Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आजि मराठीचा दिनु!

S — Sumant Juvekar, Sun, 03/01/2020 - 18:32
आज मराठीचा दिन ठोकू घोषणा भर्पूर ! करू फॉरवर्डं मेसेज घेऊ बडवून ऊर !! माये मराठी पहा गं प्रेमा आला महापूर ! सोनियाचा दिनू आता नाही राहिला गं दूर !! पोरे पाठवू आमची इंग्रजि माध्यमामध्ये! शिल्लक जागा राहतील मराठीच्या शाळांमध्ये !! याला म्हणतात त्याग खळबळ मनी माजे! मराठी बांधवांसाठी इत्के केलेची पाहिजे!! मेसेजेस इंग्रजीत इंग्रजीत बोर्ड सारे! वाचवण्या मराठीला काहीतरी करूया रे !! शिकू इंग्रजीमधून इंग्रजीमधून बोलू! वाट इंग्रजीची धरू वाट मराठीची लावू !! मराठीला वाचवा हो अशा बोंबा तरी मारू!! मराठीच्या दिनी तरी गोष्टी मराठीत करू ! गड यायला हवाय सिंह नकोय जायला ! जन्मा यावा तानाजी तो पण- दुसऱ्या घराला !!! दणकवून फॉरवर्ड करा आणि मराठी वरील प्रेम व्यक्त करा -दादासाहेब दापोलीकर 9967840005

प्रतिक्रिया द्या
2355 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
पाषाणभेद Sun, 03/01/2020 - 23:33 नवीन
जळजळीत अंजन आहे वरवरचे मराठी प्रेम दाखवणार्‍यांना. एकदा डोळ्याखालून घाला म्हणजे डोळे उघडतील.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 03/02/2020 - 04:34 नवीन
+१ सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा