Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'इमॅजिन' (कल्पना कर...)

क — कुमार जावडेकर, Sat, 02/01/2020 - 13:44
(जॉन लेनन यांच्या 'इमॅजिन' या गीताचा स्वैर अनुवाद) सहज कल्पना कर, स्वर्गच नसेल तर.. नरकही नसेल अन् होईल आकाश घर! (कल्पना कर, जगेल जग आजचा प्रहर) न देश, न देशभक्ती मारण्या-मरण्यासाठी न धर्मही जीवनी या भरण्यासाठी जहर (कल्पना कर, शांतता पसरेल दूरवर) भासेल एकले स्वप्न, येतील ज्यात सकल... अन् भिंतींविना दिसेल जग नितांत सुंदर! (कल्पना कर, दृष्टीत येईल उंच शिखर) लोभ, मोह ना अपेक्षा, उपेक्षाही ना कुणाची निनादेल दाही दिशा विश्वबंधुत्वाचा स्वर! (कल्पना कर, होईल हे विश्व बलसागर) भासेल स्वप्न हे माझे, येतील ज्यात इतर... अन् भिंतींविना दिसेल जग नितांत सुंदर! (कल्पना कर, दृष्टीत येईल उंच शिखर) - कुमार जावडेकर

प्रतिक्रिया द्या
2319 वाचन

💬 प्रतिसाद (2)
R
Rohini Mansukh Sat, 02/01/2020 - 15:43 नवीन
अनुवाद वाटत नाही ... Original वाटते Original internet वर मिळेल का?
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 02/04/2020 - 20:13 नवीन
वाह! 'इमॅजिन' कानात रुंजी घालू लागलं अनुवाद वाचताना. फार फार छान! बादवे, जॉन लेनन चं स्वप्न खरंच सत्यात आलं तर! निदान जगातील एकूणच तिरस्कार कमी झाला तरी पुष्कळ झालं म्हणायचं. असो.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा