Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"शर"

प — परशु, Fri, 01/24/2020 - 13:18
माझ्या वडिलांची ५० वर्षांपूर्वीची कवितांची डायरी सांभाळून ठेवली आहे. वडील पत्रकार, कवी, संपादक होते. तरुण असतानाच गेले. त्या डायरीतील कविता खाली टंकत आहे. कवितेतला मला फारसा गंध नाही. मिपाकरांकडून जर काही रसग्रहण झाले वा प्रकाश पडला तर बरे ह्या उद्देशाने मिपावर टाकत आहे. "शर" माझ्या संज्ञेचा पारा.... पडलाय तुटून कुठंतरी रडतय इथे मानवाचे चिरदुःख हतभागी गुडघ्यात दुर्दैवी मान खुपसून शतकानुशतके ...! पहातय न्याहाळून आयुष्याच्या तडा गेलेल्या आरशात स्वतःचे मनहूस प्रतिबिंब! कवटाळू दे मला ते आभासी दुःख हुंदक्यांच्या धुमाऱ्यात फुललेले.... कुरवाळू दे मला प्रकाशाची कुस एकदा तरी ! घालू दे मला एक हळुवार फुंकर निखारे दडपणाऱ्या राखेवर! पण __ पण माझ्या संवेदनेचा शरच कुठंतरी हरवलाय रे! अशोक चिन्धा आहेर - दिनांक १२/३/७१ देवळा

प्रतिक्रिया द्या
1886 वाचन

💬 प्रतिसाद (1)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/27/2020 - 12:33 नवीन
पाहु काय काय अर्थ लावता येतो तो ते. किंचित व्यस्त आहे. बाकी, जाणकार बोलतीलच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा