Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हतबल

श
शब्दसखी यांनी
Tue, 01/07/2020 - 18:23  ·  लेख
लेख
खरं तर टक्क जागा आहे मी. घरच्यांना वाटतंय की झोपलोय मी अजून, पण जागा आहे मी. डोक्यावरचा पंखा मंद फिरतोय. तोही सहन नाही होत आहे मला. पण उठून बंद नाही करू शकत मी. हतबल आहे मी. खिडकीचा पडदा जरासा उघडा राहिलाय आणि सकाळच्या उन्हाची कोवळी तिरीप नेमकी डोळ्यावर पडतेय. तो बंद करता आला असता उठून तर किती बरं झालं असतं.... पण नाही जमत आहे मला. हतबल आहे मी. लाव जोर आणि उठ, कर पुन्हा एकदा प्रयत्न, जमेल तुला.... असा माझ्या स्वतःच्या मनातून आवाज येतोय.. पण नाहीच जमत आहे. खरंच हतबल झालोय मी. बघा ना... इतका हतबल झालोय मी ह्या थंडीसमोर.... तुम्हीच सांगा, कसा जाऊ जिमला??

प्रतिक्रिया द्या
2319 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

म
मुक्त विहारि Wed, 01/08/2020 - 02:22 नवीन
थंडी बाधत नाही आणि व्यायाम पण होईल. (बायको काही ना काही काम सांगत असतेच. त्या कामाच्या निमित्ताने व्यायाम होतो.)
  • Log in or register to post comments
म
मनस्विता Fri, 01/10/2020 - 16:12 नवीन
मजा आली.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Fri, 01/10/2020 - 16:42 नवीन
शेवटची ओळ एकदम सिक्सर.
  • Log in or register to post comments
श
शब्दसखी Wed, 01/22/2020 - 14:04 नवीन
मुवि, एवढा हतबल गडी विवाहित असण्याचीच शक्यता जास्त आहे... ;-) मनस्विता आणि गोंधळी : प्रतिसादाबद्दल आभार!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा