Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सोशल डिस्टन्सिंग

प
प्रकाश घाटपांडे
Tue, 03/31/2020 - 08:35
💬 7 प्रतिसाद
सोशल डिस्टंन्सिंग एकदा टिळक स्मारकला वसंत व्याखानमालेला गेलो होतो. व्याखान आमच्या मित्राचच. सुरवातीला मी, व्याखाते व आमची एक मैत्रिण असे अनौपचारिक गप्पा संयोजकांशी झाल्या. ऑडिटोरियम मधे गर्दी भरपूर झाली होती. सुरवातीच्या रांगा राखीव होत्या. मैत्रिण तिथे पर्स शेजारच्या खुर्चीवर ठेवून बसली मी तिथे शेजारी बसावे अशा सहजप्रवृत्तीने गेलो. तिने नाईलाजाने पर्स मांडीवर घेतली असावी.( हा आपला अंदाज) काही काळा नंतर तिचे बहुतेक लक्ष लागेना. मग तिने माझ्या उजव्या बाजूला पर्स ठेवून पर्सच्या शेजारी बसली. मगच तिचे लक्ष व्याखानात लागले. मी मनातल्या मनात हसलो. कारण मला एक किस्सा आठवला होता. मराठी विज्ञान परिषदेत एक व्याखान होते. त्याचा विषय होता शरीरातील जीवजंतू व आपण- डॊ. अपुर्वा बर्वे यांचे व्याखान होते. त्यांनी तो किस्सा सांगितला होता. त्या परदेशात गेल्या होत्या.एका एअर पोर्टवर त्या लाईनीत एका माणसाच्या मागे उभ्या होत्या. समोरचा मनुष्य फार अवस्थ वाटत होता. म्याडमला काही कारण कळेना. शेवटी त्या माणसाने नम्रपणे सांगितले madam you are consuming my space.मग त्यांच्या लक्षात आले कि त्या भारतीय सवयीनुसार कमीत कमी अंतर ठेवुन त्या माणसाच्या मागे उभ्या होत्या.सुरक्षित अंतर हे केवळ सुरक्षिततेसाठी नसत तर ते मानसिक स्वास्थ्यासाठीदेखील असत. करोना निमित्त असलेल्या सोशल डिस्टन्सिंग निमित्त आठवल एवढच. त्याला लगेच मी सामाजिक दुरावा असे म्हणणार नाही.

प्रतिक्रिया द्या
3520 वाचन

💬 प्रतिसाद (7)
N
Nitin Palkar Tue, 03/31/2020 - 08:51 नवीन
अर्थाअर्थी संबंध नाही तरी देखील अपूर्वाई मधील पु.लं चे वाक्य आठवले, ' दोन ब्रिटीश माणसे जेव्हा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येतात तेव्हा रंग सुरु होते'.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 03/31/2020 - 10:06 नवीन
अर्थ लागत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar
म
मोदक Tue, 03/31/2020 - 10:21 नवीन
अहो त्यांना रांग म्हणायचे आहे. अवांतर - वरील वाक्य "महार / महाड" टोन मध्ये वाचले तरी चालेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Tue, 03/31/2020 - 13:16 नवीन
आता सुधरलं! आदुगर वाटल यांचे रंगढंग चालू व्हतात काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
च
चित्रगुप्त Tue, 03/31/2020 - 10:40 नवीन
ओ पी नय्यर सिनेमा बघायला जात तेंव्हा तीन तिकिटे काढत, त्यापैकी मधल्या खुर्चीवर स्वतः बसून बाजूच्या दोन्ही खुर्चांवर हॅट, कोट वगैरे ठेवीत, असे वाचण्यात आले आहे. कदाचीत चौरा यावर जास्त प्रकाश टाकू शकतील.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 03/31/2020 - 10:59 नवीन
ओपींनी स्वतःचं म्युझिक असलेला एकही चित्रपट बघितला नाही. कदाचित त्यांनी मनात केलेलं गाण्याचं चित्रिकरण आणि पडद्यावरचं गाणं यात बरंच डिस्टन्स असणार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
च
चौथा कोनाडा Fri, 04/03/2020 - 08:23 नवीन
नख वाढवू फेम, गिनिज बुक रेकॉर्डवाले श्रीधर चिल्लाळ यांच्या बद्दल देखील असाच किस्सा वाचण्यात आला होता. ते सिनेमा रिलिजच्या पहिल्या दिवशी म्हण्जे शुक्रवारी रात्री ९ चा खेळ हमखास बघायचे, नेहमी दोन तिकिटं काढायचे, एक बसायला एक त्याच्या समोरची सिट तंगड्या पसरायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा