Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ज्ञानोबांस नंब्र विनंती

अ — अनन्त्_यात्री, Mon, 03/02/2020 - 17:23
कवी बिचारा मेटाकुटीने कविता पाडत असतो शाई ओली असताना हा टपली मारून जातो वसुदेवाच्या मनी जशी कंसाची दहशत होती तसे मिपा-कवि विडंबनाचा कंस बघुनी हादरती कवितारतिच्या विनयाचा हा भंग त्वरेने करतो शीघ्रकवित्वा याच्या बघुनी मनोमनी मी जळतो हात जोडुनी हतप्रभ कवि हा दारी तुझिया उभा दयावंत हो पैजारा तू आवर निर्दय प्रतिभा विडंबनाच्या वावटळीतुनी कविता माझी सुटावी ज्ञानोबांनी पैजाराला सज्जड तंबी द्यावी

प्रतिक्रिया द्या
8505 वाचन

💬 प्रतिसाद (12)
प
प्रचेतस Tue, 03/03/2020 - 03:58 नवीन
=)) पैजारबुवांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 03/03/2020 - 04:33 नवीन
पैजारांवर झकास कविता लिहिती अनंत यात्री उत्तर त्याचे असेल भारी याची सगळ्यांं खात्री
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 03/03/2020 - 05:00 नवीन
कवी नव्हे हो इश्वर तुम्ही वंदन करतो तुम्हाला अथांग आहे प्रतिभा तुमची आशिश द्यावा तुम्ही मजला कंस नसे मी, रावण नाही मी तर पुजक सृजनाचा उपमर्द तव कधी ही न घडो ध्यास असे मम जगण्याचा विदुषक मी तर एक बापडा साधन माझे नकलेचे आस एक की प्रोक्षण व्हावे कवितेच्या या गंगेचे वाट पहातो मी चातका सम तुमच्या नव्या कवितेची क्षणार्धात मी हरखून जातो भेट घडता विठुरायाची एकच विनवणी तव चरणाला क्षमा करा या वेड्याला काव्यामृत पाजित रहावे मुढ अजाण या बालकाला पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 03/03/2020 - 05:31 नवीन
__/\__ अत्यंत सुरेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
न
नावातकायआहे Tue, 03/03/2020 - 06:21 नवीन
दंडवत !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ख
खिलजि Sat, 03/07/2020 - 17:47 नवीन
साष्टांग दंडवत स्वीकारा पैंबुकाका,, मस्तच झालंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
न
नि३सोलपुरकर Tue, 03/03/2020 - 05:41 नवीन
पैजारबुवा दंडवत __/\__
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 03/03/2020 - 06:47 नवीन
यात्री आणि पैजार दोघांच्याही उपरोक्त काव्य जुगलबंदीस सादर प्रणाम
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Tue, 03/03/2020 - 08:05 नवीन
यात्री आणि पैजार दोघांच्याही उपरोक्त काव्य जुगलबंदीस सादर प्रणाम हेच म्हणते
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 03/03/2020 - 08:39 नवीन
काय म्हणावे कवित्वाला अन् यात्री, पैजार द्वयीला शीघ्र शीघ्र कुठे शोधिता? शीघ्रांस ठेविले यांनी... पाणी भरण्याला! मिपावर काळ असा लोटला कविता न सापडे औषधाला अनंत यात्री अन् साक्शात माऊली आणती शोभा मिपांगणाला! सं - दी - प
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 03/07/2020 - 10:34 नवीन
वाचक बिचारा मेटाकुटीने मिपा वाचत असतो गोडि आलेलि असताना हा जिलबि टाकुन जातो दुचाकी स्वाराच्या मनी जशी मामाची दहशत होती तसे मिपा-कवि रतिबाचा ओघ बघुनी हादरती वाच्काच्या सन्नशीलतेचा हा अन्त त्वरेने करतो बद्बदा कविता त्या यान्च्या बघुनी मनोमनी मी पळतो हात जोडुनी हत्बल वाचक हा दारी तुझिया उभा क्रुपावन्त हो कविश्वरा तू आवर अफाट प्रतिभा काव्य जन्जाळातुन इतरत्र तुझि लेखणि सुटावि कविश्वरानि किन्चित कविंना अजोड तांबी द्यावी वि.सु. अनन्त यात्रि आप्लया,सन्दीप्,प्राचि आदि कविता सरस आनि पुरेश्या अव्धि घेउन आलेल्या असतात पन मिपावर फक्त श्ब्द्फुले फेकुन ननतर कुठेहि न दिसणार्या धुम्केतु कविंना हि कलाकृति सादर..
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 03/07/2020 - 11:31 नवीन
प्रत्येक आईला आपले बाळ गुणी गोड आणि सुंदरच दिसत असते, कविचे ही तसेच असते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा