Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक चांदणी माझ्या घरात डोकावते

च — चांदणे संदीप, Mon, 03/02/2020 - 11:32
दुधाळ चांदव्यात, प्रखर तेजाळते एक चांदणी माझ्या, घरात डोकावते मी बसतो दडून, तिच्यापासून ती हलत नाही, टक लावते माझा मी लिहितो, हळुवार गुणगुणतो ही, मी लिहिलेले, गावाला ऐकवते चालत राहते रात्र, ही चांदणी मात्र अमीट असल्याच्या, थाटात वावरते उशीरा कधीतरी, फिरते माघारी ती गेल्यावर तिची, टिमटिम आठवते रात्रभर छळते, मला जागवते पहाटे निमूट माझ्या, कवितेत उतरते - संदीप चांदणे

प्रतिक्रिया द्या
4427 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 03/02/2020 - 11:42 नवीन
छान लिहिली आहेस संदीप, मजा आली वाचताना पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
शलभ Mon, 03/02/2020 - 14:34 नवीन
सुंदर. खूप छान.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 03/03/2020 - 04:00 नवीन
अप्रतिम. प्राची अश्विनी, तू आणि पैजारबुवा (खंग्री विडंबने)... मिपावरील कवितांना सध्या परत भाग्याचे दिवस येत आहेत.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 03/03/2020 - 07:52 नवीन
कविता कशी सुचते यावर एक गंमत सांगतो. खरं म्हणजे मलाही ते न उलगडलेले कोडेच आहे म्हणा अजून... असो, म्हणूनच गंमत! या आणि याआधीच्या माझी कवितेचा संदर्भ घेऊन: साधारणपणे कुणालाही असं वाटणं साहजिक आहे की कवितेत चांदण्या वगैरे आणल्यात म्हणजे कवी मस्त रात्री निवांत बसून चांदण्या एन्जॉय वगैरे करतोय किंवा प्रेयसी नाही किमान बायकोला रात्री छान जवळ घेऊन बसला आहे रात्रीच्या आभाळाकडे बघत किंवा गेलाबाजार, घराच्या बाहेर रात्री गार वार्‍यात मित्रांसोबत 'बसून' गप्पा वगैरे मारत बसलेला असताना अशा छान छान कल्पना डोक्यात असतील. कसलं आलंय डोंबलाच! याच्या अगदी उलट गेल्या दोन आठवड्यापासून रोज ऑफिसमध्ये लेट होतोय. रात्रीच्या त्या ऑफिसमधल्या नीरस, नव्हे, अतीईईईईई-नीरस वातावरणात, हातातलं काम मारूतीच्या शेपटासारखं वाढतच चाललंय असं दिसत असताना या कविता आजिबात कुठेही एक चांदणी दिसत नसताना डोस्क्यात आलेल्या आहेत आणी मी त्या हातातले काम बाजूला ठेऊन लिहून काढत रात्रीच्या उशीराला अजून ताणलेलं आहे. आता बोला! आहे की नाही गंमत? सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 03/03/2020 - 08:11 नवीन
म्हणूनच म्हणतात 'जे न देखे रवी, ते देखे कवी' :) लिहित राहा. वाचत आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
प
प्राची अश्विनी Tue, 03/03/2020 - 04:28 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Tue, 03/03/2020 - 08:04 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा