Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

घटस्फोटाच प्रमाण

अ
अविनाशकुलकर्णी
Sun, 11/10/2019 - 05:11
🗣 18 प्रतिसाद
हल्ली घटस्फोटाच प्रमाण वाढलं आहे त्यात लक्षणीय वाढ होण्यात अनेक कारण असतील हि पण मुलीची आहि हिचा मुलीच्या संसारात जास्त लक्ष घालणे काय चालले याची बारीक चौकशी हे कारण पण मुख्यते करून कारणी भूत आहे का ? मुलगी व जावयाला त्याचे प्रश्न सोडावयास भाग पाडणे गरजेचे आहे का ? सासूची लुडबुड परिस्थिती विस्फोटक ठरते आपले काय मत आहे ?

प्रतिक्रिया द्या
10853 वाचन

💬 प्रतिसाद (18)
श
श्री गावसेना प्रमुख Sun, 11/10/2019 - 06:12 नवीन
प्रत्येक नवर्याने जर बायकोला ह्यापासुन परावृत्त केले तर हा प्रश्न सुटु शकतो...
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sun, 11/10/2019 - 06:20 नवीन
अकुकाका इज बँक विथ बँग! - (मत नसलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 11/10/2019 - 06:42 नवीन
लुडबुड पुर्वीच्याकाळी पण असायची रे अवी. स्वतःबद्दलचे गैर्समज आणि प्रमाणाबाहेर वाढलेल्या अपेक्षा ही प्रमुख कारणे आहेत असे आमचे मत. दरवर्षी फिरायला जायचेच,तिशी ओलांडायच्या आत फ्लॅट घेतलाच पाहिजे.. अमुक वयात प्रमोशन झालेच पाहिजे.. ह्यामुळे तणाव वाढतात.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 11/11/2019 - 04:18 नवीन
खूप कारणे आहेत या प्रश्नासाठी. आई आणि मुलगी यांचे विवाहानंतर खूप सारे संभाषण होते. अगदी दोन दोन तास मुली माहेरच्यांशी बोलत असतात. जुनी नाळ तोडल्या जात नाही. नवीन नाळ जुळवली जात नाही. नको तितके माहेरच्यांचे आपल्या मुलीकडे विवाहोत्तर लक्ष असणे हे मुख्य कारण आहे. थोडी धरसोड करावीच. इतर भरपूर कारणं आहे. एक प्रबंध होवू शकतो इतके. सामाजिक दुष्परीणाम जास्त गडद करणारा हा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ध
धर्मराजमुटके Sun, 11/10/2019 - 07:11 नवीन
चालायचचं ! बायकांनी तरी एक मोबाईल किती दिवस वापरायचा :)
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 11/11/2019 - 04:21 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ज
जॉनविक्क Mon, 11/11/2019 - 04:30 नवीन
तर त्यात हळूच विषप्रयोगाचा प्रयत्न करणे कसे वाटते? नाही असे अजिबात करायचे नाही पण उपाय योग्य वाटतो का ?
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 11/11/2019 - 06:20 नवीन
कारण पण मुख्यते करून कारणी भूत आहे का ? हो हो याला करणी व भूते खेतेच जबाबदार आहेत याबाबत माझी खात्री आहे. :D
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 11/11/2019 - 07:44 नवीन
हल्ली घटस्फोटाच प्रमाण वाढलं आहे याचं एक महत्त्वाचं कारण आपली लोकसंख्या चौपट झाली आहे.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 11/11/2019 - 09:23 नवीन
लग्न कारणीभूत आहे आणि एकदा लग्नाच्या ऐवजी समांतर व्वस्थेला समाजमान्यता मिळाली की हा प्रश्न आपोआपच निकाली निघेल. वाचकांचीच पत्रेवाला संसारी नाखु
  • Log in or register to post comments
स
सुमो Mon, 11/11/2019 - 09:31 नवीन
जाऊ द्या हो बारा गडगड्याच्या व्हिरित... Divorce ला मराठीत घटस्फोट हा शब्द कुठून आला म्हणतो मी .... काडीमोड पण म्हणत्यात की !!!
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 11/11/2019 - 09:43 नवीन
घटस्फोटाला कारणीभूत , विभक्त कुटुंब पद्धती आहे . सध्या विभक्त कुटुंब पद्धतीबरोबरच हे जे नोकरीधंद्यामंध्ये पुढे जायची चढाओढ आहे त्यामुळे भरपूर ओढाताण होत असणार .. पण गुरुदेव एवढे हळवे विषय का काढताय चर्चेला ? आम्हाला आपल्याला वेगळ्या रूपात बघायचंय .. सांगा ना .. दाखवाल ना पुन्हा ते रूप ? गुरुदेव हा अर्जुन कम खिलजी आपला निस्सीम चाहता झालेला आहे .. आपण लवकरात लवकर ते चिंधड्या चिंधडया उडवणारे सुदर्शन चक्रधारी लिखाण करावे ,, हि नम्र विनन्ती .. हा पामर , तुमच्या चतुरस्त्र लिहानाकडे डोळे लावून बसलेला आहे ..
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 11/11/2019 - 11:40 नवीन
हळवा विषय? ते धागे उघडा. बघा बघा. तेथे अनेक शंभर प्रतिसादी धागे दिसतील. त्यातलाच हा विषय आहे. धागाकाढू माणूस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
श
श्वेता२४ Mon, 11/11/2019 - 10:54 नवीन
तुमच्या चतुरस्त्र लिहानाकडे शिष्यत्व जमतंय :)
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 11/16/2019 - 03:12 नवीन
अहो चुंबनांचा वर्षाव न होणे हे एक महत्त्वाचं कारण आहे घटस्फोट होण्याचं.
  • Log in or register to post comments
स
सनईचौघडा Sat, 01/23/2021 - 15:55 नवीन
अहो लग्नच नाही केले तर का बरे घटस्फोट होतील हो की नाही अकु काका?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 01/23/2021 - 16:36 नवीन
आता आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा
स
सनईचौघडा Sat, 01/23/2021 - 16:51 नवीन
नाही
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा