Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वृक्षतोड...

ग — गणेशा, Fri, 12/27/2019 - 08:35
दिसतील ती झाडे, कापीत चाललो मी होऊन मेघ काळा, शापित चाललो मी श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष पानगळीत श्वास गुंतलेला शोधीत चाललो मी झाले उन्हाळे अनेक, ओसाड उदास राने ओले अधीर अश्रू, कुरवाळीत चाललो मी पसरला गहिरा अंधार, झाकोळला आसमंत दिशाहीन प्रवासात, ऐटीत चाललो मी डागाळला चंद्र उरी, नभास का खंत आहे आपुलेच खोटे नाणे, घाशीत चाललो मी -------- शब्दमेघ (Edited)

प्रतिक्रिया द्या
5946 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 12/27/2019 - 09:16 नवीन
दूर्दैवाने ही सत्य परीस्थिती आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 12/27/2019 - 10:57 नवीन
उत्तम कविता रे गणेशा
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 12/27/2019 - 11:27 नवीन
बोलले ते शोल्लीड राम का बाण ... ================================ आजकाल चंद्र खूप खूप मोठा दिसतो सूर्य तर अगदी जवळ आल्यासारखा वाटतो डोगर दर्या खोर्यात हे सर्व दूर दूर भासायचे आता कुणीच वाली नाही गड्या,, सर्व गेले उडून हळूहळू आपणपण उडायचे
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 12/28/2019 - 12:49 नवीन
दिवसेंदिवस तुम्ही सामाजिक काव्य लेखन करत आहात. छान आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 12/28/2019 - 15:26 नवीन
उत्तम कविता
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 12/28/2019 - 22:46 नवीन
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 12/28/2019 - 22:46 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा