Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।।

ब — बाजीगर, Sat, 11/30/2019 - 12:08
तुळजाभवानीचे दागिने कर्मचा-यांकडून लंपास लोकसत्ता 30 नोव्हेबर 2019 देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।। म्हणून लंपास केली मंदिराची तिजोरी ।। तुम्ही करत बसा कोर्ट आणि कचेरी ।। देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।। सोने, चांदी, भांडीपात्र, काही शिल्लक नाहीमात्र।। तुम्ही बसा तपासत, नोंदी आणि हजेरी ।। देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।। तीर्थी धोंडा पाणी म्हणाले तुकोबा जत्रा मे फत्रा बिठाया तिरथ बनाया पानी वाणी ती कबीरी देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।। मंदिरांच्या तिजोरीत सोने चांदी सडती ।। इथे गोरगरीब अन्नाविना रडती ।। करा देव-तिजोरीची निलामी साजरी।। देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।। तुम्ही करत बसा कोर्ट आणि कचेरी ।। देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।।

प्रतिक्रिया द्या
5193 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ज
जॉनविक्क Sat, 11/30/2019 - 17:54 नवीन
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Mon, 12/02/2019 - 11:54 नवीन
काय म्हणावे लोकांच्या भित्रेपणाला. तिथे धीट चोर देवाचे दागिने चोरतात, इथे पापभिरु भोळसट प्रतिक्रिया द्यायला पण घाबरतात (काहि दिलेल्या प्रतिक्रिया काढून टाकतात,न जाणो काही झालं तर) हा हा हा कीव आली बौद्धिक दारीद्राची. धदा ह्या भितीवरच चालतो.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Wed, 12/04/2019 - 15:13 नवीन
देव मानंना, मंदिराचे पुजारी ।। लंपास ती केली, अख्खी तिजोरी ।। श्रद्धाळूच्या माथी मग, कोर्टाचीच वारी ।। सोनं अन चांदी, वस्त्रें भरजरी ।। काल्पनिक ती सारी, देवासम या ।। उल्लेखी शिल्लक, फक्त नोंदी हजेरी ।। तीर्थी, धोंडापाणी, म्हणे तुकोबा ।। डोकोनियातु पाही स्वअतरंगी।। अनुमोदनासी वाणी ती कबीरी ।। आपुलीची अक्कल आपणेच निलामी ।। आपणच भरीतो पुजाऱ्याची तिजोरी, पिढ्यावारी ।। देव मानण्याची पुजाऱ्या काय ती जरुरी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर
ब
बाजीगर Mon, 12/02/2019 - 12:54 नवीन
मुक्ती अ‍ॅड. अनंत खेळकर जन्मभर किती पाळले सोवळे कशाला कावळे पिंडासाठी जरी नाही कधी जीव तू लावला तरी तो कावळा शिवलाच शिवता कावळा मोक्षप्राप्ती झाली कीव तुझी आली मुक्या जीवा
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Mon, 12/02/2019 - 13:18 नवीन
देव मानीत नाहीत मंदिराचे पुजारी ।। हे जास्ती सयुक्तिक झालं असतं.
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Wed, 12/04/2019 - 14:08 नवीन
पुजारीच लिहिले होते आधी. सगळी यमकं त्यासाठीच जुळवलीत. पण नंतर बदल केला.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/04/2019 - 14:18 नवीन
देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।। म्हणून लंपास केली मंदिराची तिजोरी ।। आवडली रचना. मी पहिल्यापासून म्हणतो, देव वगैरे या सर्व भ्रामक कल्पना आहेत, लोक ऐकत नाही. नादी नका लागू रे....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क गुरुवार, 12/05/2019 - 13:36 नवीन
ते पण ऐकायचं का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बाजीगर Sun, 12/08/2019 - 00:33 नवीन
देव दानवा नरे निर्मीले. यात मला काहीही शंका नाही. चांगले वागणे,इतरांना यथाशक्ती मदत करणे,इतरांना न फसवणे, या गोष्टी आम्ही सहज करतो. त्यासाठी देव दानव च्या बागूलबूआ ची गरज नाही. धन्यवाद डाॅ.साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बाजीगर Sun, 12/08/2019 - 00:27 नवीन
आवडली तुमची कविता.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Sun, 12/08/2019 - 07:24 नवीन
अहो तुमचीच कविता, एखाद दुसरा शब्द फिरवुन नकलवून लिहीलीये. तुमचीच मूळ कविता आशयघन असल्याने, तिची माझ्याकुन झालेली नकल, सुंदर भासतीये. क्रेडिट टू यु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा