Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोण कुठली रोहिणी

R — Rohini Mansukh, Wed, 02/12/2020 - 05:35
अगणित आकाशगंगा अगणित सूर्य गगनी अगणित असती धरणी त्यातून कोण कुठली रोहिणी? काय तिचे सुख नि काय तिचे दुःख विश्वाच्या उलाढालीपुढे आहे ते नगण्य काय तिचे हेवे नि काय तिचे दावे एवढ्या भव्य संसारापुढे क्षुद्र ते ठरावे काय तिचे ज्ञान काय तिचे विज्ञान चराचराच्या गूढापुढे नाही त्याला स्थान म्हणूनच नम्र रहावे तिने गर्व नको तिच्या मनी अगणित मानवांमधून एक आहे कोण कुठली रोहिणी - सौ. रोहिणी विक्रम मनसुख

प्रतिक्रिया द्या
2844 वाचन

💬 प्रतिसाद (4)
श
शा वि कु Wed, 02/12/2020 - 13:12 नवीन
सगळ्यांची सुखदुःख तितकीच लहान असल्यामुळे, तुलनात्मकरित्या ती आजिबात लहान नाहीत, त्यामुळे रोहिणीने स्वतःला अगदी महत्वाचे समजावे :p
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/13/2020 - 09:05 नवीन
रोहिणीचं महत्व आम्ही काय सांगायचं. पुराणात म्हटलंय की चंद्राच्या सत्तावीस पत्नीपैकी एक सर्वात सुंदर म्हणजे रोहिणी. तेजस्वी, सुंदर, स्वच्छ वस्त्र परिधान करणारी. जसं जसा चंद्र रोहिणीजवळ जातो तसं तसा चंद्र खुलायला लागतो. रोहिणीचे देवता ब्रह्म. रोहिणी मुळात सुंदर, पतीवर प्रेम करणारी, आणि सुखात रमणारी असते, असे म्हणतात. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
R
Rohini Mansukh गुरुवार, 02/13/2020 - 13:21 नवीन
रोहिणीचे (ह्या नावाचे) महत्व सांगणारी कविताही रचली आहे. नंतर कधीतरी पोस्ट करेन.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 02/14/2020 - 05:53 नवीन
येऊ द्या मिपावर. छान लिहिताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rohini Mansukh

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा