Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रवास

च — चलत मुसाफिर, Wed, 04/01/2020 - 11:17
टीप: मूळ कल्पना ही मिपावरील एका अन्य आयडीने लिहिलेल्या (पण प्रकाशित न केलेल्या) कवितेवरून घेतली आहे.  ------ तुझ्याकडे मी येते तेव्हा रिक्षांना कधि नसतो तोटा हात जोडुनी तयार येण्या.. आव आणुनी खोटा खोटा दिवे  पटदिशी हिरवे होती.. तुरळक मजला भासे वर्दळ द्वारघंटिका वाजवताना फुलून येई मनात कर्दळ.. . . . तुझ्याकडून मी निघते तेव्हा, एकहि रिक्षा समोर नाही लाल दिवे मम वाट रोखती आणिक गर्दी भरुनी वाही . . . घरात शिरता समोर दिसतो प्रेमळ माझा साजण जिवलग हास्य जाणते मुखी तयाच्या घेई जवळी मजला लगबग गर्दी, रिक्षा, दिवे तांबडे क्षणात पडतो विसर मनाला तुझी स्मृती जरि मनात जागी तनु माझी मी वाही सख्याला --- मालिकेतील याअगोदरच्या कविता बिज्जी लेखिकेची आळवणी वजनदार! (कपाळ)मोक्ष!! केयलफिड्डी मैत्री विनवणी

प्रतिक्रिया द्या
1529 वाचन

💬 प्रतिसाद (2)
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 04/02/2020 - 08:35 नवीन
आवडली !
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Fri, 04/03/2020 - 05:26 नवीन
प्रतिसादाबद्दल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा