Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उडता मुका, जरी असला सुका

ख — खिलजि, Fri, 12/13/2019 - 11:12
उडता मुका, जरी असला सुका तो गॉड मानून घ्यावा कितीही चंचल पऱ्या दिसल्या तरी एकीचाच हात धरावा सोज्वळ शालीन निवडून द्यावी सून आपुल्या घराला घेत जावे उडते मुके मग ठेउनी स्थिर मनाला हात लावूनी ओठांना त्या सोडिती हवेत सारे अंतकुक्कुट बनवती सैरभैर उमजा धोक्याचे हेच इशारे सुक्या मुक्यांचे पाश हळूहळू करतील विजार तुमची ओली घेणाऱ्याला करावा लागतो आपला खिसा तिच्या हवाली सुक्या मुक्याने पदरी पडती फक्त ओलीचिंब स्वप्ने बायको कुशीत येऊनही उराशी नको नको ते दुखणे इथे धड ना तिथे धड नुसती मनाची घालमेल मुक्यामुळे तो मुका जाहला जणू जिव्हा झाली जड कशाला हवे ते सुके मुके ओले हक्काने घ्यावे दुर्लक्षून ते सारे सुके एकीलाच जवळ करावे ========================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
4082 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ज
जॉनविक्क Fri, 12/13/2019 - 11:46 नवीन
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Fri, 12/13/2019 - 11:48 नवीन
अशा विषयावर मिपाकर स्त्रिया लिखाणाच्या बाबतीत मूग गिळून बस्तात असेच निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
प
पाषाणभेद Fri, 12/13/2019 - 12:17 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Fri, 12/13/2019 - 13:15 नवीन
;-)))))
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 12/16/2019 - 07:46 नवीन
धन्यवाद सर्वाना .... एकदम शीघ्र सुचलीय हि कल्पना .. सकाळी सुमारे आठच्या दरम्यान मी मुलाला शाळेत सोडून येत होतो .. जवळच असलेल्या फाईव्ह गार्डन परिसरात बऱ्याच तरुणतरुणी चालत असतात .. एक सुंदर तरुणीने मस्तपैकी माझ्या मागून येत असलेल्या तिच्या मैत्रिणीला उडत मुका दिला ..मी दोघींच्या मध्ये असल्याने , गोंधळून गेलो .. आणि तिथेच गाडी थांबली .. मग ..काय तिलाही तिच्या मुक्याचा परिणाम जाणवला आणि मी तर आधीच सर्द झालो होतो .. त्या दोघीही आपापसात हसल्या , गळाभेट झाली आणि आल्या मार्गाने माझ्यावर हसत निघूनही गेल्या .. थोड्याच वेळात गृहमंत्र्यांच्या फोन आला आणि भाजीकुजी आणायला सांगितले .. तो थोडा क्षणिक बदल , हि कल्पना देऊन गेला आणि परत गृहस्थाश्रमाकडे रवाना झालो .
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 12/16/2019 - 11:13 नवीन
शाळेत तुम्ही जाताय का मुलाला सोडायला! बरं बरं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा