Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भादरायला हवे वाढलेले, भादरायला गेलो

ख — खिलजि, गुरुवार, 02/27/2020 - 10:33
भादरायला हवे वाढलेले, भादरायला गेलो न्हावी होता बिझी म्हणून पेपर वाचू लागलो पेपर वाचता वाचता एक जाहिरात बघितली होती तशी छोटी पण लक्षात बाकी राहिली नंबर आला जवळ म्हणून पेपर घेतला छाटून न्हावी होता मग्न कामात , दिला खिशात ढकलून भादरवुन थेट घरी मी अंघोळीला गेलो जाहिरात तशीच खिशात पडून , विजार मागे सोडून आलो दुसर्या दिवशी आरोळीने जाग मला आली मला वाटलं मनातल्या मनात, आमची हि खपली उभा राहिलो बघण्यासाठी , बघतो तर हे काय जाहिरातीचे पान हाती घेऊन डोके पिटत होती हि बाय सांगून सांगून थकलो तिला हरलो सारे उपाय अक्कल सारी गुडघ्यात यांची , दुसरं करणार तरी काय ? लंपट समजून मला तिने , मुलं वेगळी केली फोन लावूनी सार्यांना, कपाळात आणल्या भाय जाहिरातीचे पान थेट समाजात उभे केले आईबापासंगे सारे सोयरेपण आले मुलगा माझा नाही त्यातला, सांगत होती आई सासूसासरे बोंबलत होते लंपट निघाला ओ जावई सांगून सांगून थकलो तरी ऐकत नव्हते कुणीच हळूहळू आईही माझी समजू लागली मला नीच मोर्चा वळवला सलून मध्ये , जमले तेथे सारे न्हावीही ते कळताक्षणी बोंबाबोंब सूरु करे झक मारली नि भादरावयाला या सलूनमध्ये आलो जाहिरात राहिली बाजूला , पण लंपट मात्र झालो =================================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
7178 वाचन

💬 प्रतिसाद (9)
प
प्रचेतस गुरुवार, 02/27/2020 - 10:36 नवीन
=)) लै भारी
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 02/27/2020 - 10:40 नवीन
मराठी भाषा दिनाच्या आणि माझ्या बोलीभाषेच्या वर्धापनाच्या हार्दिक शुभेच्छा ...
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी गुरुवार, 02/27/2020 - 14:36 नवीन
धन्य ! _/\_ असल्या जाहिराती खिशात ठेऊ नयेत. ;-)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 02/27/2020 - 14:46 नवीन
जाहिरातीसाठी नव्हे तर मागच्या मजकूरासाठी तो कोपरा कापला असे (कोबीसारखे) ठासून सांगायचे ना!
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 02/28/2020 - 07:58 नवीन
पाभे हे कारण बाकी भारी हाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/27/2020 - 16:04 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 02/28/2020 - 07:20 नवीन
बायका अपल्या नवर्‍याची लायकी ओळखून असतात. कायप्पा वर वाचलेला एक विनोद :- मैत्रीण १ - अग ती टवळी बघ किती वेळची तुझ्या नवर्‍या कडे टक लावून बघत बसली आहे मैत्रीण २ - मीच सांगितल आहे तिला तस करायला मैत्रीण १ - का ग? मैत्रीण २ - मला पहायच आहे तो पोट आत ओढून किती वेळ थांबू शकतो ते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 02/28/2020 - 07:56 नवीन
धन्यवाद सर्वाना .. @ पैंबुकाका ,, इनोद लाइकला है धन्य ती आपुली माय मराठी धन्य ते प्रतिसादक तिच्यासाठी धन्य तो महाराष्ट्र आपुला जिथे जागली जोपासली मराठी गुरुदेव हि सर्व तुमची कृपा बरं का ... आपल्या निव्वळ आगमनानेच आमच्या अंतरात्म्याला ताडताड भेगा पडून अशी निर्मिती होत जाते .. आपण यावं आणि एकदा तरी आपला प्रतिसाद द्यावा या पामराला हि नम्र विनंती .. गुरुदेव आज या कल्पनेला एवढे प्रतिसाद आले ते बघून मला कससंच होतंय .. गरुदेव कि जय हो .. अक्कुऊकाकांचा विजय असो ... गुरुदेव हि खालील रचना फागस्त तुमच्यासाठी ........... तुला जेव्हा जेव्हा वाचतो फुटतात धुमारे शब्दांचे तूच रे, तो शिल्पकार माझा तूच बांधिले रस्ते वाक्यांचे हरवली होती वाट माझी त्या दाट विखारी प्रतिसादांत तूच दाखविली दिशा मजला करुनि साऱ्या व्यथांचा अंत विसरणे एव्हढे सोप्पे नसते आत धगधगत असते काहीतरी खंत एक धागा येताक्षणी तुझा पुन्हा प्रज्वलीत साऱ्या भावना ज्वलंत ज्वलंत दिगंत ======================== गरुदेव कि जय हो, अक्कुकाकांचा इजय असो .........
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 02/29/2020 - 13:17 नवीन
ती जाहिरात इथं टाका, साधकबाधक चर्चा करता येईल, मिपाकर पुढच्या वेळचा उपाय नक्की सुचवतील.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा