Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"गंमत केली" म्हणालास तू...

प — प्राची अश्विनी, Sat, 12/14/2019 - 03:26
"गंमत केली" म्हणालास तू "कळले मजला" मीही म्हटले. तुलाही ठाऊक मलाही ठाऊक खरे काय अन् खोटे कुठले. लाईक होते असंख्य त्यावर डीपी जेव्हा नवा ठेवला पाठवले तू smile जेव्हा इथे खुशीचे तरंग उठले. नुसते smile, ठाक कोरडे तरी पोचते ओल त्यातली. एक इमोजी सांगून जातो शब्दांना जे नसते जमले. म्हणो कुणी हा सोशल मीडिया नाही शाश्वत फक्त दिखावा. तुलाही ठाऊक मलाही ठाऊक खरे काय अन् खोटे कुठले.

प्रतिक्रिया द्या
16039 वाचन

💬 प्रतिसाद (21)
प
प्रचेतस Sat, 12/14/2019 - 04:29 नवीन
खूप छान.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 12/14/2019 - 04:30 नवीन
वाह, उत्तम.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/22/2019 - 05:40 नवीन
वाह, उत्तम. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 12/14/2019 - 10:38 नवीन
आवडली, छान झाली आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 12/14/2019 - 13:23 नवीन
पुलेशु
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 12/16/2019 - 07:03 नवीन
धन्यवाद सर्वांना!
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Mon, 12/16/2019 - 07:35 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 12/16/2019 - 07:42 नवीन
इंग्रजी व मराठी शब्दांची सरमिसळ छान केली आहे. खूप आवडली.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 12/16/2019 - 07:53 नवीन
मी नाही करणार इथे पुढे गम्मत...... मी नाही करणार इथे पुढे गम्मत...... आता नाही आहे , माझ्यात तेव्हढी हिम्मत ... सर्वच्या सर्व आवडले आठवले म्हणून पाठवले मला माहित है , तुम्ही नाराज नै हलकेच घ्याल असे वाटले म्हणून हेपण लगेच आठवले ==)))) ==)))) ==))))
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 12/16/2019 - 08:26 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 12/16/2019 - 11:20 नवीन
हा एक उत्तम सिनेमा, आंतरजालीय संभाषणावर आधारित आहे. जमल्यास जरूर बघा.
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 12/16/2019 - 13:58 नवीन
खूप आवडीचा चित्रपट आहे. आठवण करून दिल्याबद्दल आभार. खूप दिवसांत बघितलेला नाही. आता परत बघणे आले. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Mon, 12/16/2019 - 18:16 नवीन
आणि मेग रायनने देखील तोडीस तोड अभिनय केला आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
र
राघव Tue, 12/17/2019 - 08:39 नवीन
येस्स..! आणि त्यांचाच त्या आधीचा.. Sleepless in Seattle.. तोही चांगलाय. पण You Have Got Mail जास्त चांगला जमलाय! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ज
जॉनविक्क गुरुवार, 12/19/2019 - 14:04 नवीन
तवा सर्फ तुम बगून समादान पावलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
प
प्राची अश्विनी Tue, 12/17/2019 - 04:11 नवीन
पाहिलाय. आवडलेला अर्थातच. रेडिफ मेल वर खातं होतं त्या काळात माझं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 12/17/2019 - 14:48 नवीन
तोच सिनेमा आठवत होता. ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
ग
गणेशा गुरुवार, 12/19/2019 - 14:02 नवीन
साधी सरळ आणि मस्त कविता..
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 12/21/2019 - 20:10 नवीन
कवितेला एक कडक स्माईल करणारी स्मायली! :) सं - दी - प
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 12/22/2019 - 07:01 नवीन
मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shaitan Ka Saala... :- Housefull 4
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 12/23/2019 - 10:43 नवीन
मस्तंच.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा