Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिलिंदमिलन

म — मायमराठी, Sun, 02/16/2020 - 07:40
नशिबात पापण्यांच्या मिटणे अजून नाही धुरळाही द्वारकेचा का दारात येत नाही ग्रीष्मात वाहते यमुना भिजे विरहात ओली नयनांत राधिकेच्या अश्रू दिसणार नाही "क्षण एक आसवांचा झेलू अशी कशी मी अवचित येई स्वारी पाहू त्याला कशी मी? हृदयातल्या रणाला थांबवू आता कशी मी झाकूनही दिसावी त्या मूर्तीस लपवू कशी मी?" मग कृष्णही महाली तुळशीस काही सांगे अंगणात राधिकेच्या रुजले नवीन धागे देहात पाकळ्यांच्या सजली अशी कळी ती गोकुळीचे सुगंधी श्वास द्वारकेस जाती माया त्याची स्वयंभू भ्रमरात कृष्ण होई गुंजारवे अलिच्या बासरीच ऐकू जाई गात्रीं येता गहिवर हृदयाची होई घाई किरणे टाकीत मागे हरी वृंदावनी येई येता मिलिंदमाधव कळी आसवांत न्हाली थबके काळही थोडा युगं क्षणांची लोटली गळल्या पाकळ्या साऱ्या राधाही न उरली 'मी'पणास त्यागुनी ती श्रीहरीमनीं मुरली - अभिजीत

प्रतिक्रिया द्या
6001 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/16/2020 - 08:24 नवीन
सुंदर रचना. आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 02/16/2020 - 11:49 नवीन
नशिबात पापण्यांच्या मिटणे अजून नाही धुरळाही द्वारकेचा का दारात येत नाही
...
देहात पाकळ्यांच्या सजली अशी कळी ती गोकुळीचे सुगंधी श्वास द्वारकेस जाती
...
गळल्या पाकळ्या साऱ्या राधाही न उरली 'मी'पणास त्यागुनी ती श्रीहरीमनीं मुरली
लईचं भारी
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 02/19/2020 - 13:09 नवीन
खूप सुंदर कल्पना आहेत..! थोडा बदल करून मांडण्याचा प्रयत्न केलाय. आगाऊपणाबद्दल क्षमस्व. === नशिबात पापण्यांच्या मिटणे अजून नाही धुरळाही द्वारकेचा [का?] दारात येत नाही..! भिजुनी विरहात ओल्या.. ग्रीष्मात यमुना वाही.. नेत्रांत आर्जवाचे अश्रू उभे.. प्रवाही.. "अश्रूंस बांध नाही.. अडवू तयां कशी मी? अवचित श्रीहरी येता, पाहू तया कशी मी? हृदयातल्या दुहीचे रण थांबवू कशी मी? अद्वैत मूर्त जेथे.. लपवू तया कशी मी?" तुळशीस कृष्ण सांगे हलकेच गूज काही.. मनांत राधिकेच्या फुलती गुलाब-जाई.. देहात पाकळ्यांच्या सजली जशी कळी ती.. ते गंध गोकुळीचे द्वारावतीस जाती.. भ्रमररुपाने श्याम, मायेस लेवूनी येई वेणूशिवाय काही.. गूंजारवात नाही.. गात्रांतुनी गहिवर येता, हृदयाची होते घाई.. ती शुद्ध हाक हृदयातील, कृष्णास खेचुनी नेई.. येता मिलिंदमाधव, कळी आसवांत न्हाली काळाचा वेग थबकला, क्षणात युगे उलटली.. अस्तित्वबोध न उरला.. राधेतील राधा विरली.. प्रेमस्वरूप श्यामल कृष्णात राधिका "मुरली"..
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 02/20/2020 - 03:57 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
म
मायमराठी Mon, 02/24/2020 - 16:38 नवीन
हा आगाऊपणा नव्हे ह्याला मी आपलेपणा मानतो. शब्दांवर प्रेम करणाऱ्या रसिकांना हा हक्क असायला हवाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
प
प्राची अश्विनी गुरुवार, 02/20/2020 - 03:58 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
म
मायमराठी Mon, 02/24/2020 - 16:39 नवीन
सर्व प्रतिसादांबद्दल मनापासून आभार
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 02/26/2020 - 14:48 नवीन
सुरेख...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सावरकर सावरकर सावरकर
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा