शिवसेनेची झोप की जाणिवपुर्वक राजकीय गोगपिद?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान २१ ऑक्टोबर २०१९ निकाल २४ ऑक्टोबर २०१९ . २४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत भाजपा आणि शिवसेना युतीस मतदान करणारी जनता दोहोत अगदीच सरकार बनु न शकण्या इतपत काही बिनसण्याची शक्यता आहे याबद्दल महाराष्ट्रीय सर्वसामान्य जनता अनभिज्ञ होती की मतदार बावळट होता ?
२४ ऑक्टोबर नंतर शिवसेना नेते ५०:५० फॉर्म्युलॅच्या गोष्टी करतात भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आश्वासन दिल्याचे म्हणतात. पण एकुण वाक्य रचनेवरुन मुख्यमंत्रीपद्दवर ५०:५० टक्के करण्याचे आश्वासन न देता अस्पष्टता ठेवली असण्याची शक्यता असू शकते. एखादी गोष्ट स्पष्ट न करणे यास मराठीत गोगपिद (गोमा गणेश पितळी दरवाजा) असा वाक्प्रचार आहे. शिवसेना नेतृत्वासोबत बोलताना अमित शहांनी गोगपिद केले असेल किंवा नसेल पण त्यानंतर म्हणजे १३ ऑक्टोबर २०१९ चा टाईम्स नाऊ या इंग्रजी टिव्ही चॅनलवरची अमित शहांची मुलाखत व्हिडीओ पुढे आला आहे ज्यात ३८मिनीटे ३८ सेकंदपासून पत्रकार नाविका कुमार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण असतील तर अमित शहा केवळ देवेंद्र फडणविसच असतील हे अत्यंत सुस्पष्टपणे सांगताना दिसतात.
सर्वसामान्य मतदाराने दोघांचेही मुख्यमंत्रीपदी दावे ऐकले तरी गोष्टी न ताणता तोडगे निघतील कुणितरी नमते घेईल असाच सर्वसामान्य मतदार विचार करेल. पण ज्यांना आपल्या भूमिका टोकाच्या आहेत हे माहित असते त्यांना १३ ऑक्टोबर पर्यंत परस्परांच्या भुमिका जुळत नाहीत आणि टोकाच्या आहेत त्यांनी त्या टोकाच्या आहेत हे जनतेस / मतदारांना सुस्प्ष्टपणे का नाही सांगितले असा प्रश्न आहेच. अमित शहांना आधी माहित नसेल तरी १३ ऑक्टोबरला टाईम्स नाऊ पत्रकाराकडून आदीत्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्या बाबत समजलेले होते. आणि अमित शहांच्या मुलाखतीची वार्ता शिवसेना प्रमुखांच्या कानावर गेली असणार त्यांनी मतदारांना तोंडघशी घालण्यापुर्वी आपापसात चर्चा का केली नाही ? हा प्रश्न व्हॅलिड रहातोच पण..
शिवसेना प्रमुख निकाला नंतर ज्या पत्रकार परिषदा घेत फिरत आहेत त्या एकाही पत्रकार परिषदेत १३ ऑक्टोबरच्या अमितशहांच्या मुलाखतीतील भूमिकेचा उल्लेख का करत नाहीत ?
सर्वसामान्य जनतेचे सर्वच राजकीय भाष्यांवर लक्ष नसेल पण शिवसेनेच्या राजकीय नेतृत्वापैकी कुणाचेच लक्ष नसेल तर १३ ऑक्टोबर पासून झोपले होते किंवा १३ ऑक्टोबरची मुलाखत जनतेपासून सोईस्कर लपवत आहेत ? महाराष्ट्रीय जनतेशी हि फसवा फसवी का चालू आहे ?
३८ व्या मिनीटापासून पुढे पहावे
💬 प्रतिसाद
(204)
च
चौकस२१२
Wed, 11/27/2019 - 00:14
नवीन
फेकं फेक न्युज
-एक पक्षाचे लोगो वैगरे बदलण्याचे टेंडर काढण्यात येत आहे
माझी कंपनी खालील सादर करीत आहे आपण पण करा
- रंग बदलवून भगव्याचा पांधरा करणे किंवा मिळमिळीत पिवळा
- वाघाचे चिन्ह काढून कोणता प्राणी घाव्या? मांजर तर साहजिक आहे पण त्यापेक्षा तरस किंवा लांडगा ? किंवा प्राण्याऐवजी उगारलेला हात + खंजीर असे असावे काय?
किंवा रडणारे पण रागीट दिसणारे बाळ ! ( नो pun इंटेंडेड )
- ब्रीदवाक्य = आला आजी सोनियाचा दिनू
- उप्ब्रिदवाक्य = संजय उवा च ( जोडशब्द नाही वेगळे शब्द)
तसेस काही गोष्टी गुंडाळून ठेवण्या साठी मोठया पेटाऱ्याची आवश्यकता आहे
- कडवे हिंदुत्व
- सावरकर हा शब्द आणि त्याबरोबर चे सगळे
- पुरंदरेंना दिलेले पाठिंबा वैगरे वैगरे
- तसेच वांद्रे ते दिल्ली व्हाया बारामती अशी नवीन विमानसेवा करण्यात येणार आहे ती जोरात चालणार आहे त्या कंपनी मध्ये शेअर विकण्याचे आहे , ग्यारंटीड नफा पुढली १५ वर्षे ( विश्वास बसत नसेल तर tridant मधील पदवी समारंभ बघा विडियो बघा .. १५ वर्षे जगणार म्हणत्यात )
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Wed, 11/27/2019 - 13:20
नवीन
हि सामनाची टॅगलाईन आता बदलणार की काढून टाकणार आता शिवसेना.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 11/27/2019 - 14:52
नवीन
उद्धवजींनी हिंदुत्वाची नवी व्याख्या केली आहे!
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 11/27/2019 - 13:49
नवीन
ह लेख उत्तम प्रश अचुक उत्तर नहित
https://www.esakal.com/saptarang/political-article-about-maharashtra-government-formation-issue-238967
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5