Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बोटावर शाईचा अजून रंग ओला

ज — ज्ञानोबाचे पैजार, Sun, 11/17/2019 - 06:41
बोटावर शाईचा अजून रंग ओला माझ्या पाठी त्याच आधी खंजीर तू खूपसला दाविलेस डोळ्यांना स्वप्न एक भगवे दारोदारी फिरशी आता लाज सोडून नागवे नकळत तव द्वेष गाड्या जागृत मम झाला विश्वासून तुझीयावर मते तूला दिली राम भरत जोडी ही क्षणार्धात तुटली कालियूगीन भरत कसा सत्तातूर झाला आई भवानी रडली अन, शिवराय व्यथित झाले नाव त्यांचे आज पार धुळीला मिळाले आज तुझ्या कृत्याने जीव धन्य झाला पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
15235 वाचन

💬 प्रतिसाद (18)
ज
जॉनविक्क Sun, 11/17/2019 - 08:34 नवीन
बहोत खूब.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 11/17/2019 - 11:51 नवीन
सुरेख... झेंडा मधले गाणं आठवल !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Imagine Dragons – Believer (8D AUDIO) [ Use Headphones To Feel The Experience ]
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 11/18/2019 - 04:55 नवीन
शिवरायांचा वारसा म्हणवणारे अशा स्थितीत आहेत हे पाहून विषाद वाटला. शरम वाटते आहे त्यांची. अन हे कसले मराठीचे वाली? हे तर मराठी माणसांचे खूनी! समयोचित काव्य पैजारबुवा!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 11/18/2019 - 07:05 नवीन
अगदी, अगदी.
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 11/20/2019 - 04:53 नवीन
आणि समयोचित. हटवादी पणा आणि शंभर टक्के मूळच्या पिंडाशी फारकत यानेच ना घरका ना घाटका अशी अवस्था करुन घेतली आहे. तुका म्हणे उगा रहावे, जे जे होईल ते पहात जावे पंथातला शिक्कामोर्तब झालेला नाखु
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 11/20/2019 - 12:15 नवीन
पैंबू काका , व्यक्त छान झाला आहात पण अजून व्यक्त व्हायला हवं होत असं राहून राहून वाटतंय .
  • Log in or register to post comments
स
सुमो Wed, 11/20/2019 - 12:43 नवीन
दाविलेस मम नेत्रांना एक स्वप्न भगवे गुंडाळीलेस डोईवरी कमरेचे शेवटचे वदला काका मग देईन तुज पितांबर ल्यावयाला म्याडम देखिति न म्हणती हा असाच चांगला --- हे आपलं र ला र अन ट ला ट हो पैजार बुवा मूळ कविता छानच हे वै सां न.
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sun, 11/24/2019 - 17:13 नवीन
मस्त आणि योग्य..
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Sun, 11/24/2019 - 18:03 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
N
Naval Mon, 11/25/2019 - 09:20 नवीन
शीर्षक खुप भारी !!!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 11/26/2019 - 11:49 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Tue, 11/26/2019 - 12:23 नवीन
आता अजून एक कविता पाडा... मी परत येणार. मी परत आलो. मी लगेच चाललो. गलगले निघाले.........
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 11/27/2019 - 06:50 नवीन
पळतच आलो येताना,पण पोपट झाला जाताना, अंगावरती कातडे सिंहाचे, आत लपलेला लबाड लांडगा , अलगद शिकार झालो त्याची, सत्ते मागे पळताना गाफिल राहून पडलो एकटा, काळोखी बघ रात्र उगवली , डोळे उघडले तेव्हा नव्हती , दिसली खुर्ची जाताना चाणाक्य नीती व्यर्थ जहाली ,वारही केले फुकटची गेले पुन्हा येण्याचा अर्थ आकळे, त्वरीत परतूनी जाताना गुडघ्याला मी बांधून बाशींग, माळ घातली शंढाला, पार्टी विथ डिफरन्स कसे म्हणू मी, जनतेला मते मागताना, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
स
संजय पाटिल Wed, 11/27/2019 - 11:52 नवीन
दोन्ही पण जबराट.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
M
mrcoolguynice Wed, 11/27/2019 - 15:03 नवीन
गेल्या हजार वर्षात, असे शीघ्र व समयोचित विडंबन प्रतिक्रियेत आले नाही... अभी हम बोले तो बोलें क्या, करे तो करे क्या... वाह पैबुजी वाह...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
जॉनविक्क Wed, 11/27/2019 - 18:20 नवीन
हे वास्तववादी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
न
नाखु गुरुवार, 11/28/2019 - 17:20 नवीन
सारेच अनाकलनीय आणि अनावश्यक आत्मघातकी साहस. शिक्कामोर्तब झालेला नाखु नवीन सरकारला शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
ग
गणेशा Tue, 12/03/2019 - 06:11 नवीन
भारी
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा