Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पार्टी

न
निखिल माने
Sun, 03/22/2020 - 19:06
३१/१२/२०१९ वेळ:संध्याकाळ अजून घेणार आहेस नको, उद्या त्रास होईल काही नाही होत रे, हाच प्रॉब्लेम असतो तुम्हा कधीतरी करणाऱ्यांचा. फार थोडक्यात आटपता. अरे काय करू तुझ्या सारखे आम्ही पिढीजात नाही, आमच्या वंशावळीत हे सेवन करणारे आम्ही पहिलेच, त्यामुळं जपून करावं लागत. घरी कळलं तर पिताश्री हाकलून काढतील. हो यार, पाहिलंय तुझ्या घरात मी. एकदा चुकून नाव काढलं तरी तुझा बाप मी धर्म भ्रष्ट केला असं बघत होता. जाऊदे आज तुझे बाबा कंपनी द्यायला नाहीयेत? अरे आई बरोबर गावी गेलेत. नाहीतर दोघांनीही मस्त कंपनी दिली असती. आईला तर फार आवड आहे, बेत आखला कि एकवेळ बाबा नाही म्हणतील पण आई फार हौसेन तयारी करते. हो यार तुझी आई पाहिजे होती आजच्या पार्टीला. तो खरी दर्दी आहे यात. जाउदे पुढच्या वेळेस असेल ती. ते जाऊदे पी थोड अजून. पोट साफ होईल एकदम. काहीही हा, अंधश्रद्धा आहे ती. म्हणजे इतके लोक पितात ते येडे. बरं बाबा, दे इकडे पितो अजून. रस्सा तरी घे, असा धर्मभ्रष्ट करणारा रस्सा काही तुझ्या घरी मिळणार नाही. तांबडा नको पांढरा वाढ.

प्रतिक्रिया द्या
1521 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा