Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वळण

प — प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, Sun, 03/29/2020 - 07:11
गुलमोहरांच्या आपल्या त्या कावळ्या चिमण्यांच्या ओट्यावर. काल तु म्हणालीस 'वाट बघ' आता आपलं कसं म्हणून पुस्तकांची पानं उचकत आतल्या आत गोठून गेलो एका पानावर, मोगर्‍याच्या वेलीशी, फांदी सोडून घेतेय आपले हात. दारातून दिसतेय मला, आयुष्याचा हिशेब बोटांच्या कांड्यावर मोजणारी म्हातारी, आणि हळद लावून बसलेली भेदरलेली नवरी. शहरापासून मरणा अगोदर कोण पोहोचतो, म्हणुन. भूके कंगालांचे तांडे सरकताहेत हळू हळू गावांकडे. सगळीच तीर्थस्थाने, महापुरुष आठवून कोणीच येत नाही डोळ्यासमोर, हडबडून, गडबडून, घामाने चिंब होऊन. टीटवीचा आवाजही देह चिरुन जातो. आपलं ठरलंय, विना आणाभाकांचं. तुला मी आणि मला तू जपायचं. तुझा जिव्हाळा, अबोला धपापणारा श्वास, अन एक खोल हुंदका. सखे, आत्ता तू जशी असशील तशी ये. मरणाची भिती दाटून गेलीय. आज.. कुठले हे वळण, दूर..दूर राहण्याचे......!

प्रतिक्रिया द्या
6210 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
प्रचेतस Sun, 03/29/2020 - 07:41 नवीन
सखे, आत्ता तू जशी असशील तशी ये. मरणाची भिती दाटून गेलीय. आज.. कुठले हे वळण, दूर..दूर राहण्याचे......!
अस्वस्थ करणारी कविता. तुम्ही पुन्हा एकदा ललित लेखन सुरू करावे.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 03/29/2020 - 07:41 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 03/29/2020 - 07:44 नवीन
वाह प्रा डॉ सर, वाह. __/\__
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 03/29/2020 - 09:37 नवीन
वाह प्रा. डॉ. डीबी सर, क्या बात! अजून लिहाच. सं - दी - प
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 03/29/2020 - 10:25 नवीन
कडक!!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sun, 03/29/2020 - 12:44 नवीन
अव्वल लिहीलंय.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 03/30/2020 - 13:28 नवीन
प्रा डॉ..… लै भारी लिहीताय. एखादी कथा लिहा होऊन जाऊदेत
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 03/30/2020 - 18:16 नवीन
जबरी !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 03/31/2020 - 06:46 नवीन
प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहानाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार. असाच लोभ राहु द्या...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 03/31/2020 - 17:09 नवीन
चांगली रचना. भावनेला हात घालणारी. :-)
  • Log in or register to post comments
M
Madhugandha Sat, 05/23/2020 - 12:43 नवीन
सर, कोरोनाच्या संकटकाळातील हे दृश्य कवितेत हुबेहूब चितारले आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 05/23/2020 - 12:53 नवीन
छान लिहिली आहे कविता.. मस्त
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 05/23/2020 - 13:31 नवीन
व्वा, जबरदस्त !
शहरापासून मरणा अगोदर कोण पोहोचतो, म्हणुन. भूके कंगालांचे तांडे
अक्षरशः चित्र डोळ्यांपुढं उभं रहिलं आनि एकदम उदासवाणं वाटून गेलं !
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा