Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एकदाच ओलांडून अंतर...

प — प्राची अश्विनी, Wed, 02/12/2020 - 04:37
एकदाच ओलांडून अंतर पोहोचले मी तव हृदयाशी, आठवते का तुला अजुनी घडले जे जे काही नंतर? उभी राहुनी टाचांवरती, ओठ भिडवले धिटपणाने. दात पकडती अलगद हल्लक ओठांमधली मधाळ साखर.. वितळून गेले सभोवतालच, विसरून गेले काळवेळ मी. हात शोधती अधीर काही स्पर्शही झाला हळवा कातर... नको घडाया भलते काही मनावरी ठेवलास पत्थर पण... मिठी अशी ती कातील होती अजून होते तनात थरथर...

प्रतिक्रिया द्या
8768 वाचन

💬 प्रतिसाद (15)
प
प्रचेतस Wed, 02/12/2020 - 04:40 नवीन
क्या बात है...! एकदम रोम्यान्टिक.
  • Log in or register to post comments
R
Rohini Mansukh Wed, 02/12/2020 - 06:41 नवीन
उत्कट भावना अलगदपणे टिपणारे हळुवार आणि नाजूक काव्य!!!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 02/12/2020 - 09:30 नवीन
मानलं तुम्हाला! खूप आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 02/13/2020 - 02:46 नवीन
:).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
च
चौथा कोनाडा Wed, 02/12/2020 - 12:53 नवीन
सुंदर, तरल, अप्रतिम ! नको घडाया भलते काही मनावरी ठेवलास पत्थर पण... मिठी अशी ती कातील होती अजून होते तनात थरथर... हे तर खासच !
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Wed, 02/12/2020 - 13:16 नवीन
शृंगारिक कविता फार नाही वाचल्या, त्यामुळे फार आवडली.
मनात जे जे दडून होते नकळत आकळते कसे दुज्याच्या स्पर्शाने 'मीपण' झगमगते ही जाणीव अवघी जरतारी . . . हर श्वासातुन परिमळणारी . . . हर गात्रातुन तगमगणारी . . .
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 02/13/2020 - 02:46 नवीन
धन्यवाद सर्वांनाच.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 02/13/2020 - 07:15 नवीन
लै म्हणजे लैच आवडली, नको घडाया भलते काही मनावरी ठेवलास पत्थर हे भलते अवघड असते पण जमवावेच लागते नाहीतर मग वाट लागते..... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 02/19/2020 - 05:20 नवीन
विडंबन नाही आलं अजून???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/13/2020 - 08:21 नवीन
आवडली. धीट कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sat, 02/15/2020 - 18:11 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 02/19/2020 - 05:19 नवीन
धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ म्हादया...... Fri, 04/10/2020 - 19:39 नवीन
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Mon, 04/13/2020 - 04:45 नवीन
एकदा धीर करून अंतर ओलांडले की काहीच 'भलते' रहात नसते. कविता छानच.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/14/2020 - 13:19 नवीन
उभी राहुनी टाचांवरती, ओठ भिडवले धिटपणाने. दात पकडती अलगद हल्लक ओठांमधली मधाळ साखर.. आहाहा...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Badshah - Genda Phool | JacquelineFernandez | Payal Dev
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा