Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मास्कमधून

च — चांदणे संदीप, Sun, 03/22/2020 - 02:11
नाहीत तुला पाय तरी देशोदेशी जाशील गावागावा-वस्त्यांमधून द्वाडासारखा फिरशील तुझी असंख्य भावंडे माजवतील हाहाकार पण घे लक्षात, आमच्यात आहे शिल्लक प्रतिकार जितका झपाट्याने तू पोखरत जाशील आत तितकीच उसळून उठेल अशी माणसाची जात माणूस मारणं कदाचित असेल सोपं काम रे पण दाखव जिंकून त्याला म्हणशील मनात 'राम रे!' माहिती नसेलच तुला जगणं-जगवणं कोरोना बघ बापाला, मास्कमधून पापी पोराला देताना संदीप भानुदास चांदणे (२२/०३/२०२०)

प्रतिक्रिया द्या
3320 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
प्रचेतस Sun, 03/22/2020 - 02:19 नवीन
जबरदस्त.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 03/23/2020 - 09:51 नवीन
सुरेख आणि समयोचित ही लढाई आपण जिंकणारच पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 03/23/2020 - 10:09 नवीन
आवडलीय कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 03/23/2020 - 16:01 नवीन
वा, खुप सुंदर ! माहिती नसेलच तुला जगणं-जगवणं कोरोना बघ बापाला, मास्कमधून पापी पोराला देताना हे क्लासच !
  • Log in or register to post comments
स
समीर वैद्य गुरुवार, 03/26/2020 - 02:08 नवीन
झालीये कविता...
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा