Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ग चांदण्यांनो

च — चांदणे संदीप, Mon, 02/24/2020 - 06:57
नका ग चांदण्यांनो नका येऊ खिडकीत तिच्या मनाचा ठाव सांगा येऊन पडवीत सांगा तिच्या गाण्यात का, आहे नाव माझे? माझ्याविन विरहाचे का, सोसते ती ओझे? ठावे तिलाही आहे का, रात्री कवितांचे येती जथ्थे, जाती स्वप्न गाऊन उद्याचे? आतूर प्रीत आत रोज झुरते उरात सांगा तिला हे सारे चमचमत्या सुरात तिचे चालणे बोलणे भास होऊन छळते लय श्वासांची तेव्हा आठवांशी अडखळते सारे आठव आठव युगांच्या जणू फेऱ्या रेखू पाहती नशीबाला तळहातावर कोऱ्या पसा पसा सुखाचा तिला देईन मोजून बघा चांदणझुल्याचे झोके रितेच अजून जा, जा ग चांदण्यांनो जा करा काम थोडे माझ्या साऱ्या कवितांचे पाडा तिच्यापाशी सडे - संदीप चांदणे (२४/०२/२०१९)

प्रतिक्रिया द्या
3650 वाचन

💬 प्रतिसाद (6)
आ
आंबट गोड Mon, 02/24/2020 - 07:33 नवीन
किती सुरेख भावना!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 02/24/2020 - 07:50 नवीन
जा, जा ग चांदण्यांनो जा करा काम थोडे माझ्या साऱ्या कवितांचे पाडा तिच्यापाशी सडे अप्रतिम शेवट.....
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 02/24/2020 - 07:50 नवीन
क्या बात...! अतिशय सुंदर
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 02/24/2020 - 10:38 नवीन
जिओ फारच मस्त लिहिली आहे फकस्त एकच तक्रार आहे... लैच दिवसांनी लिहिलेस. बघ जरा... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 02/24/2020 - 10:41 नवीन
पैंबू काकांना पूर्ण अनुमोदन .. सँडी भौ पुष्कळ दिवसांनी उगवलेले हैत .......
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज गुरुवार, 02/27/2020 - 17:01 नवीन
जाम आवडली!! कडक!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा