिस्क घेतली आणि कॅपिटल लॉस झाले तर खूप मोठा फटका उतार वयात पडेल. कमी अधिक प्रमाणात हेच लॉजिक एखाद्या संस्थेला/व्यक्तीला एक डोनेशन/स्कॉलरशीप फंड चालू करायचा आहे तर वापरता येते. वर कुठेतरी निफ्टीच्या १७% परताव्याचे वाचले. माझ्या मते ते खूपच ऑप्टीमिस्टीक अझम्शन आहे. मी निफ्टी-५० चे १०/५/३/१ वर्षाचे परतावे (दर दिवसाचे) एनएससीच्या डेटा डाउनलोड करून प्रोसेस केले आणि त्याचे गेल्या १९ वर्षाचे (२००० पासून - साधारण ४०००+ दिवसांचे) स्टॅट्स (गेल्या विकेंड पर्यंतचे) असे आहेत. (एनएसीवरून डेटा डाउनलोड करून हे तुम्हाला पण शोधता येईल) १ वर्ष - कमीत कमी परतावे : -५६% (जाने ०८ ते जाने ०९), जास्तीत जास्त परतावे : १०२% (एप्रिल ०३ ते एप्रिल ०४), मिन परतावे : १५%, मिडीयन परतावे : १२%, स्टॅ. डिव्हिएशन : २७% ३ वर्ष - कमीत कमी परतावे : -१६% (एप्रिल ०० ते जानेवारी ०३), जास्तीत जास्त परतावे : ५९% द.सा.द.शे. (मे ०३ ते मे ०६), मिन परतावे : १४.५%, मिडीयन परतावे : ११%, स्टॅ. डिव्हिएशन : १३% ५ वर्ष - कमीत कमी परतावे : -१% (नोव्हे ०७ ते नोव्हे १२), जास्तीत जास्त परतावे : ४४.५% द.सा.द.शे. (ऑक्टो ०२ ते ऑक्टो ०७), मिन परतावे : १४.७%, मिडीयन परतावे : १२%, स्टॅ. डिव्हिएशन : ९% १० वर्ष - कमीत कमी परतावे : ५% (डिसें. ०७ ते डिसें १७), जास्तीत जास्त परतावे : २१% द.सा.द.शे. (मे ०३ ते मे १३), मिन परतावे : १३%, मिडीयन परतावे : १४%, स्टॅ. डिव्हिएशन : ४% हे पाहिल्यावर लगेल कळते कालावधी जास्त असेल तर रिस्क फॅक्टर कमी कमी होत जातो. पुढल्या दहा+ वर्षात जर मला १.५ कोटी साठविले पाहिजेत हे कळल्यावर जेव्हा ते पैसे साठवायला मी जेव्हा सुरुवात करतो, तेव्हा गुंतवणूकीचा कालावधी (१०+ वर्ष) जास्त असल्याने तर मी सुरुवातीला अ‍ॅग्रेसिव्ह अ‍ॅसेट अलोकेशन करू शकतो (^). म्हणजे अधिका-धिक निफ्टी-५० (वा मिडकॅप इ.) बेंचमार्क असणार्‍या इन्स्ट्रूमेंट्स (इक्विटी म्युच्युअल फंड/निफ्टी ईटीएफ्स/डायरेक्ट स्टॉक्स) असा एक्स्पोजर घेऊ शकतो. पण जस जसा रिटायरमेंटचा कालावधी जवळ येत जाईल तस तसा मी इक्विटी एक्सपोजर कमी कमी करत जाईन. म्हणजे रिटायरमेंटला १ वर्षच बाकी आहे. ८०% पैसा इक्विटी अ‍ॅसेट क्लास मध्ये आहे. आणि काही तरी ब्लॅक स्वान इव्हेंट आला तर सगळं कॅपिटल धाडकरून निम्यावर पण येईल. दुसरे म्हणजे, मार्केट किती एक्सपेन्सिव्ह आहे हा एक मोठा फॅक्टर आहे पुढल्या काही वर्षांचे रिटर्न्स गृहीत धरताना. तो बर्‍याच वेळा कन्सेन्सस फॉर्वर्ड पीई रेशोवरून कळेल. पण ही माहिती उपलब्ध नसेल तर एनएससीच्या साईटवरून निफ्टीचा ट्रेलिंग पीई रेशो वरून पण अंदाज घेता येईल. (*)(#) ही दोनही क्रिटीकल अझम्शन्स आहेत. ही अझम्शन्स गडबडली तर पुढलं सगळं गणित चुकेल. (^) अजून काही फॅक्टर मॅटर करू शकतात. उदा. माझी जॉब सेक्युरीटी. माझा जॉब फार सुरक्षित असेल जसे गव्हरमेंटची नोकरी, युनिवर्सिटी कॉलेज प्रोफ, आर अ‍ॅण्ड डी मधला संशोधक विरुद्ध जिथे नोकरीवर गदा येण्याची शक्यता जास्त असते वा एखाद्या प्रोफेशनमधले चढ-उतार जिथे अधिक असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर
म
मुक्त विहारि Fri, 11/29/2019 - 09:53 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर
स
सुबोध खरे Fri, 11/29/2019 - 15:37 नवीन
उत्तम विश्लेषण. येणाऱ्या परताव्यामध्ये जर तूट येत असेल तर तेवढ्या रकमेसाठी ऐखादी अर्ध वेळ नोकरी किंवा व्यवसाय करावा असेच मी सुचवेन. आज साधारण आयुर्मर्यादा ७१ वर्षे झाली आहे असे असताना आपण नोकरी २५ ते ४५ अशी २० वर्षे केलीत आणि ७५ वर्षापर्यंत जगलात तर या २० वर्षात साठवलेली रक्कम पुढची २६ वर्षे फारच थोड्या लोकांना पुरेल असा माझा अंदाज आहे. कारण जसा काळ पुढे जातो तशी महागाई वाढतच जाते आणि जसे आपले वय वाढते तसे वैद्यकीय खर्च भूमितीय मितीने वाढत जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर
म
मुक्त विहारि Fri, 11/29/2019 - 17:05 नवीन
हाच निवृत्ती किती पैसे गाठीशी हवेत? ह्या प्रश्नाचा पाया आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चौथा कोनाडा Tue, 12/03/2019 - 10:20 नवीन
सुधीर, लै भारी कॅल्क्युलेशन्स केली राव ! मानलं तुम्हाला ! तुमचा अन माझा आकडा म्हंजे सव्वा चार कोटी जुळतोय की ! जर ६-७ कोटी मिळाले तर बेष्टच हुईल ! एखादे कोटी रु माझी गावाकडची शाळा+शिक्षकांना देता येतील ! त्यांचे उपकार खरं तर पैश्यात मोजता येणार नाहीत ! आता एखाद दिवस "जीवनातून व्हीआरएस कितव्या वर्षी घ्यावी ?" असा धागा येईल की काय अशी भीती वाटतेय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर
म
मुक्त विहारि Fri, 11/29/2019 - 10:01 नवीन
वयाच्या 50 ते 60 ह्या दरम्यान तुमचा 80% पगार सेव्ह व्हायला हवा. 61-70 ह्या दरम्यान तुमचा 70% पगार सेव्ह व्हायला हवा. 71-80 ....60% सेव्ह. .. 81-90 ...50%.... आणि हे व्हायला हवे असेल तर. ...एकत्र कुटुंब पद्धती अतिशय योग्य. ... आणि 21 ते 25 ह्या दरम्यान लग्न झाले असेल तर ...फारच उत्तम. .... ही माझी जीवनशैली आहे. ..एकत्र कुटुंब पद्धत असल्याने खूप पैसा वाचला आणि अजूनही वाचत आहे. ..
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 12/01/2019 - 11:00 नवीन
_/\_ पैसे वाचवायला कॉम्प्रेमाईज करत जगायची तयारी असणाऱयांसाठी बेस्ट प्रॅक्टिस म्हणून काकामुवींचा हा प्रतिसाद सुवर्णाचे अक्षरात कोरल्या जावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sun, 12/01/2019 - 11:49 नवीन
खूप गोष्टी वाचतात. 1. आमच्या ताब्यात घर देऊन, आईवडील कधीही घर सोडू शकत होते. 2. ते प्रवास करून आल्या नंतर त्यांना घरचे गरम अन्न मिळत होते. 3. कितीही नातेवाईक आले तरी आईला कधी कामाचे दडपण आले नाही. 4. माझ्या आईने प्रोत्साहन दिल्या मुळे , माझी बायको जर्मन भाषा शिकली. अगदी पहिल्या लेव्हल पासून. 5. मुळात माझ्या बायकोचे आणि माझ्या आईचे , एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे आई आजारी पडली की बायकोच हसतमुखाने सेवा करते. ..तसेच माझ्या आई बाबतीत आहे. एकत्र कुटुंबाचे फायदे फार उशीरा समजतात. ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
क
कंजूस Sun, 12/01/2019 - 13:47 नवीन
पटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ज
जॉनविक्क Sun, 12/01/2019 - 14:36 नवीन
तुम्ही एकत्र कुटुंब म्हणजे नवरा बायको व बायकोचे सासू सासरे आणी मुले असे म्हणत आहात होय.... ते तर साधे कुटुंबच झाले की ? बहुतांश लोक एखाद्या परिसराचे दुसऱ्या पिढीतील नागरिक आहेत व तिसऱ्या पिढीचे बालपणही त्याच परिसरात काढू इच्छितात ते असेच जगतात मी तर तुम्ही, तुमचे भाऊ महाशय व त्यांचे कुटुंब वगैरे वगैरे एकत्र रहाता असे सुचवत होता असे वाटले, काकमुविंचा प्रतिसाद बेंटेक्स मध्ये कोरल्या जावा अशी दुरुस्ती सुचवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
क
किल्लेदार Wed, 12/04/2019 - 08:08 नवीन
"काकमुविंचा प्रतिसाद बेंटेक्स मध्ये कोरल्या जावा अशी दुरुस्ती सुचवतो" हा हा हा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
ज
जॉनविक्क Sun, 12/01/2019 - 10:56 नवीन
थोडक्यात KBC चा विजेता ठरल्याशिवाय निवृत्ती घेणे सुज्ञता नक्कीच न्हवे. चला तयारी सुरू करतो 5-6 वर्षात नॉलेज वाढले की KBC ला अपिअर व्हावे म्हणतो
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा