Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चला माणसाप्रमाणे वागूया !

उ
उदय सप्रे
Tue, 03/24/2020 - 07:12
माननीय आणि प्रिय रसिक वाचक , *सप्रे* म नमस्कार ! आपण सगळ्यांनी / काहींनी माझे लेख , कविता , स्केचेस , पेंटिंग्ज , अभिनयाच्या व गाण्याच्या clips , गझल्स , पुस्तक वाचलं असेल.पण आज मी एक वेगळ्याच विषयावर हा लेख लिहितो आहे. गेले काहि आठवडे जगभरामधे आणि आपला भारत पण जगाचाच एक भाग असलेल्या आपल्या देशात — कोरोना विषाणूमुळे भयंकर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे. *आपले पंतप्रधान — ते कुठल्या पक्षाचे आहेत याच्याशी माझं काहीही देणंघेणं नाही , पण त्यांनी — मा.नरेंद्र मोदी यांनी भारताला या संकटापासून कमीत कमी त्रास व्हावा यासाठी केलेले प्रयत्न आपण सगळेच पाहतोय.गेल्या ७ दशकांमधे जे अशक्य होतं अशा अनेक अकल्पनीय बदलांनी त्यांनी भारताचं नांव जगभरात अग्रणी नेऊन ठेवलेलं आहे ! सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या देशात सैनिकांवर दगडफेक होण्यासारखी व देशाचा ध्वज—झेंडा जाळण्याची निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणारी कृत्यं घडत होती , तशा कृत्यांची वारंवारिता नष्ट किंवा कमी केलीये व सैनिकाला त्याचा सन्मान मिळवून दिला आहे !* परवा २२ मार्चला देशभरात दिवसभर कर्फ्यू पाळल्यानंतर आपल्यापैकी काहि दीडशहाण्यांनी ५ वाजता रस्त्यांवर जमा होऊन , गच्चीमधे एकत्र जमून , ढोल ताशे वाजवून , टाळ्या वाजवून , थाळ्या वाजवून , शंख वाजवून सेवाभावी लोकांचे जाहीर आभार मानलेत ! काय म्हणावं या वेडेपणाला ? जे टाळण्यासाठी दिवसभर विजनवास पत्करला ते झुगारून देऊन परत एकत्र जमायचं ? जगभरात कोरोना कसा पसरतोय हे बघत—वाचत—ऐकत असूनही ? दुसर्‍या दिवशी — मी ठाण्याचा रहिवासी असल्याने ठाण्याबाबत लिहितोय , चेकनाक्यावर वाहनांची तूफान गर्दी करावी ? सगळं काही सरकार करणार ? मग आपण काय करायचं ? हे असं जमावबंदी असतानाही , अनेक विनंत्या आवाहनं करूनही गर्दी करायची , मग विषाणूचा प्रादुर्भाव झाला की इतरांपर्यंत तो पोचवायचा व वर मग सरकारला शिव्या घालायच्या ? *नकटीचा मुलगा पण नकटाच!* या न्यायाने मोदीजींचं कर्तृत्व न पाहता त्यांच्या प्रत्येक कृतीचं राजकारण करायचं ? *आवश्यकतेखेरीज घराबाहेर पडू नका!* — या सरकारी आवाहनाला धाब्यावर बसवून कालपासून अनेक सुशिक्षित विद्वान घराबाहेर व्यायामासाठी ( जाॅगिंग / ब्रिस्क वाॅकिंग / वाॅकिंग ) बाहेर पडलेले दिसत होते.आणि मग यापैकीच काहि / सगळी मंडळी मग सोशल मीडियावर कोरोनापासून वाचण्यासाठी अमूक करायला हवं , सरकारने तमूक करायला पाहिजे होतं..... वगैरे ज्ञान पाजळणार ! सोपं आहे ना ? घरात ए.सी. मधे / पंख्याखाली बसून उपदेश करणं एकदम सोपं ना ! मंडळी , *काळ कुणालाही इन्कम टॅक्स सारखी किंवा इतर कुठल्याही सरकारी नोटिशीसारखी नोटीस देत नाही!* आणि *मला कुणाचीही गरज नाही!* या आत्मप्रौढीमधे वावरणार्‍या तमाम लोकांना *मृत्यूनंतर पण ४ लोकं खांदा द्यायला लागतात!* या कटू सत्याचा विसर पडलेला दिसतो ! मंडळी , अजूनही वेळ गेलेली नाही ! ज्या कळकळीने आराम करायच्या वयामधे पण १८— १८ तास अथक काम करणारे मोदीजींसारखे पंतप्रधान आणि आपल्या देशातील तमाम नागरिक सुरक्षित रहावेत म्हणून अनेक सेवाभावी लोक झटतायत , त्यांच्या त्या प्रयत्नांना आपण सगळ्यांनी साथ नको का द्यायला ? बरं ते पण काय करून ? तर आपल्याच घरामधे स्वत:ला कोंडून घेऊन , स्वत:च्या स्वार्थासाठी—आरोग्यासाठी ! *जान है तो जहाँ है!* — हे माहित आहे म्हणून आपला जीव वाचवण्यासाठी , आपल्याच स्वार्थासाठी ! मंडळी , तुम्ही सगळे भारतीय , मला धडधाकट हवे आहात , पुढची अनेक वर्ष आपले ऋणानुबंध दृढ रहायला हवेत ! मला तुम्ही सगळे हवे आहात — जसे आहात तसे ! आपल्यात *मतभेद असतील पण मनभेद नसावेत!* मला *तुमची गरज आहे!* कधी माझं कौतुक करण्यासाठी , कधी निंदा करण्यासाठी , कधी टाळ्या वाजवण्यासाठी तर कधी चिखलफेक करण्यासाठी ! *मला कुणाचीही गरज नाही!* या घमेंडीमधे मी कधी नव्हतो , आज नाही आणि यापुढेही नसेन ! तेंव्हा मंडळी , *सरकारच्या प्रयत्नांना साथ द्या , सरकार सांगेल ते ते सर्व कसोशीने पाळा , आरोग्यमयी रहा , दीर्घायू व्हा !* लहानतोंडी मोठा घास झाला असल्यास क्षमस्व ! पण जगलो वाचलो तर दीडशहाणपणा करायला भविष्यात भरपूर संधी मिळेल याची खात्री बाळगा! कारण भारतात सगळ्यालाच स्वातंत्र्य आहे आणि म्हणूनंच नको तेवढं स्वातंत्र्य नको त्याबाबत न घेता *सरकारच्या विनंत्या , आवाहनं , आदेश याचं पालन करूया!* कळावे , आपला विनम्र , उदय गंगाधर *सप्रे* म—ठाणे

प्रतिक्रिया द्या
1013 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा