शह काटशह
सध्याचे जे राजकारण / खुर्चीखेच चालू आहे ते पाहता , मी स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवून घ्यायची लाज वाटू लागली आहे .. निषेध व्यक्त करण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नाही आहे ..
१) कितीही झालं तरी महारष्ट्रातील सत्ता , पवार या नवभावतीच फिरते , हे पुन्हा सिद्ध झालंय . मग ते श्री अजित पवार असो किंवा श्री शरद पवार ..
२) उद्धव ठाकरेंनी , बाकी असेल तर ठाकरी बाणा दाखवून , शिवसेना हि सत्तेसाठी कधीच नव्हती , ती मुळात जन्माला आली होती ती सामान्य माणसाच्या हक्काच्या लढाईसाठी . हे दाखवून द्यावं .. तरच त्यांची उरलेली सुरलेली ( जर काही बाकी असेल तर आणि तरच ..) लाज राहू शकते .. खुर्ची नाही मिळाली तरी हरकत नाही , पण मुंबईकरांच्या लढ्यासाठी , शिवसेना मुंबईत असणे , गरजेचे आहे .. विरोधात राहूनही , चांगले काम करू शकतो . त्यासाठी सत्ताच कशाला हवी ? पण हे अजून तरी त्यांना जमले नाही आहे , आणि पुढे जमेल याची शक्यताही वाटत नाही आहे ..
३) आमदार राखण्यात काय हशील आहे ? ज्याला जायचे आहे तो जाईल आणि राहायचे आहे तो राहील .. उगाच कोंबडीवानी सर्व पिल्लं पंखाखाली हैत कि नाही याची काळजी घेणं , हा ठाकरी बाणा नव्हे .. अहो जागवा त्या आठवणी गतकाळातल्या .. त्यातून शिकण्यासारखं बरंच आहे ...
४) श्री शरद पवारांच्या ताब्यात एव्हढी सारी आमदार मंडळी असणे , हे कधीही धोकादायक असू शकते .. त्या माणसाला ब्रम्हदेवही ओळखू शकणार नाही तर तुमची आमची काय भिशाद.. सर्वात चाणाक्ष नेता / लोकनेता सध्याच्या घडीला महाराष्ट्रात शरद पवारच आहेत ..
तेव्हा जरा सांभाळून पावले टाका .. नाहीतर पुढे तेलही गेले तूपही गेले , हाती आले धुपाटणे .. अशी अवस्था होऊ शकते .. हे झाले माझे मत , जे मी पाहिल्यान्दाच या धुळवडीच्या भाग घेऊन चर्चा करत आहे , पण तुमची मतेही वेगळी असू शकतात . ती इथे मांडली तर उत्तम .. पण एक मात्र नक्की , पुढील मतदानात आवर्जून भाग घेणार आणि नकाराधिकार वापरणार .. हे लेकाचे समजतात काय आपल्याला ..
💬 प्रतिसाद
(60)
M
mrcoolguynice
गुरुवार, 11/28/2019 - 15:02
नवीन
जर का भुजबळांना गृहमंत्रीपद मिळालं, तर ...
बऱ्याच जणांचे दात बाहेर येतील.. असं वाटतंय.
- Log in or register to post comments
M
mrcoolguynice
Fri, 11/29/2019 - 07:47
नवीन
शपथविधीनंतर "मावळते मुख्यमंत्री ह्यांनी उगवत्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायचे असते",
असे सभ्य राजनैतिक जीवनाचे, मॅनर्स व एटिकेट्स असतात. परंतु राजनीतीत अपयश आले, तरी एक व्यक्ती म्हणून खुजेपणा दाखवायला नको होता. अश्याने त्यांच्या मुळ स्वभावातील कद्रुपणा, वरवरील सोज्वलतेचा बुरख्याआडून दर्शन देऊन गेला.
बाकी कालच्या शापाथविधीमध्ये, कोल्हापुरातील पुरातुन पुण्यात वाहून आलेल्या गाबाळातील, चंपा बाईचा चेहेरा पहाण्यालायक होता.
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Sat, 11/30/2019 - 11:08
नवीन
मी गेल्या गुरुवारी मातोश्रीवर होतो .. तासदीड तास तिथे मी काढला .. जब्बरदस्त जागा .. माझे सध्या ठाम मत बनले आहे कि या जागेतच काहीतरी अद्भुत असावे .. एक गूढ आणि प्रभावी वास्तू असे मी म्हणेन .. तिथला हरेक पहारा त्या जागेत येणाऱ्या प्रत्येकाला डोळ्यात तेल घालून पाहत असतो .. ती जागा म्हणजे मुंबईचा किल्ले राजगड वाटते .. अद्भुत अक्षरशः अद्भुत ,,, असो .. मी इथे खालील काही निरीक्षणे नोंदवत आहे
१) महाविकास आघाडीचा शपथविधी जवळच शिवाजीपार्कात ( शिवतीर्थावर ) पार पडला ..अक्षरश गर्दी उसळली होती .. उद्धव ठाकरेंनी खरतेच कमाल केलीय .. तुफ्फाणी प्रतिसादात सर्वाना अचंबित करून सोडले आहे ..
२) मा अहमद पटेलांची उपस्थिती म्हणजेच सोनिया गांधींची उपस्थिती असे मी म्हणेन
३) एक आश्चर्यकारक घटना बघितली .. दादर टीटीपासून ते शिवतीर्थ पर्यंत सर्वत्र फक्त भगवे आणि युवकाँग्रेसचे झेंडे होते .. कुठेही राष्ट्रवादीचा झेंडा दिसला नाही .. जर चुकल्यासारखे वाटले आणि पुढे काहीतरी विपरीत घडू शकते असे वाटतेय .. अजूनही खेळ संपलेला नाही असे दिसतेय ..
४) कसेही असले तरी मुख्यमंत्र्यांनी पहिलाच हातोडा मारून सर्वावर कडी केलीय
एक म्हणजे : बळीराजाला येत्या दोन दिवसात चौकशी करून न्याय मिळवून देण्याचा निर्णय आणि कारशेड स्थगिती .. ( अर्थात त्यांनी जो शब्द दिला , तो पाळण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे हे दाखवून दिलेय असे दिसते .. आता पुढे बघू काय होते आहे ते ..)
५) अजितदादांच्या बातम्या ( उपमुख्यमंत्री होणार ) अजूनही कानावर येत आहेत .. आणि अजूनही उपमुख्यमंत्री ठरलेला नाही त्यामुळे सावट अधिकच गडद झालेले आहे ..
६) मा शरद पवार , सध्या मीडियापासून लांब आहेत , त्यामुळे काहीच कळत नाही आहे..
७) उद्धव ठाकरे याना पाहिल्यान्दाच मीडियासमोर बोलताना बघितले .. आत्मविश्वास ठासून भरलेला दिसला .. ती एक सकारत्मक बाब वाटली ..
८) स्वतः हाडाचे दुर्गप्रेमी आणि त्यात छायाचित्रकार , त्यामुळे गडकोटांना चांगले दिवस येतील असे अपेक्षित आहे ..
९) काही गोष्टी खटकल्या .. गरीब आणि गरजू लोकांना , विनामूल्य कर्ज देऊन उच्चशिक्षण देणार .. पुन्हा शिक्षण आले ते हि असे म्हणजे परत शिक्षण संस्था उभ्या राहणार नव्याने .. मग आहे पुन्हा तेच .. हे कुठेतरी थांबले पाहिजे .. शिक्षणाचा बाजार मांडण्यापेक्षा , शिक्षण मोफत आणि दर्जेदार कसे दिले जाईल यावर भर दिला तर हे सर्व थांबेल अन्यथा नाही .. हा बाजार पुन्हा वाढतच जाईल .. आधीच्या सरकारांनी हेच तर केले .. शिक्षणाच्या नावावर संस्थानचे बुरुज उभे केले आणि अजूनही त्यातील रसद घरापर्यंत साभार पोच होतेय .
काही गोष्टी आवडल्या तर काही गोष्टींची भीती वाटतेय .. पुढील भावी घोटाळ्याची .. बघू आता काळच ठरवेल पुढे काय होतंय ते .. बाकी या नव्या मुख्यमंत्र्यांनी सध्यातरी बाजी मारलीय असे दिसतेय ..
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Sat, 11/30/2019 - 18:18
नवीन
काकासाहेबांचा सगळ्यातच हात असल्याने त्यांच्याबद्दल चांगले अथवा वाईट असे एकच मत बनवून त्याला चिकटून राहणे मला पटत नाही, उठा मात्र मला दरवेळी त्यांच्या हातात असलेल्या मर्यादीत चालीमधून कायम वर वर मृदू आणी आतून कमालीचे कणखर भासतात. त्यामुळे आता उघड सत्ता हाती असताना ते काय करतात याबद्दल अत्यन्त औत्सुक्य आहे.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sun, 12/01/2019 - 04:15
नवीन
उठा सेना ही सेटलमेंट सेना आहे. जनतेला भडकावयचे, गूंडगिरी करून प्रोजेक्ट बंद पाडायचे, त्यात आपण पैसे गुंतवायचे आणि त्याच भावना पायदळी तुडवून नंतर प्रकल्प आणायचे ही सेनेची राजनीती. यासाठीच precisely मला सेना नको वाटते. साधारण डाव्यांसारखी नीती, फक्त राजकारण उजव्या बाजूचे.
एनरॉन, नाणारला हेच केले. आता हे सरकार आल्यावर बघा नाणार परत येतो की नाही. आतल्या गोटातील माहितीनुसार उठा साहेबांचा बराच पैसा नाणार वरती लागलेला आहे. यामध्ये विकासकामांचे अभूतपूर्व नुक्सान होते. शिवसेना नसती तर एव्हाना हा प्रकल्प मोठ्या क्षमतेने सुरू होण्याच्या मार्गावर असता. मेट्रो चे पण तेच होणारे.
राष्ट्रवादी ची पद्धत वेगळी आहे. आमच्या भागात नवीन MIDC येणार होती. तिची अधिसूचना यायच्या अगोदर १ वर्ष भुजबळांची माणसे तिथे जमीन खरेदी करत होती. तो प्रकल्प पण आता शिवसेनेने बंद पाडला अशी बातमी आहे. या सर्व गोष्टींंमुळे मला शिवसेना आणि काँग्रेस एकाच माळेचे मणी वाटतात.
त्यामानाने भाजपा आणि राष्ट्रवादी बरे. पैसे खातात, पण कामांचा धडाका असतो. राष्ट्रवादी - ५ लाखाचे काम २५ लाखाचे दाखवून २० लाख खातात. पण कामाचा दर्जा चांगला असतो. आणि तेच माणूस शिवसेनेमध्ये गेल्यावर पुन्हा निकृष्ट प्रतीची कामे करायला लागतो. रस्त्याचे खड्डे बुजवून नवीन डांबरीकरणाचे पैसे खाणे, गरिबांचा कळवळा दाखवून विकासाचे प्रोजे़क्ट बंद पाडून पुन्हा लोकांना गरीबच ठेवून त्यांच्या भावनांचे राजकारण करणे या गोष्टींध्ये शिवस्सेना आणि काँग्रेसचा हात कोणी धरू शकत नाही.
अजित पवर आणि फडणवीस यांनी एकत्र सरकार केले तेव्हा मला प्रचंड आनंद झाला होता. पण दुर्दैवाने तो अल्पायुषी ठरला. ते पुन्हा एकत्र येतील अशी अपेक्शा थेवतो.
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Sun, 12/01/2019 - 09:08
नवीन
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 12/01/2019 - 11:13
नवीन
आनन्दा,
अगदी नेमकं बोललात. नेमका हाच आरोप १९९९ साली युती सरकारवर झाला होता. लोकांच्या मते काँगेस व राष्ट्रवादी पैसे खाऊन कामं तरी करायचे. युतीवाले फक्त पैसेच खायचे. प्रशासनावर पकड नसल्याने कामं सरकवायची अक्कल नव्हती. परिणामी युतीस पाच वर्षं पैसे खाऊनही १९९९ च्या निवडणुकांत आघाडीपेक्षा ८ जागा कमी मिळाल्या.
आज उद्धव यांच्यासमोर कामं मार्गी लावायचंच आव्हान आहे. प्रशासनावर पकड पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Sun, 12/01/2019 - 17:40
नवीन
साहेब पुढील पर्याय समाप्त कधीच करत नाहीत
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Sun, 12/01/2019 - 17:44
नवीन
ते सत्ता राबवत असल्याचे उघड दिसले व उद्या काही कमीजास्त झाले तर जनमत पूर्णपणे भाजपाकडे झुकायला वेळ लागणार नाही त्यामुळे तसाही त्यांना लगेच फोकस नको आहे...
सगळे जण ठाकरे सरकार चा उर बडवत आहेत त्यामुळे इतरांची पापे माहीत असूनही उठसुठ डोळ्यासमोर येत नाहीत.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Sun, 12/01/2019 - 20:20
नवीन
भारी लिहिले आहे.
पिंपरी चिंचवड चे पण बोलायचे झाल्यास राष्ट्रवादी महानगर पालिकेवर होती तेंव्हा कामे कडक होते होती आणि दिसत होती, येथील बऱ्याच जणांचे म्हणणे होते, खा बाबा पण आमची कामे चांगली करतोय ना बस.
आता मात्र भयाण दिसते आमचे पिंपरी चिंचवड, बघू...
बाकी भाजप आणि अजित पवार यांची युती मला मुळीच आवडली नव्हती. बोलेन यावर पुन्हा नंतर
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2