Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असुनी स्वत:च पाशी

स — संदीप-लेले, Sun, 03/15/2020 - 18:43
अध्यात्म मोप झाले, व्यवहार तो सुटेना अंतर्मनात चाले, तो घोळही मिटेना   मी एकटाच आलो, जाईन एकटा मी गर्दी कशास जमली? उत्तर कुठे मिळेना   विज्ञान हाच पाया, विज्ञान हीच निष्ठा मानून चाललो तर, तेही पुरे पडेना   दिक्काल वेग सारे, सापेक्ष एकमेका स्थिर वेग का प्रकाशा, बुद्धीस हे गमेना   बुद्धी पल्याड सृष्टी, मी त्यात एक बिंदू असुनी स्वत:च पाशी, मी कोण हे कळेना

प्रतिक्रिया द्या
2875 वाचन

💬 प्रतिसाद (6)
र
राघव Mon, 03/16/2020 - 21:15 नवीन
मी एकटाच आलो, जाईन एकटा मी गर्दी कशास जमली? उत्तर कुठे मिळेना आवडले!
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले Tue, 03/17/2020 - 06:21 नवीन
धन्यवाद राघव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
च
चौथा कोनाडा Tue, 03/17/2020 - 08:21 नवीन
मस्त ! आवडली रचना ! विज्ञान हाच पाया, विज्ञान हीच निष्ठा मानून चाललो तर, तेही पुरे पडेना खरयं, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत हेच खरे !
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले Wed, 03/18/2020 - 05:55 नवीन
धन्यवाद चौथा कोनाडा ! बर्‍याच लोकांना कल्पना नसेल म्हणून थोडा खुलासा. 'स्थिर वेग का प्रकाशा' याओळी विषयी. प्रकाशाचा वेग कायम असतो हे तर सर्वांना माहीतच आहे. परंतु, त्यातही गमतीची गोष्ट अशी की निरीक्षक एका जागी स्तब्ध असतो तेव्हा त्याला भासणारा प्रकाशाचा वेग आणि कितीही वेगात असताना भासणारा प्रकाशाचा वेग हे सारखेच असतात. निरीक्षक जरी प्रकाशाच्या तथाकथित वेगाच्या 90% वेगाने जात असेल तरी त्याला प्रकाशाचा वेग कमी झाल्याचे भासत नाही तर मूळचा प्रकाशाचा वेग असेल तेवढाच तो आताही भासतो. हा संदर्भ आहे त्या ओळीला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
ख
खिलजि Wed, 03/18/2020 - 12:41 नवीन
आपली ही आणि अनंत यात्रींची एक पूर्वकविता ( जनुक जिन्यांची सर्पिल वळणे ) ,, या कविता खरंच आशयघन आहेत .. बघायला गेलं तर त्या खरंच आव्हानात्मक आहेत .. या कविता , कुण्या संशोधकाने वाचल्या तर कदाचित त्याला मार्गदर्शक ठरू शकतात .. खास करून हे कडवं """दिक्काल वेग सारे, सापेक्ष एकमेका,,,स्थिर वेग का प्रकाशा, बुद्धीस हे गमेना""".. खूप गहन अर्थ आहे या कडव्याचा..
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले Wed, 03/18/2020 - 16:07 नवीन
खिलजी आपला अविष्कार पुर्णपणे वाचकापर्यंत पोहोचणे याशिवाय आणखी दुसरे समाधान नाही. खुप खुप धन्यवाद - केवळ तुम्ही केलेल्या यथोचित कौतुकाबद्दल नाही, तर यातला गहन अर्थ पुर्णपणे समजून घेताल्यानाद्दल अधिक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा