Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मेरा कुछ सामान...

प
प्राची अश्विनी
Mon, 03/09/2020 - 13:00
💬 9 प्रतिसाद
1 कविता वाचून तू म्हणालास, पण त्या संध्याकाळची तिरपी किरणं राहिली की लिहायची! राहणारच ना रे?? मुठीत घट्ट पकडून ठेवलीत मी ती! 2 तिरपी किरणं राहिली, तुझ्या चित्रामधली तिरपी रेघ राहिली.. अन् ती छोट्टीशी तिरपी काच पण राहिली.. अश्या तिरक्या कल्पना कुणाला सुचतात का? तिरपागडीच तू... 3 जगजीतची गझलसुद्धा राहिली.. कुठली होती रे ती?? आयला, अशी कशी विसरले?? वय झालं बघ माझं!! 4 काचेचं बाऊल राहिलं.. चाफ्याची फुलं राहिली.. ती बांधून आणलेला कागद राहिला.... त्यावरचा पुडीचा दोरा राहिला.. (तू तो नीट गुंडाळून ठेवलास आणि कागद घडी करून.. पक्का पुणेरी तू!!!) 5 btw त्या दो-याचं नि कागदाचं काय करणार तू??? आठवणी वगैरे बांधायला तो दोरा वापरू नकोस हं..;) कारण दोरा भिजून जाईल, अन् आठवणी वाळून. त्यापेक्षा त्या नीट घडी करून ठेवलेल्या कागदावर चित्र काढ, कुठलंही...... 6 काय राहिलं काय घेऊन आले, याचा हिशोबही राहिलाच. तूच कर तो कधीतरी.. काही बाकी उरलंच तर जपून ठेव. पुन्हा येईन तेव्हा घेऊन जाईन मी... (आता तू याला cliche म्हणणार, माहितीये..;)) 7 फक्त एक संध्याकाळ आणि गुलझारची नज्म कशी अचानक आपली बनून जाते नाही?? मेरा कुछ सामान...

प्रतिक्रिया द्या
3262 वाचन

💬 प्रतिसाद (9)
प
प्रचेतस Mon, 03/09/2020 - 14:08 नवीन
नेहमीप्रमाणेच सुरेख
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 03/09/2020 - 14:13 नवीन
..
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 03/09/2020 - 17:18 नवीन
मेरा कुछ वाणसामान तुम्हारे पास पडा है
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 03/10/2020 - 04:30 नवीन
बाउल काचेची, पुडी फुलांची, फुले चाफ्याची, गजल जगजितची वेळ हिशेबाची यादी राहिलेल्या सामानाची धमकी परत येण्याची इच्छा सक्त वसुलीची पण वाणी असिम त्यागाची ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयुरपंताची ही कहाणी घरा घराची पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 03/10/2020 - 06:12 नवीन
बारोळीत सुफळ संपूर्ण! - खास पैजार टच __/\__ ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
प्राची अश्विनी Tue, 03/10/2020 - 16:59 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ट
टवाळ कार्टा Tue, 03/10/2020 - 22:28 नवीन
दंडवत घ्या बुआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
श
शा वि कु Wed, 03/11/2020 - 04:26 नवीन
कोण्या एकल्या टपरीमध्ये अर्धा अर्धा चहा घेत होतो अर्धे तू अर्धे मी, ttmm तर ठरलंच होतं तुझे पाच कदाचित तुझ्या जीन्सच्या तळाशी निपचीत पडले आहेत वो भिजवादो, मेरा वो सामान लौटा दो :p
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 03/11/2020 - 06:41 नवीन
..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा