Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मीनाकुमारी की बेटी ?

श
शशिकांत ओक
Wed, 03/18/2020 - 15:26
💬 20 प्रतिसाद

मीनाकुमारी की बेटी?

 मीनाकुमारी की बेटी? एकदा लाहोरच्या गल्लीतील एका फुटपाथवर एक चोपडे एकाच्या नजरेस पडले. घरी आल्यावर ते फाटके पुस्तक चाळून 'काहीच्या बाही लोक लिहितात' असे मनात म्हणत ते पुस्तक रद्दीत टाकून दिले. रद्दी विकताना ते पुस्तक वाचायची इच्छा झाली म्हणून तो वाचायला लागला. खरे कि खोटे याची शहानिशा करण्यासाठी त्याने शोध घ्यायला सुरवात केली. नंतर जे समोर आले ते तो सादर करत आहे. सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मीनाकुमारीची जीवन कहाणी लेखी स्वरूपात उपलब्ध आहे. माहजबीन नावाने जन्मलेली अलिबक्षची ती मुलगी. अलिबक्ष सध्याच्या पाकिस्तान मधील सरगोधा जवळच्या बेरा गावातला. बलराज सहानी पण तिथलाच असे म्हणतात. गाण्याच्या नादामुळे तो बंबईत आला. पुष्पावती नामक सहकलाकाराशी सूत जमले. पुढे त्यांना संतती झाली. गरिबीमुळे माहजबीनला एका अनाथालयाच्या पायरीवर सोडून बाप परतला. पण पत्नीने कळवळा येऊन त्यांनी मुलीला परत आणले. मास्टर अलिबक्षची मुलगी बाल कलाकार नंतर नावाजलेली अभिनेत्री बनली. कमाल अमरोहींशी तिचा निकाह झाला. आधीच विवाहित अमरोहींशी कटकटी होऊन तलाक होऊन पुन्हा समेट झाला. पाक़ीजा सिनेमा प्रदर्शित झाला अन आजारी मीनाकुमारीचे निधन वयाच्या ३९व्या वर्षी, ३१मार्च १९७२ रोजी झाले. ती वांझ होती असे सर्वांच्या वाचनात आहे. मग त्या पुस्तकात म्हटलेले खरे असेल का? म्हणून यानी शोध सुरू केला. जुने पुस्तक होते. प्रकाशन संस्था बंद पडली होती. लेखकाला कसे शोधायचे? पण त्या आधी त्यात सुचवलेले संदर्भ शोधून काढले पाहिजे होते. म्हणून तो कामाला लागला. कराचीतील एक रिपोर्टर अमीर हुसेन चमन यांनी कमालचे भाऊ रईस अमरोही जे पाकिस्तानात स्थायिक झाले होते त्यांच्या १९७३च्या सुमारास मुलाखती घेतल्या. लंडन मध्ये काही पेपर मध्ये छापून आल्या. ३० वर्षांनी ते सर्व २००३ साली त्यांनी एका पुस्तकात प्रकाशित केले. त्याचे नाव दिले होते 'मीनाकुमारी मेरी भाभी'. ज्या व्यक्तीने रद्दीत सापडलेले पुस्तकातले संदर्भ शोधून काढले त्याने आपले टोपणनाव शहाकार उर्दू घेतले. ते काय म्हणतात? मीनाकुमारीची एक मैत्रीण होती तिचे नाव होते रझिया सुलताना. सन १९५८ च्या सुमारास तिने एका मुलाला जन्म दिला त्याचे नाव होते समंद. रझियाला आधीच एक मुलगी होती. ज्या इस्पितळात ती होती तिथे तिच्या एका महमदी बेगम नावाच्या मैत्रिणीने एका मृत मुलीला जन्म दिला. असीहुद्दीन आणि रझिया सुलताना कुटुंब समोरासमोर राहात होते. महमदी बेगमच्या शौहराने म्हटले की माझ्या आईला कळले की पुन्हा मेलेली मुलगी झाली तर ती मला पुन्हा निकाह करायला भाग पाडेल. ती आज घरी येत आहे. तिच्या समजुतीसाठी तुमचा मुलगा आम्हाला द्या. ती गेली की मुलगा परत करू. रझियाने नाही म्हणत असताना शौहर असीहुद्दीनने मुलाला शेजारणीला दिले. मात्र सासूने ४ दिवस आपला मुक्काम वाढवला. त्या काळात महमदी बेगमने आपले दूध देऊन मुल वाढवले. नंतर परत केल्यावर ते बाळ रझियाचे दूध पीना. म्हणून दूध पाजायला ती महमदी बेगमकडे जाऊन येत असे. महिनाभर झाला असेल. रझियाचा शौहर असीउद्दीन पोलीसात होता. त्याचे आपल्या वरिष्ठांशी भांडण झाले. त्याने गोळी झाडली. वरिष्ठ मेला असे वाटून असीउद्दीन रातोरात पाकिस्तानात कराचीला पळाला. तिथेच नोकरी करू लागला. पोलिसांनी रझियाला नजरकैदेत ठेवले. मुलाला दूध पाजायला समोरच्या मैत्रीणीला भेटणे दुरापास्त झाले. असेच ३ वर्षे गेली. मधल्या काळात मैत्रिणीचे कुटुंब निघून गेले. पोलीस त्रासाला कंटाळून ती पण पाकिस्तानात कराचीला शौहर समेत जाऊन राहू लागली. त्या काळात असे देशांतर सर्रास चाले. रझियाला नंतर ३ मुले झाली. पण समंदची आठवण तिला बेचैन करत होती. एकदा महमदी बेगमची नातलग तिला पाकिस्तानात भेटली. भारतात महमदी बेगमचा पत्ता दिला. तेंव्हा ती ७ महिन्याची पोठूशी होती. असीहुद्दीनने अशी गर्भार असताना जाऊ नकोस म्हणून धमकावले. तरीही रझिया भारतात आली. त्या वेळी समदचा खतना करायचा विधी केला जात होता. महमदी बेगम म्हणाली, 'तुझा मुलगा १८ वर्षे पूर्ण झाली की तू त्याला पाकिस्तानात घेऊन जा' . मुलाला जवळ घेतले की मी तुझी मावशी आहे म्हणून. आधी कधी न भेटलेली 'खाला' इतके का जवळ का घेते आहे म्हणून तो १३ वर्षाचा पोर भांबावून गेला. व लांब पळायला लागला. रझिया जिना उतरताना घसरून पडली. एक मुल मेलेले जन्मले. तर दुसरे समोर असून मां मानत नव्हते. नवर्‍याला कळले तर तो आपल्याला हाकलून लावेल अशी भिती वाटत होती. त्या काळात ती आपली मैत्रीण मीनाकुमारीला भेटायला गेली तेंव्हा मीनाकुमारीची २ ते ३ महिन्याची मुलगी चमच्याने दूध पीत होती. रझियाच्या गोदीत ती मुलगी अशी सामावली की जणू ती तिचीच मुलगी आहे. ते पाहून मीनाकुमारी म्हणाली, 'रझिया तुझी मुलगी तू नुकतीच गमावली आहेस. तू या मुलीला सांभाळ. मी माझ्या बाळंतपणासाठी खूप मोठी रिस्क घेतली होती. पण तिचा बाप आपले नाव द्यायला तयार नाही. वाटले होते की मुलगा होईल. त्याला व मला अमरोहींचे नाव मिळेल. माझी तब्येत चांगली नाही. तू मुलीला घेऊन पाकिस्तानात जा. भारतात येताना तुझ्या नवर्‍याने तुला सोडायची धमकी दिली होती मुलीला पाहून तो ही शांत होईल'. रझियाला काय करावे कळत नव्हते. मीनाकुमारीने तिच्या विसाची सोय करून दिली. ' मी तुला वचन देते की मी जीवंत असे पर्यंत ही गोष्ट माझ्याकडे राज राहील. तू माझ्यावर मेहेरबानी कर' मीनाकुमारी म्हणाली. रझिया पाकिस्तानात आली इतर मुलाबाळांत वाढू लागली. बाप असीहुद्दीन रझियाला म्हणायचा, 'तू तिला मीनाकुमारीच्या गोद मधे ठेवले होते म्हणून तिच्यात मीनाची झाक वाटते'. ती घरात आल्यापासून बापाला व्यापारात बरकत झाली. तो दुबईत कुटुंब घेऊन जाई तर कधी दुबईहून भेटायला येई. रझियाने तिचे नाव झेबाच ठेवले. पण बाप कौतुकाने गुलजेब म्हणायचा. गोष्टी इतक्या जुन्या काळातील आहेत त्यामुळे मीनाकुमारी शिवाय कोणाचेही फोटो उपलब्ध नाहीत. झेबा कराचीतील शाळेत जायला लागली. लहान असताना शेर लिहायच्या आवडीचे कौतुक व्हायला लागले. एका डॉक्टरने म्हटले की ही मुलगी सुपर जीनियस आहे. बापाला शेरोशायरीची चीड होती. तो ते कागद फाडून टाके. मधल्या काळात १८ समद वर्षांचा झाला. तिथे त्याला कळले की आपले खरे मा बाप पाकिस्तानात आहेत. तो तिथे कराचीत पोचला. आणि त्यांच्या घरात राहू लागला. मुले १४, १५ ची झाली की शादी करून द्यायचा रिवाज होता. 1981 मधे झेबाचा निकाह सिंध मधील गबर आणि नामी घराण्यात झाला. पुढे तिला एक मुलगी व मुलगा झाला. पण नवर्‍याच्या छळाला कंटाळून तिने खुला मागितला. नवर्‍याने चिडून तिला एका रात्री घराबाहेर काढले गेले. कशीबशी पायी तिने माहेरचा दरवाजा ठोठावला. तिथे तिला 'आमच्या घरी येऊ नकोस' म्हणून धुतकारले गेले. 'आपल्या सासरी जा. अशी परित्यक्ता म्हणून आमची बेईज्जती होईल'. दुबईहून बापाने तसेच म्हणले म्हणून नवर्‍याला बोलावून सुलह करायचा प्रयत्न केला गेला. या दरम्यान झेबा पडली. डोक्याला मार लागला. तिने डोळे उघडले तेव्हा ती कराचीतील एका खैराती इस्पितळात होती. रझिया तिला म्हणाली, 'झेबा, तुझी मुले पण आमच्याकडे सोडून शौहर गेला आहे. तुला आमच्या घरी राहायला मना आहे. त्या काळात कराचीहून एक प्रकाशित होणाऱ्या एका नियतकालिकाने दिलेले पैसे नवर्‍याने हडप केले. ती एके ठिकाणी नोकरी करत होती तिथून तिला हाकलून दिले गेले. फक्त १३ रुपये घेऊन एक दीड वर्षाचा मुलगा आणि ४ महिन्याची मुलगी घेऊन सायकल रिक्षात बसून ती एका चौकात उतरली. एका चाळीत तिसर्‍या मजल्यावर जागा घेतली. एक नोकरी पकडली. तिला ५ लाखांची लॉटरी लागली. सहा महिन्यांत अर्थिक स्थिती सुधारली. भावाच्या लग्नात तिला बोलावले होते. तिथे काही नातलग भारतातून आले होते. काहींना झेबा मीनाकुमारीची मुलगी आहे हे माहीत होते. झेबाला ते ऐकून तेंव्हा धक्का बसला जेव्हा रझियाने हो म्हटले. झेबाचे हे घर तुटले. 'मीनाकुमारीची मुलगी म्हणूनच कशी एक्टिंग करायची बघा' वगैरे टोमणे समाजात सुरू झाले. झेबा आपली सख्खी बहीण नाही कळताच तिला लग्न समारंभातून हाकलून दिले गेले. असीउद्दीनला कळले रझियाने आपल्याला खोटे सांगितले होते. तो नाराज झाला. दुबईत मुंबईतील एका बाईशी दुसरी शादी करून रझियाशी संबंध तोडले. कालांतराने ते ही वारले. झेबाची मुले मोठी झाली ती आपल्या आजोळी राहायला गेली. झेबाने ग्रॅज्युएशन केले, लॉची डिग्री मिळवली. २००२ मधे ती पीएच.डी करत होती. मीनाकुमारीला जाऊन १२ वर्ष झाली होती. कमाल अमरोहींचे निधनाची बातमी ऐकून ती जॉन एलिया यांना भेटली. ते कमाल अमरोहींचे सख्खे चुलत भाऊ होते. त्यांनी तिला सांगितले, 'तू मीनाकुमारीची मुलगी आहेस. हे कमाल अमरोहीना माहित नव्हते. मीनाने आपली मुलगी तिच्या पाकिस्तानी मैत्रीणीला दिली होती इतपत माहित होते. कमाल वारले तेव्हा मीच जवळ होतो' . ते म्हणायचे, 'मीनाकुमारीला, तिच्या मुलीला मी घरचांच्या दबावामुळे सन्मान देऊ शकलो नाही. याचे दुःख मला सदैव राहील' . जॉन ऐलिया हे त्यांचे टोपण नाव होते. खरे नाव होते सईद सिब्ते असगर नकवी होते. तेही महिन्याभरात वारले. इम्रान खान यांनी तिला एक तडफदार खातून म्हणून २००२ च्या निवडणुकीत तिकिट देऊ केले. मात्र एका निवडणुकीच्या जलशात काही बायकांनी तिला' तवायफ़ की दो टके की औलाद' म्हणून नालस्ती केली. तेव्हापासून ती समाजिक कार्यक्रमात पासून दूर राहू लागली. दरम्यानच्या काळात तिला मुंबईत अमरोहींचे दोन मुलगे व एक मुलगी असल्याचे समजले होते. ती ५ वर्षांची होती तोपर्यंत मीनाकुमारी जीवंत होती. झेबा म्हणते, 'मला हे तेंव्हा कळले असते तर मीनाकुमारीला मूल नव्हते हे मी स्वतः माझ्या साक्षीने तेव्हा सांगितले असते' . ' जे झाले ते झाले, मी आता ऑगस्ट १९९७ नंतर निसार एहमद निजामानी सांगड सिंधींची पत्नी आहे. मला सिनेमात काम करायला मीनाकुमारीचे नाव वापरायचे नव्हते. मी माझ्या गुणामुळे ओळखली जावी अशी माझी इच्छा आहे'. सध्याच्या काळात झेबा कुठे आहे ती दिसते कशी? रद्दीतील पुस्तक लेखक अमीर हुसेन चमन, जीवंत आहेत का? वगैरे जाणून घेण्यासाठी या बातमीचे शोधक शाहकार उर्दूना यश मिळेल का असे त्याना वाटत राहिले… … पुढे चालू…

प्रतिक्रिया द्या
12954 वाचन

💬 प्रतिसाद (20)
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 03/18/2020 - 19:30 नवीन
रोचक माहिती. गम्मत म्हणून तुमच्या त्या फेसबूकवर शोधले. झेब निझामनी नावाची एक पाकिस्तानी कवयित्री आहे . कराचीत राहते. ती हीच असेल का? अशी एक शंका. Image removed. https://www.facebook.com/Zeb-Nizamani-PoetessWriter--197374136955243
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक गुरुवार, 03/19/2020 - 04:32 नवीन
गम्मत म्हणून तुमच्या त्या फेसबूकवर शोधले
कदाचित असेल.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Fri, 03/20/2020 - 13:05 नवीन
कदाचित नसेल? भाग २ मधील फोटो आणि माहिती वाचून आपले काय मत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 03/21/2020 - 11:48 नवीन
बरोबर भाग २ मधील फोटो.. तीच मीनाची मुलगी. चेहर्याची ठेवण वगैरे तीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
आ
आनन्दा गुरुवार, 03/19/2020 - 07:55 नवीन
केव्हढी गुन्तागुंत आहे हि!
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 03/19/2020 - 10:07 नवीन
मेंदूचा पार गुंता झाला, हो.. लैच ट्विस्ट्स आहेत ह्या स्टोरीत..
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी गुरुवार, 03/19/2020 - 15:14 नवीन
एकदम वेगळी कथा वाचायला मिळते आहे. पुढचा भाग लवकर टाका. :-)
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक गुरुवार, 03/19/2020 - 19:32 नवीन
दुर्गविहारी, भाग २ सादर केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
म
मदनबाण Sat, 03/21/2020 - 06:26 नवीन
लेख वाचल्यावर इंद्राणी मुखर्जीची नात्यांच्या गुंतागुंतीची आठवण आली !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Madhuban Khushboo Deta Hai... :- Saajan Bina Suhagan (1978)
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Wed, 04/15/2020 - 17:54 नवीन

हे ओक, मीनाकुमारीच्या मागे का लागलेत असे काहींना वाटेल....

पूर्वी मीनाकुमारीच्या असंख्य चाहत्यांना ती पडद्यावर अभिनय करताना तिच्या तुटक्या करंगळीचा शोध घेणे हा चाळाच लागला होता! आम्हाला पण होता. पण त्या ओझरत्या क्षणात कधी पहायला मिळाले तर तो शॉट पुन्हा पुन्हा पहायला अशक्य होत असे. आता जुने सिनेमे पहायची सोय आहे. फ्रीज करून, बॅक करून ते शॉट्स पुन्हा पहायला शक्य होते. एका गाण्यात तिने चतुराईने लपवून सुद्धा तिच्या तुटक्या करंगळीचे दर्शन पहायला मिळाले. Image removed. आजच्या पिढीला त्याचे अप्रूप मुळीच नसावे... पण काहीं सफेद केसवाल्या ५ - १० जणांना कदाचित पहायला आवडेल... म्हणून सादर... आता एक पहेली... कोणत्या सिनमातील, कुठल्या गाण्यातून हे दिसत असेल?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 04/17/2020 - 22:13 नवीन
शशिकांत ओक,
कोणत्या सिनमातील, कुठल्या गाण्यातून हे दिसत असेल?
या प्रश्नाच्या उत्तराचा सुगावा (=हिंट) चित्रात दाखवलाय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
श
शशिकांत ओक Sat, 04/18/2020 - 07:30 नवीन
हिंट दिली आहे... कल्पनेचे वारू पळू द्या... निदान ३-४ जण पटकन उत्तर देतील असे वाटते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
य
योगविवेक गुरुवार, 04/23/2020 - 20:53 नवीन
हा नाच या पेक्षा बरा करत असतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
श
शशिकांत ओक Fri, 04/24/2020 - 19:14 नवीन
य़ोग विवेक, मला मात्र तुमचे म्हणणे योग्य वाटते... आजकालच्या नृत्य स्पर्धेत भाग घेणाऱ्यांची तयारी व अदाकारी पाहता तुमचे म्हणणे पटते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगविवेक
म
मदनबाण Sat, 04/18/2020 - 16:50 नवीन
हेच का ते गाणं ? साधारण २:३६ च्या फ्रेमचा स्क्रीनशॉट तुम्ही दिलेला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aithey Aa... :- Bharat
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 04/18/2020 - 21:08 नवीन
धन्यवाद मदनबाण! तुम्ही दिलेल्या गाण्यातलं आजूनेक पटचित्रं : Image removed. तुटलेलं बोट स्पष्ट नाहीये. पण इतर बोटांच्या लांबीवरून करंगळी बरीच आखूड असल्याचा अंदाज बांधता येतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
श
शशिकांत ओक Sat, 04/18/2020 - 21:45 नवीन
फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या वतीने आपल्याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यासाठी प्रयत्न केला जावा...
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sat, 04/18/2020 - 21:55 नवीन
मी कोईमतूरला ज्या भागात राहायचो तिथे एक गोडाऊन दिसे. तो पूर्वी पक्षिराज स्टूडियो होता. आझाद सिनेमाची निर्मिती तिथे झाली होती...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
म
मदनबाण Sun, 04/19/2020 - 08:05 नवीन
गा.पै, तुमचा दिलेला व्हिडियो अधिक योग्य आहे. :) फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या वतीने आपल्याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यासाठी प्रयत्न केला जावा... मी भाषण तयार करुन ठेवतो. ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaathikkathottam... :- Thanneer Mathan Dinangal
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
च
चौथा कोनाडा Sun, 04/19/2020 - 08:52 नवीन
थरारक कहाणी, सिनेमा निघेल या वर पुढे मागे. (एक शंका: सिल्क स्मिता हिच्या सारख्या आयटमगाणी करणार्‍या नटीवर सिनेमा निघतो, पण मीनाकुमारीसारख्या अभिनेत्रीवर का निघत नाही ?)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा