Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दोन मिनि मायक्रो पोस्त्स

अ
अविनाशकुलकर्णी
Sun, 12/08/2019 - 09:39
🗣 15 प्रतिसाद
"कांदे पोहे" कार्यक्रमात आपणास नकारलेल्या मुलिची जेंव्हा काहि वर्षानंतर लग्न समारंभ वा तत्सम कार्यक्रमात भेट होते व ति आपल्या पोट सुटलेल्या व टकल्या नव~याची ओळ्ख करुन देते त्या वेळी मनात कोणत्या भावना असाव्यात..आनंद..सुड..अनुकंपा? --------------------------- कांदे पोहे प्रोग्रॅम मध्ये मी मागे एकांकडून असं एकलंय की मुलगी बघायला जाताना मुलीकडे कमी आणि मुलीच्या आईकडे नीट बघावं. कारण जी मुलगी बघायला जातो ती आणखी 15/20 वर्षानंतर कशी दिसेल याची तिच्या आईकडे बघून कल्पना येते

प्रतिक्रिया द्या
10315 वाचन

💬 प्रतिसाद (15)
N
Nitin Palkar Sun, 12/08/2019 - 09:47 नवीन
पूर्वार्धाबद्दल तटस्थ किंवा खरं तर उदासीन हा शब्द अधिक योग्य. उत्तरार्धाबाबत- शितावरून भाताची परीक्षा हा वाक्प्रचार वाचला होता पण भटवरून शिताची परीक्षा करण्याची उफराटी पद्धत नवीनच वाटते....
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Sun, 12/08/2019 - 11:11 नवीन
मुलगी समजा बापावर पडली असेल, तर बापाकडे पाहून त्याप्रमाणे, १५-२० वर्ष्यानी ती टकली थोराड कानामागे केसांचे पुंज.… अशी कल्पना तरी कशी करवेल ?
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 12/15/2019 - 15:35 नवीन
मुलीच्या आईकडे प्रेमाने पहावे सोबतच कात्री चालवून तिचे केस कापून त्याचे गंगावन बापाच्या टाकल्यावर ठेवावे आणी अंदाज घ्यावा :)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
ट
ट्रम्प Sun, 12/08/2019 - 18:36 नवीन
मुलीच्या आईकडे ' नीट ' बघताना आजूबाजूच्या लोकांचा गैरसमज झाला तर ?
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 12/11/2019 - 13:40 नवीन
हे असं होईल .. =================== वऱ्हाड घेऊन दारात आलोय वाजंत्री वाजतेय कुठं लपून बसलीय दिसलीच नाही , सासूबाई का लाजतेय ? ढोल ताशांच्या गजरामध्ये गोंधळ म्या घातला नाचता नाचता, तिचा समजूनि सासूचा हात पकडला मुंडावळ्या सारुनी बाजूला खसकन मारला डोळा सासू लाजून चूर झाली सासरा पडला काळानिळा गडबड होता उगा फुकाची भानावर म्या आलो माफी मागुनी सासूची गुमान बोहल्यावर चढलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
प
पाषाणभेद Wed, 12/11/2019 - 15:47 नवीन
सही खिलजी. ( मूळ नाव खिल. जी आदरार्थाने) मस्त. वेगळीच लिहायला हवी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
क
कंजूस Mon, 12/09/2019 - 00:43 नवीन
सध्या सासऱ्याच्या बँक ब्यालन्सकडे लक्ष ठेवतात. एक धरलं तर दुसरं सोडावं लागतं.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 12/09/2019 - 13:30 नवीन
वॉव ! केवळ आध्यात्मिक लेख ! प्रचंड आवडला आहे हे वेगळे सांगणे न लगे ! मृत्युनंतर स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून आयुष्यभर दारु प्यायची नाही, व्याभिचार करायचा नाही वगैरे वगैरे !
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 12/11/2019 - 15:45 नवीन
विरप्पन श्रीलंकेत गेला अन पेढे फारच महाग म्हणून बाकरवडी साडीत रंग ओला असतो. रॉकेट महाग पोपट दरवाजा चित्रपट आहे. मायाळू गरबा फारच हिमालय नाही.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Wed, 12/11/2019 - 16:22 नवीन
आत्ता कुठं लक्षात आलं की पाषाण भेद कसा करायचा असतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
व
विजुभाऊ गुरुवार, 03/05/2020 - 02:59 नवीन
हाण …… तेज्या…….. लैच्च बेक्कार हसत सुटलोय प्रतिसाद वाचून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
प
पाषाणभेद गुरुवार, 12/12/2019 - 02:54 नवीन
अकुंच्या लेखनात भरपूर पोटेंशीअल असते. त्यांनी ट्विटरसारखे लेखन करून मराठी ब्लॉगरच्या/ फोरमच्य क्षेत्रात क्रांती आणली आहे. आधीच्या धाग्यात न का उघडकीला येवो पण या घाग्याच्या नावातच त्यांनी त्याची चुणूक दाखवली आहे. एक नव्हे तर दोन दोन मायक्रो ब्लॉग त्यांनी येथे लिहून यापुढील शतकात मराठी ब्लॉगची काय स्थिती राहणार आहे ते सुचित केले आहे. इतिहासाचे लेखन तर सारेच करू शकतात कारण तो घडून गेलेला असतो. पण भविष्यकाळाचे कथन करणे ज्यांना जमते तेच द्रष्टे असतात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 12/13/2019 - 16:30 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
च
चौकस२१२ गुरुवार, 03/05/2020 - 03:21 नवीन
पोट सुटलेल्या व टकल्या.. मास्तर, अहो हे आपण त्यावेळेल्स कोणत्या परीस्थित आहोत त्यावर अवलंबून नाही का? स्वतः आपणच जर तसे असलो तर कसला आनंद..सुड..अनुकंपा? आपलीच लाज ! - आई वरून मुलीचा अंदाज! ... एकदा मित्राचा किस्सा .. आमुक अमुक कुटुंबातील मुलगी सांगून आली आहे हे ऐकल्यावर तो २ दिवस हवेत होता कारण ..त्याला आठवलं कि अरे हि तर आपण लहान असल्यापासून बघत असलेल्या त्या शाळेतील छान दिसणाऱ्या बाईंची मुलगी ! वाह लॉटरी लागली कि आपली ! कांदे पोहे प्रसंग नंतर हिरमुसलं तोंड घेऊन आला.. का रे विचारला तर म्हणाला... उगाच उडत होतो... पोरगी आई नाही, बापावर गेलेली निघाली ...
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 03/08/2020 - 12:52 नवीन
अश्या कार्यक्रमांना फक्त "कांदे पोहे" या पदार्थाचा आस्वाद घ्यावा, फार इचार करू नये !
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा