Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मौनाइतके कुणीच नाही

प — प्राची अश्विनी, Fri, 11/08/2019 - 06:37
अथांग, उत्कट, उधाणले तरि किनार ओढुन जसा समिंदर.. स्थितप्रज्ञ कधि सळसळणारे जळाकाठचे वा औदुंबर.. प्रेमळ, नाजुक, पोक्त, समंजस प्राजक्तासम हळवे लोभस.. काजळ रेखुन कधि भिडणारे खट्याळ हट्टी अवखळ ओजस.. कितीहि काही आत उकळले संतापाला घट्ट आवरे.‌ शालिन कधि तर भळभळणारे मिटल्या ओठी दु:ख गोजिरे.. ....... असे देखणे, असे बोलके मौनाइतके कुणीच नाही.... कुणीच नाही.

प्रतिक्रिया द्या
6826 वाचन

💬 प्रतिसाद (11)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 11/08/2019 - 10:56 नवीन
अतिशय सुरेख रचना..
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 11/08/2019 - 13:07 नवीन
सुंदर कविता .आवडली
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 11/08/2019 - 13:23 नवीन
तुमच्या कविता खूपच छान असतात.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 11/09/2019 - 03:56 नवीन
असे देखणे, असे बोलके मौनाइतके कुणीच नाही हे विषेश आवडले आणि पटले सुध्दा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 11/10/2019 - 05:07 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 11/10/2019 - 05:11 नवीन
आहे, ना बोले तुम या गाण्याच्या जातकुळीतले. मौन राखण्यात सतत अपयशी मिपाकर नाखु
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sun, 11/10/2019 - 05:34 नवीन
पद्यात मला गती नाही पण ह्या रचनेमागचा भाव एकदम भावला! - (मौनात राहायला आवडणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 11/13/2019 - 10:43 नवीन
ही कल्पना अन् कविता दोन्ही आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 11/13/2019 - 14:42 नवीन
आजूबाजूला इतकं happening राजकारण चालू असताना देखील , ही कविता वाचणा-या आणि मौनाच्या कवितेवर प्रतिसाद देणा-या सगळ्यांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/14/2019 - 16:11 नवीन
मौनाची कविता आवडली. छान. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे (अजिबात मौनात न राहणारा समिंदर )
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 11/17/2019 - 11:44 नवीन
शेवटच्या २ ओळी वाचल्यावर वरील ओळींचा अर्थ समजला... [मौनी मदनबाबा बाणवाले ] :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Imagine Dragons – Believer (8D AUDIO) [ Use Headphones To Feel The Experience ]
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा