Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेतकी कॉलेजचे दिवस

ब — बबु, Tue, 02/25/2020 - 07:41
मित्रा, आपण भेटलो परत पन्नास वर्षांनी या स्नेहमेळाव्यात… आणि आठवणींच्या चित्रांचे रंग परत एकदा ओले झाले... आठवला भाजी-भाकरीचा डबा, आईनं पहाटेच उठून तयार केलेला अन्नपूर्णेच्या मायेनं एसटीने आपल्यापर्यंत पोहोचवलेला ... आठवला बिनाका गीतमालाच्या सरताज गीतांचा कल्ला .. कित्येक बुडवून लेक्चर्स , गेलो मॅटिनी शो पाहायला .. आपण सर्वच कुणबीकीचा वसा आठवत लढत होतो ... अडचणींचा गोवर्धन जिद्दीच्या काठ्यांनी तोलत होतो ... आयुष्याच्या संध्याकाळी कृतार्थतेच्या सात्विक भावांनी उजळलेला तुझा चेहरा पाहताना मलाही त्या कृतार्थतेची अनुभूती येत आहे... संकल्प मनोमनी परतभेटीचा करूया... माऊलींचे पसायदान मनोमनी आळवूया...

प्रतिक्रिया द्या
2417 वाचन

💬 प्रतिसाद (4)
च
चौथा कोनाडा Tue, 02/25/2020 - 17:39 नवीन
छान कविता, माझ्या वर्गातील शेतकरी कुटुंबातील एम्टीपाटिल आठवला. एसटीतुन येणारा डबा उशीरा आला किंवा आला नाही की त्याची होणारी कुचंबण आठवली. आमच्या घरी ये जेवायला म्हटलं कि खुप संकोचुन जायचा. काही वेळा रात्री उपाशीच झोपायचा असं त्याचा रूम पार्टनर सांगायचा मला.
कित्येक बुडवून लेक्चर्स , गेलो मॅटिनी शो पाहायला ..
या पायी आम्ही देखील गुरुजनांच्या शिव्या खाल्लेल्या.
  • Log in or register to post comments
अ
असंका गुरुवार, 02/27/2020 - 09:00 नवीन
फारच सुरेख... कुणबीकीचा वसा...म्हणजे शेतीचा वसा असं आहे का? की दुसरा काही अर्थ आहे? धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 05/11/2020 - 09:32 नवीन
अनेक आठवणींची चित्रे उभी राहिली या कवितेमुळे हॉस्टेल ला रूम वर असे एकूण 14-15 वर्षे मी बाहेर होतो घरच्या.. त्यामुळे असे असंख्य मित्र.. असंख्य घटना डोळ्यापुढे आल्या
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 05/11/2020 - 11:18 नवीन
.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा