Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अन रात झाली शाम्भवी

ख — खिलजि, Wed, 12/11/2019 - 13:35
अलवार त्याचा अस्त झाला अन रात झाली शाम्भवी चांदवा घेऊन तारे जणू सूर छेडे भैरवी कोण या हृदयात आले ? वाट शोधून ती नवी प्रहर भासे वेगळा जणू अंतःपुरा उगवे रवी गुंजते सुमधुर कर्णी नाद लावे भार्गवी श्वास गेले लोपुनी अन चित्त झाले पाशवी भेट होता लोचनांची आत फुटली पालवी बहरला तो प्रेमवृक्ष दृष्टी सृष्टी हिरवी ======================= सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
7296 वाचन

💬 प्रतिसाद (15)
श
श्वेता२४ Wed, 12/11/2019 - 16:05 नवीन
कविता छान झालीय. पण तुमच्या नेहमीची मुक्तछंद टाईप नाही. आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 12/11/2019 - 17:21 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 12/12/2019 - 00:04 नवीन
सिविपा, खूपच छान सुचलीय कविता. आणि मलाही 'आश्चर्याचा सुखद धक्का' बसला आहे.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 12/12/2019 - 05:08 नवीन
सुंदर. आवडली!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 12/12/2019 - 06:36 नवीन
खरेच, तुमच्या कडून अशी कविता हा एक सुखद धक्का होता. मस्त मजा आली वाचतना... श्वास गेले लोपुनी अन चित्त झाले पाशवी कवितेमधला भाव लक्षात घेतला तर वरील ओळीतला "पाशवी" हा शब्द खटकला. सहसा ह शब्द जरा वेगळ्या अर्थाने वापरला जातो लिहित रहा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 12/12/2019 - 10:09 नवीन
रम्य ते प्रतिसाद आले लागली हळद अंगाला ऐसेच प्रेम राहू दे आम्हावरी प्रतिसाद आपुले, आम्हा अमृताचा प्याला कैसे सुचले देव जाणे लिहीत गेलो मनापासून सांसारिक जीवनात ऐसी कल्पना देई जगण्याचे बहाणे
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Fri, 12/13/2019 - 13:17 नवीन
मस्त !! आणखी थोडे काम केले तर छान भावगीत होइल.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 12/14/2019 - 14:49 नवीन
सुरेख झालीय कविता.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sat, 12/14/2019 - 15:54 नवीन
मस्त जमलीय कविता. खिलजी साहेबांनी सुखद धक्काच दिला मला अशी कविता करुन.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 12/16/2019 - 07:10 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 12/16/2019 - 07:52 नवीन
मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 12/16/2019 - 08:29 नवीन
चांगलंय. "..रात झाली शांभवी!" छान ओळ!
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Mon, 12/16/2019 - 09:29 नवीन
"शांभवी" म्हणजे काय असतं रे भाऊ ???
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 12/16/2019 - 10:24 नवीन
मी महादेवाचा भक्त आहे ... तोच कारक प्रेमाचा , उत्पत्तीचा आणि प्रलयाचा .. त्याच्यापासून उत्पन्न झालेले ते म्हणजेच शाम्भवी.. अर्थात इथे अर्थ , पहिल्याच नजरेत होणाऱ्या प्रेमामुळे जी ब्रम्हानंदी टाळी लागते ती म्हणजे शाम्भवी असा घेण्यात आलेला आहे ... शाम्भवी या शब्दाचा दुसरा अर्थ " शंकराची पत्नी पार्वती " .. म्हंटल तर तो पण इथे लागू होऊ शकतो .. घ्याल तो अर्थ आणि कराल ती कल्पना .. तसाही मी एकदम रुक्ष आहे .. या स्त्रीजमातीपासून कोसो दूर आणि प्रेम तर कधी केलंच नाही त्यामुळे फक्त कल्पना सुचतात .. या अश्या प्रेमळ कल्पना तर फार विरळ आणि जास्त करून भयानकच सुचतात ..
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 12/16/2019 - 15:52 नवीन
जबरदस्त!!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा