Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फेंगशुई,कासव आणि चिरंजीव

C
Cuty यांनी
गुरुवार, 01/16/2020 - 11:56  ·  लेख
लेख
D mart मध्ये खरेदी करत असताना चिरंजीवांची भुणभुण सुरू होती. त्याला एक काचेचे पारदर्शक रंगाचे कासव आवडले होते. ते त्याला खेळायला हवे होते. मी पाहिले, त्या ठिकाणी फेंगशुईच्या अनेक वस्तू ठेवल्या होत्या. त्यातच ते कासवपण होते. मी नाक मुरडूनच तिथून पुढे निघून गेले. माझा अश्या गोष्टींवर विश्वास नाही मात्र नवरोबांचा आहे. घरी आल्यावर सामान भरून ठेवताना पाहते तो काय! चक्क ते कासव सामानाच्या पिशवीत दिसले. मग लक्षात आले,हा उद्योग चिरंजीव आणि त्याच्या पप्पांचा आहे. दोघांनी मला नकळत खरेदी करून ते घरी आणले होते. मग दोन दिवस ते कासव कुठे ठेवायचे यावर बापलेकांत वाद सुरू होता. लेकाला ते सर्वांना दिसेल अश्या जागी ठेवून मित्रांना दाखवायचे होते, तर त्याच्या पप्पांना ते फेंगशुईनुसार 'योग्य' जागी, 'योग्य' दिशेला ठेवायचे होते. मात्र 'योग्य' जागा कोणती हे पप्पालाही ठाऊक नव्हते. मग नंतर सांगतो, विचारून सांगतो असे करतकरत अजून दोन दिवस गेले. अजून दोनएक दिवसांनी मी सकाळी बाथरूममध्ये पाण्याची भांडी साफ करत होते. अचानक एका पांढरया रंगाच्या ड्रममध्ये काहितरी जोरात खाडखाड वाजले. दिसत मात्र काहिच नव्हते. मग पूर्ण ड्रम खाली केला, तर चक्क पाण्याच्या रंगात बेमालूमपणे मिसळून गेलेले ते कासव दिसले. लख्खकन डोक्यात बल्ब पेटला ! अन मी एकटीच खोःखोः हसू लागले. 'योग्य' जागेची वाट पाहून कंटाळून चिरंजीवांनी त्या कासवाला पोहण्यासाठी 'योग्य' जागा शोधली होती. आता मी रोज तो ड्रम साफ करून, परत ये कासव हळूच पोहायला सोडते. रोज चिरंजीव शाळेतून आल्यावर, ते कासव 'योग्य' जागी पोहतेय ना, ते चेक करतात आणि त्याचे पप्पा कासवाला कधीच विसरलेत !!

प्रतिक्रिया द्या
7387 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

प
परिंदा Fri, 01/17/2020 - 08:22 नवीन
मस्त किस्सा!
  • Log in or register to post comments
C
Cuty Fri, 01/17/2020 - 10:14 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा
ट
ट्रम्प Fri, 01/17/2020 - 10:59 नवीन
:):):):):):)
  • Log in or register to post comments
C
Cuty Sat, 01/18/2020 - 11:42 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
त
तुषार काळभोर Sat, 01/18/2020 - 11:54 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 01/19/2020 - 02:56 नवीन
एकेका वस्तूत काय मजा लपलेली असते ते मोठ्यांना काही कळत नाही. --- दुसरे एक कासव(डिजिटल घड्याळ) आणि पिल्लू(रिमोट) मिळतात. पिल्लाची पाठ चेपली की मोठ्या कासवाचा ओडिओ चालू होतो आणि वेळ सांगते. नंतर ते बंद पडले तरी ती जोडी होती आकर्षक.
  • Log in or register to post comments
C
Cuty Sun, 01/19/2020 - 03:46 नवीन
बरोबर आहे. आपण मोठे होतो अन लहानपणीच्या गमतीजमती विसरून जातो. मात्र आपल्या मुलांमुळे कधीकधी हे बालपण पुन्हा अनुभवायला मिळते.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sun, 01/19/2020 - 05:31 नवीन
आमच आणून फोडून सुद्धा झालं :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/19/2020 - 05:37 नवीन
फ़्यांगशुई, ताडे-तोडे, लिंबू, गंडेदोरे स्वयंपाकाच्या जागा, पाण्याच्या जागा, वगैरे बदलून पाहणे, करुन पाहणे अशा गोष्टींचा माणसांना मोह होतो. बदलांनी काही फ़रक पडतो का म्हणून अशा विविध गोष्टी करायला माणूस नावाच्या चंचल प्रवृत्तीला आवडते. अर्थात होत काही नसतं. मनाचं समाधान फ़क्त. आपण कासवाला योग्य जागी ठेवलं. :) लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
C
Cuty Sun, 01/19/2020 - 05:48 नवीन
धन्यवाद , कंजूस, शा वि कू, डाॅ. बिरूटे !
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 01/19/2020 - 06:46 नवीन
फेंगशुईला जलसमाधि देणाऱ्या बबड्याचं कौतुक करण्यत येत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Mon, 01/20/2020 - 08:00 नवीन
:-) :-) :-)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 01/20/2020 - 17:16 नवीन
लिहीत रहा याच शुभेच्छा
  • Log in or register to post comments
C
Cuty गुरुवार, 01/23/2020 - 11:38 नवीन
धन्यवाद, गड्डाझब्बू, कपिलमुनी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा