Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डबा

R — Rohini Mansukh, Wed, 02/05/2020 - 04:53
आज पहाटे लवकर उठले डब्यासाठी खास जिन्नस ठरवले साजुक तुपात रव्यास भाजले शिऱ्यात काजू बेदाणे घातले मऊसूत पराठे भाजले चमचमीत भरले वांगे केले आमटी आणि भातही भरले चवीला चटणी, कोशिंबीर दिले आणि मनोमन स्वप्न रचले वाटे आज तरी त्याने म्हणावे "वा काय बेत होता, आजचा डबा छानच होता." ही झाली तिची बाजू आता जरा त्याच्याकडे पाहू त्याच्या खास मित्राने बढती मिळाल्याचे सांगितले बास ते एक कारणच झाले त्याच्याकडून पार्टी मागायचे दुपारचे जेवण बाहेर घ्यावे मस्तपैकी चिकन हाणावे पण या डब्याचे काय करावे? हां! तो एका मित्राला देऊन जावे संध्याकाळी नवरोबा घरी आले तिने हसून स्वागत केले आडून आडून विचारून पाहिले पण डब्याबद्दल काहीच नाही कळले बरे आता थांबून रहावे रात्रीच काय ते बोलून घ्यावे रात्री गादीवर पडताना तिने प्रश्न विचारला "आज डबा कसा होता? मेनू तुझ्या आवडीचा होता." त्याचे मन गोंधळले पण लगेच स्वतःस सावरले "वा काय डबा होता, बेसन लाडू तर झकास होता." आणि विषय बदलायला तिच्या गळ्याभोवती हात घातला ती समजून गेली सारा मामला निमूट चेहरा त्याच्या कुशीत लपवला - सौ. रोहिणी विक्रम मनसुख

प्रतिक्रिया द्या
6963 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/05/2020 - 08:13 नवीन
कभी कभी ऐसा भी होता है. चालायचंच. पण समस्त पुरुषांनी डबा कसा होता याची प्रतिक्रिया अवश्य दिली पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 02/05/2020 - 13:29 नवीन
छान ! रोमॅण्टिक ! बायका सारं जाणून असतात हेच खरं !
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 02/05/2020 - 15:36 नवीन
जातानाच डबा स्पेशल असल्याचे सांगून किंवा इतर मार्गाने निरोप पाठवून कळवायचे होते. शिवाय डबा संपून आला नाही तर उद्या डबा मिळणार नाही अशी तंबी द्यायला हवी होती. काय बिशाद होती मग अशी थाप मारायची? ;) आमच्या ऑफीसमधले एक सर अशी काही अचानक पार्टी झाली की त्यांचा डबा आम्हा तरुण पोरांच्या गळ्यात अगदी अजीजी करुन मारायचे. एवढे घाबरता का बायकोला असे विचारले तर ते म्हणाले माझी बायको प्रेमाने सकाळी उठून केवळ माझ्या एकट्या साठी डबा बनवते. यात गेली 20 वर्षे कधी खंड पडला नाही अन्नापेक्षा तिच्या प्रेमाचा व मेहनतीचा अपमान करवत नाही. खूप छान वाटलं होतं ते उत्तर ऐकून
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 02/05/2020 - 15:38 नवीन
तसे असते तर हे काव्य वाचायला मिळाले असते का!!! झकास झाले आहे काव्य. मजा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
च
चांदणे संदीप Sun, 02/09/2020 - 18:15 नवीन
खरंच छान झालाय! सं - दी - प
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 02/11/2020 - 03:25 नवीन
सुंदर लिहीलीय कविता
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Tue, 02/11/2020 - 10:29 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा