Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कांताला सुरु झाल्या वांत्या

ख — खिलजि, Fri, 02/28/2020 - 08:08
कांताला सुरु झाल्या वांत्या नाव आलं पुढे लगेच अंत्या अंत्या बोल्ला तो मी नव्हेच असेल तो शेजारचा बंट्या त्यालाच बघितलं व्हतं शेतात गप्पा मारताना परत आलो जाऊन तेव्हा बघीतलं झुडुपात कोणीतरी हलताना धरून आणला बंटी मंग आवळली त्याची खुंटी बंट्या बोलला मी तर बाबा शेतात खपत होतो खिल्लारी जोडी झुडुपामागं त्यांनाच जोडत होतो आईची आन, मी नाही केली घाण शपथेवरती सांगतो पकडा जाऊन राजुला तोच कांतावर झुरतो कांता करतेय वांत्या तिला बघतं नव्हतं कोणी जो तो आपला विचार करतोय कोण असेल हिचा शिरोमणी ? वांत्या करुनि अर्धी झाली तरी तिला कुणीच बघत नव्हते इतक्यात अचानक अवतरले तेथे जे शाळेचे शिक्षक होते बघुनी गर्दी माग काढता समजून आला प्रकार खडसावून सांगू लागले सर्वांसी असेल पोटाचा विकार तुरंत बोलावूनि डॉक्टरला केली तिची समीक्षा डॉक्टरने मग तपासून नीट कळवली पोटाची वाईट दिशा गावकरी सारे ओशाळले कळले शिक्षणाचे मर्म मेंदू तेव्हाच चालतो योग्य जेव्हा शिक्षण होईल धर्म .... ============================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
2248 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
पाषाणभेद Fri, 02/28/2020 - 10:46 नवीन
मंग पकडा त्या मास्तरला. लय चालू बेनं हाय. स्वता करून नामनिराळं र्‍हातयं.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 02/28/2020 - 11:35 नवीन
भारीय पाभे
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा