Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गणित..

प — प्राची अश्विनी, Wed, 02/19/2020 - 05:25
चाळीशी ओलांडली की जगण्याचं गणित थोडं सोपं होतं. करिअरचा दुभाजक पार केलेला असतो. बायकोमुळे अपूर्णांकाचा पूर्णांक झालेला असतो. घरातले लसावि, मसावि होत असतात. नाकावर चाळिशी आणि नाकासमोर सरssळ रस्ता असं एकरेषीय समीकरण असताना अचानक .. प्रमेय बनून ती येते. सुरवातीचं अवघडलेलं अनोळखीपण गेलं की जाणवतं ते "मी"पणा दशांशानेही नसलेलं तिचं निर्मळपण. खाचाखोचा नसलेलं निरागस, प्रसन्न हास्य.. वाहता दहाचा पाढा जणू! रुढार्थाने ती सुंदर असेलच असं नाही; पण तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण अमर्याद सुंदर ... प्रतलच.. तशीही कुठल्या रूढ चोकटीत ती मावतच नाही...मूळसंख्येसारखी.. मैत्रिणीच्या पलिकडली प्रेयसीच्या अलिकडली. चूक बरोबरच्या व्याख्येत न बसणारी.. तिच्यात "डावी-उजवी बाजू" ठरवताच येत नाही. तिच्या''सम" तीच! खरं तर रोज भेटते असंही नाही. पण तिचा एखादा संदेश, फोन, हसू दिवस उजळून जातो. "हातचा" जणू रोजच्या रुक्ष जगण्यातला. तिचा सुगंध सतत भवताली दरवळतो..अनंत काळ.. या नात्याचं वर्गमुळ घनमूळ शोधू नये.. बस् जीवापाड जपावं तिला.. ......... भले गणित सुटो वा न सुटो..

प्रतिक्रिया द्या
16670 वाचन

💬 प्रतिसाद (21)
म
माहितगार Wed, 02/19/2020 - 09:39 नवीन
प्राची - अश्विनींच्या कविता म्हणजे प्लॅटॉनिक उत्कट, प्रणयाच्या जवळ पण कामभावनेपासून दूर, नात्यानात्यातील निर्मळ भावनांनी, भारतीय संस्कृतीतील सकारात्मकतेवरील विश्वासाने ओतप्रोत, नेटक आणि सुंदर काव्य निर्मितीचा आनंद घेत कवियत्री आपल्या कवितांचा पुनःश्च आनंददायी प्रत्यय या नव्या मुक्तकातूनही वाचकांना येतो म्हणजे मला आला इतर वाचकांनाही मिळेल असा विश्वास आणि शुभेच्च्छा आहेच.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/19/2020 - 09:42 नवीन
कविता आपल्याला आपल्याच अनुभवाच्या जवळ, वगैरे वाटतात. लिहितं राहावे. पुलेशु -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
प्राची अश्विनी गुरुवार, 02/20/2020 - 03:42 नवीन
:). धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 02/19/2020 - 10:03 नवीन
आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 02/19/2020 - 12:04 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 02/19/2020 - 12:26 नवीन
कितीही गुणिले किंवा भागिले या पूर्णांकास ( म्हणजे मला ) मूळसंख्येने तरी बाकी शून्यच राहणार मी ते विष आहे , जे हवंहवंसं वाटतं पण प्राशनांती , वाढू लागते तळमळ आताही वाईट , आणि दूरही वाईट कारण , आपले आधीच अप्रूव्ह केलेले प्रोटोकॉलच असतात टाईट...
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 02/20/2020 - 03:44 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!_/\_
  • Log in or register to post comments
म
मायमराठी Mon, 02/24/2020 - 16:43 नवीन
न सुटणारी तरीही आनंद देणारी अशीकाही प्रमेय असतात सिद्ध काहीच करायचं नसतं तरीही 'रचना'करून बघाव्या लागतात. काव्यातलं गणित आणि गणितातील काव्य खूप भावलं.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 03/02/2020 - 04:19 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मायमराठी
श
श्वेता२४ Tue, 02/25/2020 - 06:21 नवीन
आपलं नाव पाहून लगेचच वाचायला घेतलं आणि दिवसाची सुरुवात मस्त झाली. मी तुमची जबरदस्त पंखा झालेय.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 03/02/2020 - 04:14 नवीन
:) खूप खूप छान वाटलं वाचून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
म
मदनबाण Wed, 02/26/2020 - 14:54 नवीन
मस्त.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सावरकर सावरकर सावरकर
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 03/02/2020 - 04:19 नवीन
मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मानसी१ गुरुवार, 02/27/2020 - 10:34 नवीन
बायको ने पण असे नाते शोधले तर चालेल का?
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 03/02/2020 - 04:13 नवीन
ती सुद्धा कुणाची तरी बायको असेलच. आणि काही गैर नाही वाटत यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानसी१
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 02/27/2020 - 16:58 नवीन
Binomial integral च्या वाटेनं चाललंय का? :)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 03/02/2020 - 04:12 नवीन
:) हा विषय डोक्यात कधीच नाही शिरला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
प
प्रसाद साळवी Mon, 05/25/2020 - 11:39 नवीन
आशयावर वैयक्तिक प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे, विषय वैयक्तिक आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 05/25/2020 - 12:59 नवीन
तिचा सुगंध सतत भवताली दरवळतो..अनंत काळ.. या नात्याचं वर्गमुळ घनमूळ शोधू नये.. बस् जीवापाड जपावं तिला.. अत्यंत खरे लिहिले आहे तुम्ही.. मनापासून आवडले..
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 06/13/2020 - 06:01 नवीन
धन्यवाद!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
र
रातराणी Sat, 06/13/2020 - 07:59 नवीन
आवडलं गणित :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा