Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लॉक्ड इन : आयुष्यातली एक अपूर्व संधी !

स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 03/26/2020 - 18:03
💬 51 प्रतिसाद
गेली ३० वर्ष मी घरुन काम करतोयं त्यामुळे जे लिहीलंय तो सगळा स्वानुभव आहे. लॉक्ड इन ही आयुष्यातली एक अपूर्व संधी आहे. कोणतीही घटना ही कायम वस्तुस्थिती असते, तिच्याकडे जो संधी म्हणून पाहातो त्याचं आयुष्य उजळतं, जो आपत्ती म्हणून बघतो त्याला फक्त वेळ कधी संपते याची वाट बघावी लागते. ' जीवन म्हणजे इतकी वर्ष ' अशी अत्यंत चुकीची धारणा आयुष्यात कोणताही बदल घडू देत नाही, कारण जीवन म्हणजे ' एक दिवस गुणीले काही हजार वेळा ' असा हिशेब आहे. थोडक्यात ज्याला आयुष्यात रंग भरायचेत त्याला आजच्या चोवीस तासांच काँपोझिशन बदलायला लागतं. जर आजच्या चोवीस तासात तुम्ही गाण्यासाठी एक तास दिलात, तरच तुमच्या जीवनात गाणं प्रवेश करेल आणि मग ते रोजच्या आजमधे भिनत तुमचं आयुष्य बदलेल. आज तुम्ही जितका जमेल तितका योगा मन लावून केलात तर त्या स्ट्रेचमुळे मोकळं झालेलं शरीर तुम्हाला उद्या योगा करायला उद्युक्त करेल. अशाप्रकारे तुम्ही आजच्या चोवीस तासांच्या काँपोझिशनमधे जितका बदल घडवाल तितकं तुमचं आयुष्य बदलेल. शिवाय आयुष्यात मजा यायला ते कायम इंटर-अ‍ॅक्टीव हवं, म्हणजे मला क्रिकेटची आवड आहे असं म्हणणाऱ्याला जगात सामने सुरू व्हायची वाट बघावी लागते. हेच तुम्ही स्वतः टेबल -टेनीस खेळत असाल तर तुमचा फोरहँडचा बसलेला फटका, जगातल्या कोणत्याही प्लेअरचा कुठल्याही फटका बघण्यापेक्षा, तुम्हाला खाचितच जास्त आनंद देतो. शिवाय तुम्हाला खेळात कौशल्य प्राप्त करायची संधी देतो. तव्दत, नुसतं वाचन जितका आनंद देईल त्यापेक्षा तुमचं स्वतःच लेखन तुम्हाला कैक पटीनी जास्त आनंद देतं; पण त्यासाठी लेखनकला अवगत करायला लागते आणि काही तरी सांगण्यासारखं अनुभव समृध्द जीवन असावं लागतं. कवितेचा व्यासंग आणि स्वतःचा अनुभव कवितेतून मांडणं हा एक वेगळाच कैफ आहे. त्यासाठी शब्दसमृद्धी, लयीचं भान, अनुभवाची उत्कटता अंगी भिनवावी लागते. पाककला हा जीवनातला एक नितांत रम्य विषय आहे. पत्नीकडून पोळ्या करायला मी आता शिकणार आहे. पोळी जमली की निम्मं आयुष्य सार्थकी लागल्याचा फिल येईल. आपल्या आवडीच्या पाककृती पत्नीसमवेत करण्याची मजा काही औरच आहे. इथले लॉक्ड इनवरचे दिवस मोजणारे लेख पाहिले, अशाप्रकारे वेळ घालवणं म्हणजे केवळ कालापव्यय आहे. ते सगळे पर्याय काहीच करायला नसतांना ठीक आहेत, पण हा कालावधी वाढला (आणि तीच शक्यता जास्त आहे) तर त्यातून यथावकाश डिप्रेशन येईल आणि हाती आलेली अपूर्व संधी निसटून जाईल. व्यक्तीचं जीवन हे वृक्षाप्रमाणे बहरत जायला हवं, रोज नवं काही तरी शिकावं, नव्या विषयाचा मागोवा घ्यावा, आपला असलेला स्कील सेट आणखी कारगर करत न्यावा असं मला वाटतं आणि निदान मी तरी तसा जगत आलोयं. या निमित्तानं हा लेख कदाचित तुमचंही जीवन बदलू शकेल.

प्रतिक्रिया द्या
19133 वाचन

💬 प्रतिसाद (51)
च
चामुंडराय Sat, 05/23/2020 - 04:19 नवीन
बाहेरच्या व्यवहारिक जगात वावरताना सदैव संवाद साधावा लागतो, सतत बोलावे लागते. ह्या लॉक डाऊन च्या निमित्ताने एक दिवस सकाळ पासून ते रात्री पर्यंत मौन पाळता येईल काय? प्रयत्न करून बघायला पाहिजे. विपशन्येतील एक अनुभव खाती जमा होईल. असा प्रयोग कोणी केला आहे का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा