Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उल्लेखनीय प्रथा

N
Nitin Palkar
Mon, 03/16/2020 - 16:24
💬 4 प्रतिसाद
गेल्या आठवड्यात एका मित्राच्या मुलाच्या विवाह समारंभात गेलो होतो. नेहमी सारखाच मराठमोळा समारंभ. दोन उल्लेखनीय बाबी आढळल्या. हॉल मध्ये शिरताना, प्रवेशद्वारापाशी सर्व पाहुण्यांना एक कागदी पिशवी दिली जात होती. ज्या मध्ये बीज गोळ्या (seed balls) होत्या. सीड बॉल म्हणजे उपयुक्त झाडांच्या बिया शेणखत, अथवा तत्सम खातात लपेटून त्याचा तिळगुळा एवढा, थोडासा मोठा केलेला लाडू. आशा प्रकारे त्या बिया सहज रुजू शकतात. यजमान सर्व पाहुण्यांना या बिया शक्य तिथे लावण्याची विनंती करत होते. दुसरी बाब म्हणजे लग्न लागताना बोहल्यावरील नातेवाईकांव्यतिरिक्त इतरांना मंगलाक्षता दिल्या नव्हत्या ज्या योगे तांदळाची होणारी नासाडी टाळली होती. मंगलाष्टके संपल्यावर सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून वधू वरांचे अभिष्टचिंतन केले. दोन्ही बाबी उल्लेखनीय वाटल्याने मुद्दाम लिहिले आहे.

प्रतिक्रिया द्या
2268 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ह
हेमंतकुमार Mon, 03/16/2020 - 16:56 नवीन
छान उपक्रम.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Mon, 03/16/2020 - 19:04 नवीन
स्तुत्य
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 03/17/2020 - 03:35 नवीन
छान .. गेली कित्येक वेळा मी पण हे केले आहे मित्र / नातेवाईकांना ड्युटी फ्री चॉकलेट देण्या ऐवजी फळ फुलांचं बिया देतो ,,, फ्लॅट मध्ये राहणारे असतील तर फुलांच्या आणि ज्यांच्याकडे जागा आहे त्यांना फळांच्या सुद्धा .. शिवाय भटकंतीत नेहमी ना मिळणाऱ्या बिया पण मिळतात ..त्यामुळे काहीतरी वेगळे मिळाल्याचा आनंद आणि कुतूहल .. चॉकलेटे काय आज काळ सगळीकडे मिळतात पैसे फेकू तशी दुसरे असे कि जमेल तेवहा भेट म्हणून नाटकाच्या प्रवेश पत्रिका देतो ...मिठाई १५०० रुपये किलो देण्यापेक्षा तेवढाच कलेला हात भार मागे एकदा (जेव्हा परदेशातून इलेकट्रोनिक गोष्टी आणणे स्वस्त आणि आकर्षक होते तेव्हा ) एका मामाला ( आई चा भाऊ पोलीस मामा नाही ) छोटी हवा भरण्याची रबर डिंगी आणली होती , जाम खुश झाला होता मामा कारण तो महिन्यातून एक तरी गड्भ्रमन्ती करायचा आणि त्याकाळी अशी बोट वैगरे किंवा कॅम्पिंग फिशिंग चे सामान मिळणे भारतात खूप अवघड आणि महाग होते ...
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Tue, 03/17/2020 - 08:16 नवीन
चौकस२१२, खूपच छान उपक्रम! _/\_
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा