Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंबानींची फणी

ख — खिलजि, Fri, 02/28/2020 - 11:33
उदघाटनाला आला कोण ? उद्योगपती सम्राट अंबानी स्टेजवर जाताना ठेच लागली त्यांची पडली खाली फणी डोळे चुकवून पटकन उचलली घेऊन गेलो घरी लक्ष्मीपतीची तरी फणी आणेल संपत्ती आपल्या दारी कामधंदे सोडून सारे फणी पुजू लागलो रोज धुपारती शंख वाजवुनी वाहायचो भरपूर फुले येड लागलं बापाला आपल्या हसत होती माझी मुले हसत हसत सांगून टाकले त्यांनी शेजारीपाजारी जाऊन इमारतीतले गोळा झाले सारे झाडून वॉचमनापासून चर्चा वाढत गेली अन मी गल्लोगल्ली फेमस झालो फणीमातेचा भक्त म्हणोनि शहरात प्रसिद्धी पावलो हीच संधी मी साधुनी ठरवलं भरायची आपली तिजोरी फणिमता हि पावते त्याला जो तोरण बांधतो दारी दार आपले , घर आपले आता फणीही माझीच होती भक्त आंधळे अन बहू लोचट त्यांना अक्कल कमीच होती वाढत गेले भक्तगण काहीकाळातच बनला सागर अंबानी खरंच धन्य बाबा तो त्याची फणीपण भरते पैशाने घागर ============================= सिद्धेश्वर विलास पाटणकर तळटीप :: आज गुरुदेव अंगात आले हैत किंवा त्यांनी मनोमन आशीर्वाद दिलेले तरी हैत .. काय उमगत न्हाय बघा , येकयेक भावना उचमबलून आलेल्या हैत .. माफी असावी .. थोडा त्रास देत आहोत त्याबद्दल दिलगीर आहोत .. जय गृदेव......

प्रतिक्रिया द्या
1940 वाचन

💬 प्रतिसाद (2)
म
माहितगार Fri, 02/28/2020 - 14:18 नवीन
वा वा जागृत फणी :))
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 03/07/2020 - 02:06 नवीन
तुमचे नाव आता फणींद्र माथा असे ठेवायला हवे. लै भारी फणी......
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा